LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Monday, October 31, 2022

जोड अक्षरे व जोडशब्द

 जोड अक्षरे व जोडशब्द

🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿

  क  

क + क = क्क

धक्का, बुक्का, नक्कल, अक्कल, शक्कल,दिक्कत 

क + त = क्त

भक्त, फक्त, रक्त, सक्ती, भक्ती, शक्ती

क + य = क्य

शक्य, वाक्य, ऐक्य, शक्यता, वाक्यात 

क + र = क्र

क्रम, चक्र, वक्र, क्रमाने, क्रमिक

क + ट = क्ट

 ट्रॅक्टर, डॉक्टर

_______________

  ख  

ख + ख=ख्ख

लख्ख मख्ख, दख्खन, सख्खा

ख + तख्त

तख्त

ख - य= ख्य

संख्य, मुख्य, असंख्य, प्रामुख्याने, मुख्यत्वे

_______________

  ग  

ग + न = ग्न

भग्न, मग्न, लग्न, अग्नी, अग्नेय

ग + य = ग्य

 भाग्य, योग्य, योग्यता, भाग्योदय, सौभाग्य, अग्यारी 

ग+ र = ग्र

ग्रह, ग्रंथ, एकारा, कुशाग्र, ग्रंथपाल, उग्र

ग + धग्ध

दुग्ध, स्निग्ध

_______________

  घ  

घ + न = घ्न

विघ्न, कृतघ्न, निर्विघ्न, शत्रुघ्न

घ + र = घ्र

व्याघ्र, शिघ्रकोपी

_______________

  च  

च् + य = च्च

कच्चा

च + य = च्य

मिरच्या, नावाच्या, गावाच्या, अर्वाच्य, अच्युत

च +छ= च्छ

तुच्छ, सुवाच्छ, गुच्छ

_______________

_______________

  ज  

ज् + य = ज्य

राज्य, परराज्य, ज्योती, राज्यात, स्वराज्य

ज् + र = ज्र

वज्र

ज् + व = ज्व

उज्वल, ज्वलंत, ज्वलन, ज्वारी, ज्वर

ज् +ज = ज्ज

सज्जन, सज्ज, सुसज्ज

_______________

  झ  

झ + य = झ्य

माझ्या, तुझ्या, झ्याऽऽ

_______________

  ट  

ट् + ट = ट्

घट्ट, पट्टा, कट्टा, चट्टा

ट् + र = ट्र

ट्रक, ट्राम, ट्रॅक्टर

ट् + य = ट्य

नाट्य, पाट्या, चकाट्या, रपाट्यात, काट्याने

_______________

  ठ  

ठ् + ठ = ठ्ठ

लठ्ठ, मठ, गठ्ठा, पुठ्ठा

ठ् + य = ठ्य

पाठ्य, काठ्या,

_______________

  ड  

 ड + ड = ड्ड

खड्डा, गुडडी, चड्डी

ड + य = ड्य

गाड्या, साड्या, वाड्या, काड्या, नाड्या, चाड्या,

_______________

  ढ  

ढ + य = ढ्य

पुढयात, बलाढ्य, लढयात

_______________

  ण  

ण + ट =ण्ट

घण्टा, तण्टा

ण् + य = ण्य

पुण्य, अरण्य, लावण्य

_______________

  त  

त + त = त्त

सत्ता, हत्ती, मत्त, पत्ता, दत्त, गुत्ता, उत्तर, सत्तर

त + न = त्न

रत्न, पत्नी, रत्नाकर

त + य = त्य

सत्य, त्याग, साहित्य, पाश्चात्य, पांडित्य, औचित्य

त + र = त्र

पात्र, कुत्रा, रात्र, जत्रा, पत्रा, वात्रट, यात्रा, मात्रा,नत्र, नक्षत्र

त + प = त्प

उत्पन्न, उत्पत्ती, तत्पर

त् + व = त्व

सत्व, ममत्व, स्वत्व, गुरुत्व, महत्त्व, वक्तृत्व, तत्व

