LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


कॅरम

 कॅरम

-----------------------------

या खेळाचा जन्म भारतात झालेला असावा. कलकत्ता येथील खेळांच्या साहित्याचा व्यापार करणाऱ्या कार आणि महालानेबिस या कंपनीच्या नावातील इंग्रजी आद्याक्षरावरून कॅरम या नावाने त्यांनी हा खेळ प्रचारात आणलेला असावा.


हा खेळ दोन किंवा चार खेळाडू खेळतात. या खेळासाठी प्रमाणभूत मानलेला चौकोनी फळा (बोर्ड) ४५⋅२५ ग् ५⋅२५ सेंमी. असतो. लहान मुलांसाठी लहान मापाचा फळा असतो. या खेळात एकोणीस टिकल्या असतात. त्यातील ९ काळ्या, ९ पांढऱ्या आणि एक टिकली लाल रंगाची असते. तिला राणी (क्वीन) म्हणतात.


टिकल्यांचा व्यास २⋅५४ सेंमी. आणि जाडी ३ मिमी.पेक्षा थोडी कमी असते. त्या टणक लाकडापासून करतात. मारत्या (स्ट्रायकर) प्लॅस्टिकचा, हस्तिदंताचा किंवा शिंगाचा असतो. तो टिकल्यापेक्षा जाड, ३⋅८ सेंमी. व्यासाचा, मोठा व वजनदार असतो. खेळताना टिकल्या फळ्यावरच रहाव्यात, म्हणून चारही बाजूंनी लाकडी पट्टी बसविलेली असते. या पट्‌टीपासून १० ते १२⋅५ सेंमी. वर चारही बाजूंशी समांतर दोन रेषा काढलेल्या असतात. या रेषा कोनांजवळ न जोडतो, ठराविक अंतर सोडून, त्यांच्या सर्व कोपऱ्यावर २⋅५४ सेंमी. व्यासाची वर्तुळे काढलेली असतात. दोन्ही बाजूंच्या वर्तुळांत एक अर्धवर्तुळ काढून त्याच्या मध्यातून फळ्याच्या मध्यबिंदूकडे रोख असलेला एकेक बाण काढलेला असतो. हे बाण त्या त्या बाजूच्या खेळाडूची मर्यादा दर्शवितात. चारही कोपऱ्यांत फळ्याला वर्तुळाकार ५⋅०८ सेंमी. व्यासाची चार छिद्रे असून त्यांच्या तोंडाशी पिशव्या लावून टिकल्या जाण्यासाठी घरे केलेली असतात.


फळ्याच्या मध्यबिंदूभोवती २⋅५४ सेंमी. वर्तुळ काढलेले असते. ती राणीची राखीव जागा असते. ती राणीची राखीव जागा असते. या वर्तुळाच्या बाहेर जे १५⋅२४ सेंमी. व्यासाचे वर्तुळ असते, त्यात ९ पांढऱ्या व ९ काळया टिकल्या एकाआड एक मांडतात. टिकल्या मांडल्यानंतर खेळाडूने आपल्या बाजूच्या दोन रेषांवर मारत्या ठेवून ती मांडणी फोडली की खेळ सुरू होतो. खेळाडूची टिकली घरात गेली नाही की त्याची पाळी जाते व प्रतिस्पर्ध्यास मिळते. यामध्ये आळीपाळीने खेळ खेळला जातो. एकाच्या सर्व टिकल्या व राणी घरात गेली की डाव संपतो. त्याला राणीचे ५ गुण्‌ व प्रतिस्पर्ध्याच्या उरलेल्या टिकल्यांइतके गुण मिळतात. एकूण डाव २९ गुणांचा असतो. ज्या खेळाडूचे २९ गुण प्रथम होतील त्याचा डाव होतो. अशा तीन डावांपैकी दोन डाव जिंकणारा विजयी ठरतो.


कॅरमच्या खेळाचे नियम साधेच असतात. खेळाच्या साहित्याबरोबरच त्याचे छापील पत्रक मिळते. कॅरमचे सामने आता जिल्हा, राज्य आणि अखिल भारतीय पातळीवर होतात. खेळात टिकल्या विविध प्रकारांनी, उदा., अंगठ्याचा नेम होम शॉट, उलटा नेम (रीबाऊंड शॉट), कोन-नेम (कट शॉट) इत्यादींनी अचूक टिपून घेणे कौशल्याचे असते.

No comments:

Post a Comment