LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


ADVERB- क्रियाविशेषण

 



ADVERB- क्रियाविशेषण
=======================
  वाक्यातील क्रियापद किंवा विशेषण किंवा दुसरे एखादे क्रियाविशेषण याविषयी अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला "  क्रियाविशेषण "  असे म्हणतात.
Adverb :- An adverb is the word used to add something to the meaning of verb ,  an adjective or another adverb.
EX-
Ram runs fast.
Ram runs very fast.
===========================
Kinds of Adverbs -  क्रियाविशेषणाचे प्रकार

🔰Adverbs of time :- समयदर्शक क्रियाविशेषण

 🔰Adverbs of manner :- रितीवाचक क्रियाविशेषण

 🔰Adverbs of place :-   स्थलवाचक क्रियाविशेषण

 🔰Adverbs of frequency :-  पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण

🔰 Adverbs of degree/ quantity :- परिमाणवाचक क्रियाविशेषण

🔰 Adverbs of Affirmation :- निश्चयात्मक क्रियाविशेषण

🔰Advaerbs of reason :- कारणदर्शक क्रियाविशेषण

 🔰Interrogative adverbs :- प्रश्नार्थक क्रियाविशेषण

🔰Relative adverbs :-  संबंधदर्शक क्रियाविशेषण
-----------------------------------
🔰Adverbs of time :- समयदर्शक क्रियाविशेषण - याप्रकारच्या क्रियाविशेषनामुळे  क्रिया केव्हा घडली या प्रश्नाचे उत्तर मिळते. यामध्ये कारलदर्शक शब्द वापरलेले असतात.
 उदा-
She came late.
Brush your teeth daily.

🔰Adverbs of manner :- रितीवाचक क्रियाविशेषण -  क्रिया कशा रीतीने घडली म्हणजेच क्रियेची रीत सांगणाऱ्या शब्दाला " रिती वाचक क्रियाविशेषण "असे म्हणतात.
 उदा-
He runs fast.
The old women walks slowly.
Rakesh fought bravely.

🔰Adverbs of place :-   स्थलवाचक क्रियाविशेषण -  क्रिया कोठे  घडली म्हणजेच क्रियेचे स्थळ सूचित करणाऱ्या शब्दाला " स्थलवाचक  क्रियाविशेषण " असे म्हणतात.
where  ने प्रश्न विचारला असता उत्तर मिळते.
 उदा- 
come here.
Stand there.

🔰Adverbs of frequency :-  पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण - या प्रकारच्या क्रियाविशेषण यामुळे क्रिया किती वेळा घडली याचे उत्तरे मिळतात.
 उदा-
You are always late.
Dont come late.
🔰 Adverbs of degree/ quantity :- परिमाणवाचक क्रियाविशेषण -  या  क्रियाविशेषणाच्या  साह्याने क्रियेचे परिणाम  कळतात.
 उदा-
He is very busy.
You are too lazy.

🔰 Adverbs of Affirmation :- निश्चयात्मक क्रियाविशेषण -   ज्या क्रियाविशेषण च्या साह्याने खात्री, निश्चय, होकार किंवा नकार दर्शवला जातो त्यांना निश्चयात्मक क्रिया विशेषण असे म्हणतात.
 उदा-
The people were not happy.
He is fool indeed.

🔰Advaerbs of reason :- कारणदर्शक क्रियाविशेषण -  एखादी क्रिया का घडली याचा बोध विशिष्ट क्रिया विशेषण मुळे होतो यांच्यामुळे कारण समजते. का ?  या प्रश्नाचे उत्तर मिळते.
  उदा-
He stays at home beacuse of his illness.
She was therefore punished.


🔰Interrogative adverbs :- प्रश्नार्थक क्रियाविशेषण -  प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक  वाक्यात यांचा उपयोग करतात.
 उदा-
Why was he absent ?
When will she go.

🔰Relative adverbs :-  संबंधदर्शक क्रियाविशेषण -  संबंधदर्शक क्रियाविशेषण  हे व्यक्ती किंवा वस्तू यांचा संबंध स्पष्ट करतात.
 उदा-
This is the school where o learnt.
I know why you are late.
===========================
 क्रियाविशेषण यांचा वाक्यात कसा वापर करावा ?
1 ]  जर क्रियाविशेषण हे विशेषण किंवा दुसरे एखादे क्रियाविशेषण यांचे बद्दल अधिक स्पष्ट करून विशेष माहिती देत असेल तर त्या विशेषणा पूर्वी क्रियाविशेषण याचा वापर करावा.
He is very clever .
2]  अकर्मक क्रियापदाच्या   रूपानंतर  क्रियाविशेषण याचा वापर करावा.
They came late.
3]  सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद यांच्यामध्ये किंवा दोन सहाय्यकारी क्रियापदांच्या मध्ये वापर करावा.
Riya was highly honoured.


No comments:

Post a Comment