_______________

  थ  

थ + थ = थ्थ

कथ्थक, पृथ्थक

थ + व = थ्व

पृथ्वी, पृथ्वीराज

थ + य = थ्य

काथ्या, पथ्यावर, तथ्य, पथ्य

_______________

  द  

द् + द = द्

खुद्द सद्दाम, मुद्दाम, मुद्दा

द् + ध = द्

शुद्ध, युद्ध, उद्धव, उद्धट, उद्धार

द् + म = द्म

पद्माकर, पद्मावती, पद्मिनी

द् + र = द्र

रुद्र, छिद्र, मुद्रा, भद्र, शुद्र, द्रावण, मुद्रण, मुद्रांक

द् + ग = द्ग

उद्गार

द् + व= द्व

द्वार, विद्वान, विद्वत्ता

द् + य = दय

खादय ,वादय 

_______________

  ध  

ध + य= ध्य

ध्यान, संध्या, साध्य, साध्या, सध्या

ध + व = ध्व

ध्वज, ध्वनी, ध्वनीक्षेपक

_______________

  न  

न + न = न्न

कन्नड, चोपन्न, पक्वान्न, उन्नत, उन्नती, पन्नास

न + य= न्य

न्याय, अन्याय, वन्य, अन्य

न + म = न्म

उन्मत्त, जन्म

_______________

    प  

प् + प = प्प

गप्प, गप्पा, पप्पा, छप्पर, अप्पर, आप्पा

प + त =प्त

तप्त, आप्त, सुप्त, गुप्त, लुप्त, कप्तान

प् + र = प्र

प्रकार, प्रथा, प्रजा, सप्रेम प्रहार, प्रीती, प्रेषक, प्राण

प् + न = प्न

स्वप्न

_______________

  फ  

फ + य = फ्य

वाफ्यात, नफ्यात, चाफ्यात

_______________

  ब  

ब + द=ब्द

शब्द, अब्दुल, शब्दांत, शब्दतरंग, शताब्दी

ब् + ब= ब्ब

गब्बर, शाब्बास, जब्बार, बब्बर

ब + ध = ब्ध

शुब्ध, लुब्ध, प्रारब्ध, प्रक्षुब्ध

ब + य = ब्य

कडब्याची, आंब्याचा, धोब्याचा, बाब्या

_______________

  भ  

भ + य = भ्य

सभ्य, अभ्यास

भ + र = भ्र

भ्रम, भ्रमर, भ्रमण, शुभ्र, इभ्रत

_______________

  म  

म + म = म्म

झिम्मा, मम्मी

म + य = म्य

साम्य, रम्य, म्यान, सौम्य

म् + र = म्र

आम्र, नम्रता, नम्र

म + ल = म्ल

आम्ल, म्लान

म् + ह = म्ह

म्हण, म्हणी, म्हैस, म्हणजे, म्हैसाळ, म्हैसूर

_______________

  य  

य + य = य्य

खवय्या, शय्या, भैय्या

_______________

  र  

र् + क = र्क

तर्क, वितर्क, सतर्क, अर्क, सर्कस

र + र = र्र

तर्र , भुर्र 

र् + च = र्च

खर्च, चर्च, चर्चा, खुर्ची, कुर्ची 

र् + ख = र्ख

मूर्ख, वर्ख,

र + ग = र्ग

विसर्ग, वर्ग, वर्गिकरण

र् + ज = र्ज

कर्ज, फर्ज, निर्जन, बजे, दुर्जन, कर्जत

र् + ण = र्ण

कर्ण, वर्ण, पर्ण, पूर्ण, अपूर्ण, सुवर्ण, वर्णन, पर्णकुटी,

वर्णी, पुर्णाकृती, सुवर्णा

र् + त = र्त

आर्त, किर्तन, वर्तन, कर्तव्य, कर्तन

र् + थ = र्थ

सार्थ , अर्थ, तिर्थ , आर्थिक, अर्थात, सार्थक,  अर्थपूर्ण, शर्थ, परार्थ 

र + द = र्द

मर्द, गर्द, गर्दी, वर्दी, सर्दी, मदांनी, गर्दीत

र् + ध = र्ध

