LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


भारतरत्न पुरस्कार माहिती



भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान

 आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या

 भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या

 व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन

 गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात

 यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा

 सन्मान मरणोत्तर दिला गेला

 आहे. सेवाकलासाहित्यविज्ञान  विश्वशांती,

मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील

 लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व

 अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा

 अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय

 इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत

 सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४

 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची

 मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही

 बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची

 सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक

 जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे

. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही

 उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या

 पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५

 सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार

 लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची

 आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो

 देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या

 राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४

 साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या

 हस्ते दिला गेला.


क्र

नाव

पुरस्कृत वर्ष

क्षेत्र

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

१९५४

भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ

चक्रवर्ती राजगोपालचारी

१९५४

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल

डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

१९५४

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

डॉ. भगवान दास

१९५५

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

१९५५

पहिले अभियंता 'बॅंक ऑफ म्हैसूर' चे संस्थापक

जवाहरलाल नेहरू

१९५५

भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते

गोविंद वल्लभ पंत

१९५७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री

धोंडो केशव कर्वे

१९५८

समाजसुधारक, शिक्षणप्रसारक

डॉ. बिधान चंद्र रॉय

१९६१

पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक

१०

पुरूषोत्तम दास टंडन

१९६१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

११

डॉ. राजेंद्र प्रसाद

१९६२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती

१२

डॉ. झाकिर हुसेन

१९६३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती

१३

महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे

१९६३

शिक्षणप्रसारक

१४

लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)

१९६६

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान

१५

इंदिरा गांधी

१९७१

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

१६.

वराहगिरी वेंकट गिरी

१९७५

कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती

१७.

के. कामराज (मरणोत्तर)

१९७६

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री

१८

मदर तेरेसा

१९८०

ख्रिश्चन मिशनरीची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

१९.

आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)

१९८३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक

२०.

खान अब्दुल गफार खान

१९८७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

२१.

एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)

१९८८

चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

२२.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर)

१९९०

भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ व भारताचे पहिले कायदामंत्री

२३.

नेल्सन मंडेला

१९९०

वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष

२४.

राजीव गांधी (मरणोत्तर)

१९९१

भारताचे सातवे पंतप्रधान

२५.

सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

२६.

मोरारजी देसाई

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान

२७.

मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)

१९९२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

२८.

जे.आर.डी. टाटा

१९९२

उद्योजक

२९.

सत्यजित रे

१९९२

बंगाली चित्रपट निर्माते

३०.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

१९९७

शास्त्रज्ञ व भारताचे ११वे राष्ट्रपती

३१.

गुलझारीलाल नंदा

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान

३२.

अरुणा असफ अली (मरणोत्तर)

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

३३.

एम.एस. सुब्बलक्ष्मी

१९९८

कर्नाटक शैलीतील गायिका

३४.

चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्

१९९८

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री

३५.

जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

३६.

रवी शंकर

१९९९

प्रसिद्ध सितारवादक

३७.

अमर्त्य सेन

१९९९

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

३८.

गोपीनाथ बोरदोलोई (मरणोत्तर)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री

३९.

लता मंगेशकर

२००१

पार्श्वगायिका

४०.

बिसमिल्ला खान

२००१

शहनाईवादक

४१.

भीमसेन जोशी

२००८

शास्त्रीय गायक

४२.

सी.एन.आर.राव

२०१४

शास्त्रज्ञ

४३.

सचिन तेंडुलकर

२०१४

क्रिकेटपटू

४४.

मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)

२०१५

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक

४५.

अटलबिहारी वाजपेयी

२०१५

भारताचे पंतप्रधान

४६.

नानाजी देशमुख

२०१९

सामाजिक कार्यकर्ता

४७.

भूपेन हजारिका

२०१९

गायक

४८.

प्रणव मुखर्जी

२०१९

भारताचे १३वे राष्ट्रपती



No comments:

Post a Comment