चारोळीतून " स्वर " ओळख
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
अ
पाटावर बस
घे थोडा रस
अ पासून होतो
अननस
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
आ
रहायला गाडी
फिरायला माडी
आ पासून होतो
आगगाडी
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
इ
आठवड्याचा बाजार
नको कुठला आजार
इ पासून होतो
इजार
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
ई
सर्कशीत तंबू
शेतात बांबू
ई पासून होतो
ईडलिंबू
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
उ
फराळाला उसळ
पाणी आहे उथळ
उ पासून होतो
उखळ
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
ऊ
आई माझी खूश
बिळात आहे घूस
ऊ पासून होतो
ऊस
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
ए
भाजीला तडका
आंबा नको सडका
ए पासून होतो
एडका
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
ऐ
नदीवर धरण
भातासोबत वरण
ऐ पासून होतो
ऐरण
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
ओ
समुद्रात बोट
हत्तीचा मोठ पोट
ओ पासून होतो
ओठ
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
औ
गावाजवळ नदी
झोपायला गादी
औ पासून होतो
औषधी
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
अं
शाळेत घंटी
काकू म्हणजे आंटी
अं पासून
अंगठी
🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁=🍁
खूपच सुंदर खूप उपयोगी आहे. धन्यवाद
ReplyDelete