अर्धा,

र + प = र्प

अर्पण, सर्प, दर्प, दर्पन, अर्पित

र् + छ = र्छ

मूर्च्छा

र  + ट = र्ट 

कोर्ट, फोर्ट, शर्ट

र् + इ = र्ड

कार्ड, रेकॉर्ड, वॉर्ड, नाबार्ड,

र + म = र्म

कर्म, धर्म, वर्म

र + य = र्य

कार्य, औदार्य, शौर्य, सूर्य, आर्य

र + व = र्व

गर्व , गंधर्व, पर्व, पूर्व, पूर्वी, गर्विष्ठ, 

र + स = र्स

फार्स, कोर्स, नर्स, नर्सरी

र + ष = र्ष

वर्ष, वार्षिक

र+ ह = ऱ्ह

ऱ्हास , तऱ्हा , ऱ्हस्व 

_______________

  ल  

ल + ल = ल्ल

मल्ल, दिल्ली, छल्ला, किल्ला, किल्ली, बिल्ला,

ल + व = ल्व

बिल्व

ल + क = ल्क

शुल्क, मिल्क, वल्कले

ल + य = ल्य

शल्य, कल्याण, बाल्य, वाल्या, भल्या

_______________

  व  

व + व = व्व

सव्वा, धुव्वा

व + य = व्य

काव्य, अव्यय, व्यायाम, व्याज, व्याही

_______________

  श  

श +श= श्श

हुश्श, कश्शप

श + य = श्य

नैराश्य, अस्पृश्य, वैश्य

श् + व = श्व

अश्व, श्वान, विश्व, अश्विन, नश्वर, ईश्वर

श + र = श्र

श्रम, मिश्र, विश्राम, श्रमिक, श्रावण, श्रोता

श + त = श्त

नाश्ता

श + च = श्च

ख्रिश्चन, आश्चर्य, वृश्चिक, निश्चय, निश्चल

श + म = श्म

करिश्मा, काश्मिर, आश्म, जीवाश्म

श + ल = श्ल

श्लोक, अश्लेषा

_______________

  ष  

ष + क = ष्क

पुष्कळ, बहिष्कार, निष्कर्ष, अविष्कार, निष्काम

ष + ट= ष्ट

कष्ट, सृष्टी, दृष्टी, वृष्टी, पुष्टी, नष्ट, दुष्ट, ऑगष्ट, स्पष्ट

ष + ठ = ष्ठ

पृष्ठ, गर्विष्ठ, वरिष्ठ, श्रेष्ठ, जेष्ठ, कनिष्ठ

ष + ण = ष्ण

कृष्ण, तृष्णा, विष्णू, कृष्णा, वैष्णव, कृष्णत

प+ य = ष्य

पुष्य, भाष्य, भविष्य

ष + प = ष्प

बाष्प, पुष्प, पुष्पा

ष + म = ष्म

भिष्म, चष्मा

ष + र + य = वर्ष

ईर्षा, वर्ष, वार्षिक, हर्ष

_______________

  स  

स + स = स्स

रस्सा, अस्सल, निस्सीम

स + क = स्क

मस्का, मस्करी, तस्करी, तस्कर

स् + त= स्त

रास्त, अस्त, मस्त, रस्ता, कुस्ती, मस्ती, सुस्ती, जास्त, फस्त, भिस्त, गस्त, शिस्त, वस्ताद, उस्ताद, ख्रिस्त, सुस्त, सुस्ती, प्रशस्त, स्तुती

स + थ = स्थ

स्थान, स्थानक, स्थापना, अस्था, स्थिर, अस्थी , पंतस्थ, ग्रामस्थ, संस्था

स् + र = स्र 

हिंस्र, अजस्र सहस्र

स + य= स्य

 दास्य, हास्य, समस्या, सदस्या, कांस्य

स् + ट = स्ट

ऑगस्ट

_______________

  ह  

ह् + य = हय

सहया, वह्या , बाह्य 

_______________

  ळ  

ळ + य = ळय

सळ्या , बाळ्या, गबाळ्या

_______________

  क्ष  

_______________

  ज्ञ  

_______________


उ - काराची वाक्ये

 उ - काराची वाक्ये 

*******************

गुबगुबीत उशी.

