LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


उभयान्वयी अव्यय

 


 उभयान्वयी अव्यय

..............................................................................

 दोन किंवा अधिक शब्द ,  अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी  शब्दांना  ' उभयान्वयी अव्यय ' असे म्हणतात.

 दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे ' उभयान्वयी अव्यय  'होय.

...........................................................................

  उभयान्वयी अव्ययांचे प्रकार

1]  प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय-

  हे अव्यय दोन वाक्य जोडण्याचे काम करते.

 उदा -

 अ ) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

ब ) आता संध्याकाळ होत आली आणि मुलांना घरची ओढ लागली.

क )  भिकाऱ्याला मी  एक कापड दिले ;  शिवाय त्याला जेवू घातले.

ड )  मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

इ )  मधुने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले.

.............................................................................

2 ]   गौणत्वसुचक  उभयान्वयी अव्यय-

 हेअवे एक प्रधान वाक्य व एक  गौण  वाक्य जोडण्याचे काम करते.

 उदा-

 अ ) दोन रुपये म्हणजे  दोनशे  पैसे.

ब ) चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो पुण्यास गेला.

 क ) तू माझ्याकडे आलास की मी येईन.

ड ) त्याला बढती मिळाली, कारण त्याने चांगले काम केले.

 इ ) शाळेला सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल.

............................................................................


No comments:

Post a Comment