LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


प्रयोग

 

प्रयोग

..................................................................................................

 वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग ,  वचन ,  पुरुषाप्रमाणे  क्रियापदाच्या रुपाची  जी ठेवण ,  रचना किंवा योजना असते   त्यास व्याकरणात '  प्रयोग ' असे म्हणतात.

................................................................................................

+++ वाक्यातील  प्रयोग ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी +++

1 ]  वाक्यातील कर्ता ,  कर्म व क्रियापद ओळखावे.

2 ]  वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या  लिंग ,  वचन व पुरुषाप्रमाणे बदलते की नाही ते पहावे .

3 ]  वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग ,  वचनाप्रमाणे बदलते की नाही ते पाहावे.

  कर्ता -  जो क्रिया घडवतो  तो शब्द .

 कर्म - ज्याच्यावर क्रिया घडते तो शब्द .

 क्रियापद- वाक्याचा अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.

...............................................................................................

++++++++++++++++++++++++++++++

 क्रियापदाचे प्रकार

1 ]  कर्तरी प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या लिंग ,  वचन , पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते ,  तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात.

 उदा-  राजेश चेंडू खेळतो.(  मूळ वाक्य )

   कर्ता -  राजेश

 कर्म -  चेंडू

 क्रियापद - खेळतो

 बदल केलेली वाक्य ---------------

1]  सोना चेंडू खेळते. ( कर्त्याचा लिंग बदल)

2] मुले चेंडू खेळतात. ( कर्त्याचा वचन बदल. )

3 ]  मी  चेंडू खेळतो.( कर्त्याचा पुरुष बदल

 कर्त्याच्या लिंग ,  वचन  व पुरुषाप्रमाणे बदल केल्यामुळे क्रियापद बदलते.

...............................................................................................

[ कर्तरी प्रयोग कसा ओळखावा ?]


1]   कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता  व कर्म या दोघांनाही विभक्तिप्रत्यय जोडलेला नसतो.

2]  कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुदा वर्तमानकाळी असते.

...............................................................................................


 कर्तरी प्रयोगाचे प्रकार

1 ]  सकर्मक कर्तरी प्रयोग :  क्रियापद कर्मासह असते.

 उदा-  निखिल पाणी आणतो.

(  करता- निखिल , कर्म - पाणी ,  क्रियापद-आणतो )

2 ] अकर्मक कर्तरी प्रयोग - क्रियापद कर्मविरहित असते.

 उदा- तो रडतो.

(   कर्ता -तो ,  क्रियापद- रडतो.)

++++++++++++++++++++++++++++

------------------------------------

2 ]  कर्मणी प्रयोग- जेव्हा कर्माच्या  लिंग ,  वचन याप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

 उदा- सादिकने आंबा खाल्ला.

 करता - सादिक

 कर्म- आंबा

 क्रियापद- खाल्ला

  बदल केलेली वाक्य

1]  रामने चिंच खाल्ली. [  कर्माचा लिंग बदल]

2]रामने आंबे खाल्ले .[कर्माचा वचन बदल ]


 कर्माच्या  लिंग ,  वचन  यामध्ये बदल केल्यामुळे क्रियापद बदलते.

.........................................................................................

 कर्मणी प्रयोग कसा ओळखावा ?

1]  कर्मणी  प्रयोगात कर्त्याला  विभक्तीप्रत्यय जोडलेला असतो.

2]   कर्माला  विभक्तीप्रत्यय जोडलेल्या नसतो.

3]  कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुदा भूतकाळी असते.

++++++++++++++++++++++++++++++

3 ]  भावे प्रयोग -  जेव्हा कर्ता किंवा  कर्म यांच्या लिंग , वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही , तेव्हा त्यास  ' भावे प्रयोग '  म्हणतात.

 उदा-

 पोलिसांनी चोरास पकडले.( मूळ वाक्य)

 कर्ता - पोलिसाने

 कर्म- चोरास

 क्रियापद- पकडले

 बदल केलेली वाक्य-

1 ] महिलेने चोरास पकडले. ( कर्त्याचा लिंग बदल)

2] पोलिसांनी चोरास पकडले. (कर्त्याचा वचन बदल)

कर्ता  किंवा कर्म या दोघांच्या लिंग ,  वजनात बदल केले तरी '  क्रियापद बदलत नाही  ' .  ते स्वतंत्र राहते .

 भावे प्रयोग ओळखावा कसा ?

1 ]   भावे प्रयोगात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्तिप्रत्यय जोडलेले असतात.

2]  भावे प्रयोगात क्रियापद एकारान्त असते.  उदा- बांधले ,  सोडले ,  मारले ,  सांडले.

...........................................................................................

 भावे प्रयोगाचे प्रकार

1 ]  सकर्मक भावे प्रयोग- क्रियापद कर्मा सह असते.

 उदा-

 नेहाने कुत्र्यास मारले.

 कर्ता - नेहा

 कर्म- कुत्रा

 क्रियापद- मारले

2 ]  अकर्मक भावे प्रयोग -  क्रियापद कर्मविरहित असते.

 उदा-

 मुलांनी खरे बोलावे.

कर्ता  - मुलांनी

  क्रियापद- बोलावे

................................................................................................

 महत्त्वाचे

...............................................................................................

++ प्रयोगाने  वाक्यात होणारे बदल++

1 ]  महेश चेंडू फेकतो.-  कर्तरी प्रयोग

2 ]  महेश ने चेंडू फेकला -  कर्मणी प्रयोग.

3]  महेशने चेंडूला फेकले. - भावे प्रयोग


1 comment:

  1. Thank you so much for this information 🙏🙏 It means a lot for scoring good marks in Marathi Grammar.

    ReplyDelete