बाळाचा फुगा.

उषाचा खुळखुळा. 

सुताराची कुबडी.

दुपार झाली.

गुणी मुलगी.

जुना दुकानदार.

उघडा मुलगा. 

उचकी लागली.

उथळ पाणी.

उनाड मुलगा.

शाळा सुटली.

पुरी फुगली.

भाजी खुडली.

सुपारी खा.

फुटाणा फुटला.

चटणी कुटली.

चुरशीचा सामना.

फटाका फुटला.

फुसका फटाका.

लुकलुकणारा काजवा.

थुईथुई नाच.

नवीन रुमाल.

तुफान हाणामारी.

दुपार झाली.

दुकान उघडा.

उमा पडली.

उडी मारली.

फुगा फुटला.

उजवा हात.

उलट दिशा.

उदास मन.

कुदळ मारली.

 कुराण वाचा.

कुजका वास.

कुबडी तुटली.

खुळखुळा वाजला.

गुलाबी रुमाल.

गुळाचा चहा.

गुटगुटीत बाळ. 

चुकार शामराव .

जुळी बहिण.

झुणका भाकर.

झुळझुळ पाणी.

टुमदार घर.

तुरट चव.

तुमचा रुमाल.

पुतळा उभारला.

पुरता घाबरला.

पुराण कथा. 

शाकाहारी पुलाव.

पुरातन विभाग.

पुरवठा अधिकारी.

बुटका रवी.

भुयारी वाट.

दुधाची भुकटी.

मुळा कापला.

मुलगा झाला.

 युवा पिढी.

रुपा रुसली.

लुळा पाय.

शुभविवाह झाला.

 शुभविचारी बना.

धारदार सुरा.

सुबक छबी.

सुखकर जीवन.

हुशार मुलगी.

तुरीची डाळ.

दुकानात जा.

तुतारी वाजवा.

तुळस लावा.

हुरडा भाजला.

गुलाबी गाल. 

मुकुट घातला.

मुजरा करा.

बुटका नवरा.

ती फुलराणी.

गुरूजी लवकर या.

आज गुरुवारचा बाजार.

सुमन बाजारात जा. 

एक रुपाया पाहिजे.

 मुरलीधर दुकानात जा.

 सुमतीला रुमाल आणला.

आज वार बुधवार.

 पुढारी गालात हसला. 

सुमन खुळखुळा आण.

सुजय खुळखुळा वाजव.

 पारुची कळी खुलली.

आगगाडी झुकझुक चालली.

अरुण सुपारी खा. 

वडा खुसखुशीत झाला.

 रघुनाथ सुखी झाला.

 सुकुमार सुविचार वाच.

सुशिल सुशिक्षीत झाला.

 सुनिता खुशाल बसली.

सुधीर मुरली वाजव. 

फुलाचा सुवास बघा.

अनुजा सुरी आण.

शुभदा गुजरातला चालली.

 मुलगा मुलगी एकसमान.

कुणाची काळजी करता ?

 सुमन फुलदाणी आण.

मधुकर दुकानात जा.

मुगाची डाळ आण.

तुरीची डाळ खा. 

गुरूनाथ तुतारी वाजवा.

कुमार घरात जा.

 तुळशीचा काढा काढा.

 नवीन पुतळा उभारला.

दुपारी खिचडी करा.

चवळीची उसळ वाढ.

फार हुडहुडी भरली.

झुरळ कपाटात असणार.

दुकानात रुमाल पाहिला.

 फुगा फार फुगवला.

सुताराचा करवत हरवला.

गरुडाची भरारी पहा.

चुगली करू नका.

कुणाला घाई झालीय ? 

झाडाचा बुडका कापला.

कुरापत कशाला काढली.

चुकला तो फसला.

आज सुधीरची सुपारी.

लुकलुकणारे चमकदार डोळे.

 सुविचारी मानव असावा.

चुकाल तर शिकाल.


ई - काराची वाक्ये

ई- काराची वाक्ये 

****************

तिखट मिरची.

झाडाची सावली. 

काळी पिशवी.

बाजरीची भाकरी.

अळणी भाजी.

दाट झाडी.

शाळा भरली.

सकाळी उठा.

 बादली भरली.

भाजी आणली.

दिवाळी आली.

मजा आली.

पाणी तापवा.

टाळी वाजवा.

पिशवी उचलली. 

कळी उमलली.

हलगी वाजवली.

टिचकी मारली.

रिकामी विहीर.

अती घाई

सईबाई आली.

ढीगभर बाजरी.

मीठ भाकर.

रिती रिवाज.

चहाची किटली. 

पितळी खिसणी.

पिठाची गिरणी.

काळी टिकली.

 पिक पाणी.

निराळी चव.

गरिबी वाईट.

बिचारा भिकारी.

 रिकामी पिशवी.

हिरवी साडी.

चवदार काकडी.

 इडली-चटणी. 

गरम चपाती. 

खिडकी लावली.

 चिमणी बसली.

दीपकची गाडी.

पाटलाची फजिती. 

मधाची बाटली.

वाकडी काकडी. 

दाट सावली.

नवीन किटली.

वासाची उटणी.

 कमी काम.

पणती लावा.

भाजी चिरा.

बासरी वाजवली.

मराठी भाषा.

तिखट चटणी.

रिकामी बाटली.

कडवट कारली. 

माझी मावशी.

पिवळी पिशवी.

किटली पडली. 

टिकली लावली.

गादी उचलली.

 खीर वाढली.

 ढीग भरला.

 नदी आटली.

पाटी आणली.

 वाटी हरवली.

 गाडी चालवली.

साडी फाडली.

 लाठी मारली.

 ताजी भाजी.

 माळी आला.

यादी बनवली.

बरणी पडली.

वीट मारली.

 शीळ घातली.

 चीर पडली. 

तीर मारला.

समई लावली.

पपई कापली.

 धरणी माता. 

वीजवाहक तार.

चटणी भाकरी.

 भाजी भाकरी.

 जमीन भिजली.

मामी गाडीत बसली. 

हिराबाई घरी आली.

 राणी गादीवर बसली.

नीता नदीला चालली.

 गीता लिहीत बसली.

रीना पावसात भिजली. 

ताई पहिली आली. 

शहाणी माझी बाळी.

मी परी पाहिली.

मिरची तिखट लागली.

डाळीची आमटी वाढली.

 झाडाची सावली पडली.

 मावशी चिखलीला निघाली.

 नवरी सासरी चालली. 

बाजरी काढली नाही. 

झाडी बरीच वाढली.

मी बासरी वाजवली.

 मी भाजी मागितली.

 काशीरामला राखी दिली.

ताई राखी आण.

गणपतीची आरती झाली.

 बाजरीची मळणी झाली. 

बळीराम सावलीत बसला.

 पाटील पारावर बसला.

 नागीण बिळात चालली.

 पणती विझली नाही.

दीपिकाची बातमी समजली.

 रविवारी बकरी आणली.

नवीन गाळणी आणली.

काकीची साडी भिजली.

 निळी रिबीन आणली.

 धीरज गावी निघाला.

 सारी तयारी झाली.

आई तयारीला लागली.

 सगळी कामाला लागली.

फराळाची मजा आली.

दाराची कडी लावली.

खाली उडी मारली.

मनी आजारी पडली.

कालीदास पाणी भर.

 मनिषा भाजी कर.

मामी कढी करा.

 चिमणी उडाली आकाशी.

एक टाळी वाजवली.

चिमणी चिवचिवत आली.

निळी पिशवी उचलली.

कपाळी टिकली लावली.

काळी पाटी काढली.

 हिरवी भाजी चिरली.

 ताई लवकर उठली. 

आजी भाजी चीर.

 भाजी शिजली नाही.

आजी काशीला निघाली.

मी चपाती मागितली. 

दिवाळीत आकाशदिवा लावला. 

गायीला पाय चार. 

बादलीत पाणी भरा. 

सरिता खीर खा.

बाळाला मिठी मारली.

 नदीत पाणीच पाणी.

 साखळी नळीला लावली.

सकाळी सगळी जमली. 

रिकामी रिक्षा निघाली.

मी उडी मारली.

 मनिषा गरगर फिरली.

भाजीवाली आली नाही.

आमची आवडीची गाणी.

 दिलीपची गाडी निघाली.

निळी पगडी आणली.

 साडी किती छान.

 किती आळशी काशिनाथ.

चिव चिव चिमणी.

 सविता खडीसाखर खा.

 पायरीवर निमा बसली.

खिडकीत वही सापडली. 

शशिकला कणिक मळ.

अजित कळशी उचल.

 रिमझीम पावसात भिजा.

सगळी मला चिडवतील. 

नवीन किसणी आणली.

कविता कारली खीस.

अविनाश कविता वाच.

पक्षी किलबील करतात. 

सरिता पहिली आली.

मी कहाणी वाचली. 

जिजाबाई शिवाजीची आई.

 पायावरती गिरकी मारली. 

मी तिकीट काढली. 

विहीर रिकामीच राहिली.

 आज किती तारीख.

बडबड कमी करावी. 

धरणी आईची माया. 

कशी जाईल वाया.

नवीन पाटी आणली.

लिना वीणा वाजव.

 दारावर चिमणी बसली.

दादाची पाटी हरवली.

 माझी मावशी आली.

चहाची किटली पडली.

लता दिदी गाणी गातात.

मी हिरवा पक्षी पाहिला. 

मावशी पिवळी साडी आण. 

कशी माझी बसली मनी.

 अशी माझी छबी ती.

फिरता फिरता ती पडली. 

इडली चटणी हवी मला. 

बिचारा भिकारी परत फिरला. 

हलगीचा आवाज कानी आला.

 कमी काम कमी दाम. 

सहलीला फारच मजा आली.

**************************

पाटलाची फार फजिती झाली.

 चहाची नवीन किटली आणली.

मावशी ताजी भाजी आण.

 मी रामाला काठी मारली.

 रविवार माझा आवडीचा वार. 

माझी नवीन वही हरवली

**********************


इ - काराची वाक्ये

इ - काराची वाक्ये 

*****************

हिरवा चाफा.

दिवस उगवला.

दिवस मावळला.

खिसा शिवला. 

किडा दिसला.

जिना ढासळला.

टिळा लावला.

दिवा लावला.

निळा कागद.

भिक्षा वाढा.

रिक्षा पकडा.

अक्षर लिहा.

धारदार विळा.

शिक्षा कराच.

हिरा चमकला.

चिखलात घसरला.

चिमटा काढला.

जिजाबा आला.

जिराफ पळाला.

टिकाव आणा.

कापडाचा ढिगारा.

तिखट चव.

दिवस उजाडला.

रिकामा खिसा.

 विमान पहा.

खिरापत वाटा.

गिरनार चहा.

हिवाळा आला.

 बिरबल बादशाह. 

दिलदार किसान.

विराट सभा.

विशाल सागर.

विजय दिवस.

दिवा लावा.

खिळा उचल.

खिसा फाटला.

विडा खा.

निशान फडकवा.

जिराफ पहा.

अक्षर गिरवा.

विमान पहा.

सायकल फिरवा.

पिवळा निशाण.

जिना चढा.

हिरवा शिवार.

बिछाना काढा.

विलास आला.

छानदार पिसारा.

विकास करा.

इवलासा ससा.

सागर किनारा.

 किचकट काम.

गिटार वाजवा.

चिवडा खा.

चिखल झाला.

ढिगभर रिक्षा.

टिळा लावला.

दिशा बदला.

दिलदार राजा.

निगा राखा.

निराळा उपाय.

निरागस बालक.

बिचारा नारायण.

मिणमिणता दिवा.

रिकामा कप.

रिकामा कारखाना.

अक्षर लिहा.

लिखाण करा.

लिफाफा उघडा.

विडा उचलला.

विचारा मनाला.

विजय मिळवा.

विधवा विवाह.

शिळा भात.

वाटाणा शिजवा.

शिक्षक दिन.

चमकता हिरा.

हिरवा दिवा लावला. 

पिवळा दिवा लावा.

दिनकर पायजमा काढ.

काका कविता लिहा. 

निशाण तयार करा.

छान विमान बनवा.

गरमागरम शिरा खा. 

पटकन बिछाना घाला. 

फारच निराळा दिवस. 

बिचारा राम फसला. 

विचार महान असतात.

किरण काम करणार ?

निशा पळत जा.

ललिता काय करणार ?

 विजया दिवा आणा.

 शिवराम तिरपा पळ. 

सरिता ढिगारा उपस.

सरिता गाय आण.

गिरीष शिरा खा. 

कविता निकाल पहा.

रविराजला हाक मारा.

शशिकला कागद फाड.

मनिषा कामावर जा.

चिवडा तयार झाला.

शिवराज गाढव हाकल.

 विमला गिधड पहा.

राधिका गणित कर.

वनिता गावाला जा.

शिवराम नाव लिहा.

कमवा आणि शिका.

टिकाव आणायला चला.

 दिवा लावला का ?

निळा कागद आणला.

माझा खिसा फाटला.

धारदार विळा आणला.

फारच तिखट मिरचा. 

दादाला टिळा लावला.

राजा गिटार वाजव.

फारच चिखल झाला.

कप रिताच राहिला.

रामाने विजय मिळविला. 

शिळा भात वाढला.

आकाशदिवा आणला का ?


आ - कराची वाक्ये

आ - काराची वाक्ये 

**********************

पापड खा.

क्षमा करा. 

वाचन करा. 

नारायण आला.

भात वाढा. 

गवत कापा.

 खारा मासा. 

दरवाजा उघड. 

आठवडा बाजार.

गाढव पकडा.

वाडा पहा.

याद राखा.

कामावर चला.

लबाड पळाला.

बाळाचा चमचा.

राम आला.

चहा करा.

बाळ रडला.

मसाला वाटा.

दादा आला.

साखर खा.

कासरा धरा.

घाम गाळा.

गाडा चालवा.

आवाज आला.

आवडता गायक.

आवडता नायक.

आज्ञा पाळा. 

आराम करा.

भात करा.

आमचा दादा.

आषाढ मास.

वळणदार अक्षर.

बाकदार नाक.

आरामात बसा.

कामात काम.

गाढवाचा आवाज.

गावाला चला.

चादर वाळवा.

चाफळचा राम.

चाणाक्ष नारद.

कागद कापा.

जाताजाता या.

झाडाजवळ बसा.

झाडावर चढा.

ढाकण लावा.

तालावर नाचा.

थाटमाट पहा.

काम पहा. 

नकाशा दाखवा.

धागा पकडा.

धारदार पान.

धाडस करा.

नाटक काम.

नाटक पहा.

नागराज आला.

साप मारला.

पाळणा हलवा.

पापड भाजा.

पावडर लावा. 

पावसाळा आला.

रामायण वाचा. 

रामफळ खा.

फटाका वाजवा. 

वाटाणा खा. 

साक्षर करा.

 सायकल चालवा. 

सावध रहा. 

सावकाश चला.

हाक मारा.

हार घाला.

फाटका कपडा.

फारच छान.

फळबाग लावा.

 बाजार भरला.

अवकाश यान.

याद राखा.

राजवाडा पहा.

लाजरा बाळ.

वाळत घाला.

वाळका झाला.

गजर वाजला. 

शाम आला.

नवरा पळाला.

हादरा झाला.

 साबण लावा.

हात हालवा.

बाबा साप पहा. 

रामा शाळा पहा.

नाना पापड आणा.

घरात साप आला.

काढा तयार करा.

शारदा खारका खा.

बाबा सातारला जातात.

मालनला राग आला.

अक्षदा उतारा वाच.

सामना छान झाला.

मला क्षमा करा.

वानर आवाजाला घाबरला.

माया कागद काप.

रामा बटाटा उकड.

मसाला छान झाला.

लाल झालर लावा.

ताटावर झाकण टाका.

शामराव गावाला जातात. 

कामगार कामावर चालला.

जयरामला साप चावला.

 रामा पावसात पळाला. 

काकाचा हात भाजला. 

हावरट सागर पळाला.

पाळणा छान सजवला. 

कागदाचा लगदा झाला.

सागर ससा बघ.

सदा कागद काप. 

आकाशात ढग असतात.

रामा पसारा आवर.

आबा आरशात पाहतात.

 दसरा जवळ आला. 

आशाचा नवरा पळाला. 

आकाश पावा वाजव.

 पावसाळा जवळ आला.

 शालन खराटा उचल. 

उमा फराळ कर. 

काजल कचरा काढ. 

बाळ पाटावर बसला. 

बाळा साखरभात खा.

 आमचा पराग शहाणा.

शारदा ताट वाढ. 

नवा सदरा घातला.

 गजानन आमचा गटनायक.

गावाजवळचा झरा आटला.

 वरात वाजतगाजत काढतात.

 काका नाव बदला. 

आकाशात ढग पहा.

 नाटकाचा तमाशा झाला.

 कपाटात नारळ बघ. 

पाटावर उभा रहा.

 नळाचा काठ भरला.

 माझा हात भाजला.

 डाळ-भात हवा का ?

 काय काय पहाणार ? 

कामगार काम करतात. 

आमचा आवडता काका. 

काय हा थाटमाट. 

हावरट कमलाकर पळाला.

काका फळा उचला.

माया वडापाव खा.

उमा कचरा काढ.

बाळाला घास भरवा.

नाताळ जवळ आला.

पाटावर उभा रहा.

नवा सदरा घातला.

बाळाला पावडर लावा.

आराखडा तयार झाला. 

दादाला टाटा करा.

 रागाचा पारा चढला.

 झाडाचा पाला काढला.

 पायात वहाना घाला.

 पाणवठा साफ करा. 

आता बास करा.

रामा बाण मार.

लसणाचा भाव काय ?

 सागरचा दात पडला.

माकडाचा नाच पहा.

 वातावरणात फरक पडला. 

वाजतगाजत वरात काढा. 

दादा सातारला चला.

 ससा फार घाबरला. 

रामलाल फाटक उघड.

दाराला टाळा लावा.

पटपट काम करा.

आकाशातला तारा पहा.

पारायणाचा लाभ फार.

मला नकाशा पहायचाय.

कावळा झाडावर बसला.

 नामा कामाला लागला. 

नारायण सावकाश आला. 

माधवचा सदरा फाटला.

साक्षात ज्ञानलाभ झाला. 

नानाचा कान कापला.

 रमाला गजरा आवडला.

धार लावायला काणस वापरतात. 

आमचा बाळ फार शहाणा. 

कशाला घाबरता आहात आपण? 

आळस झटका, कामाला लागा. 

 मदत करायला माझा हात.

 दार उघडायला माझा हात.

 छानछान बाग पहायला चला. 

बाळा दात साफ कर.

ससा घाबरला व पळाला.

काम करायला कशाला लाजता.

आता वाजतगाजत वरात काढा.

 बाबा मला क्षमा करा.

मला पापड हवाच हवा.

काळा कावळा झाडावर बसला.

रामा माझा सदरा पहा. 

आज काका सातारला जाणार.

बाळा सायकल सावकाश चालव.

 नवा सदरा मला हवा.

चला पाणवठा साफ करायला.

थाटमाट हा पहा जरा.

आता दसरा जवळ आला.

 लता गावात जा जरा.

नारायणचा कारखाना पहाणार का?

झाडावर माकडदादा राहतात ना ?

बाराचा पाढा पाठ करा.

चला आता कामाला लागा.