🌄 चौकोन व चौकोनाचे प्रकार🌄
============================
चौकोन
💠वरील दिलेल्या RSTP चौकोनाचे R , S , T आणि P हे शिरोबिंदू आहेत.
💠 हे शिरोबिंदू एकाच प्रतलात आहेत.
💠त्यापैकी कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत.
💠 चौकोनाला चार बाजू आणि चार कोन असतात त्यास चौकोनाचे घटक म्हणतात.
📙 चौकोनाचे नाव- चौकोनाचे नाव सांगताना त्याच्या शिरोबिंदू ची नावे घड्याळी काट्याच्या दिशेने किंवा घड्याळी काट्यांच्या विरुद्ध दिशेने सांगितली जातात.
कोणत्याही शिरोबिंदू पासून चौकोनाच्या नावाची सुरुवात केली जाऊ शकते.
📙 चौकोनाच्या लगतच्या बाजू - चौकोनाच्या ज्यात दोन बाजू मध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो , च्या बाजूंना चौकोनाच्या लगतच्या किंवा संलग्न बाजू म्हणतात.
उदा.- चौकोन RSTP मध्ये बाजू RS व बाजू ST या लगतच्या बाजू आहेत.
📙 चौकोनाच्या संमुख बाजू - चौकोनाच्या ज्या दोन बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो अशा बाजूंना संमुख बाजू किंवा समोरासमोरील बाजू म्हणतात.
उदा.- चौकोन RSTP मध्ये रेख RS व रेख PT या परस्परांच्या संमुख बाजू आहेत.
📙 चौकोनाचे लगतचे कोन - चौकोनाच्या दोन कोनामध्ये त्यांची एक बाजू समाईक असेल तर त्या दोन कोनाला लगतचे कोन म्हणतात.
📙 चौकोनाचे कर्ण - चौकोनाचे सन्मुख शिरोबिंदू साधणाऱ्या रेषाखंड यांना कर्ण म्हणतात. चौकोनाला दोन कर्ण असतात.
📙 चौकोनाचा अंतर्भाग व बहीर्भाग - ज्या प्रतला मध्ये चौकोन काढलेला असतो त्या प्रतलाचे तीन भागात विभाजन होते. 1 ) चौकोनाचा अंतर्भाग 2) चौकोन 3 ) चौकोनाचा बहीर्भाग
===========================
चौकोनाचे प्रकार
🍁🍁समांतरभुज चौकोन 🍁🍁
ज्या चौकोनाच्या संमुख भुजा परस्परांना समांतर असतात अशा चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात.
-------------------------------------
🍁🍁समभुज चौकोन🍁🍁
ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजु एकरूप असतात अशा समांतरभुज चौकोनाचे समभुज चौकोन असे म्हणतात.
-------------------------------------
🍁🍁आयत 🍁🍁
ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एक रूप व प्रत्येक कोण काटकोन असतो अशा चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतात.
आयताचे गुणधर्म-
📋 आयताचा चा प्रत्येक कोन काटकोन असतो.
📋 आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात.
📋 आयताचे कर्ण एकरुप असतात.
📋 आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात.
------------------------------------
🍁🍁 चौरस 🍁🍁
ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान व सर्व कोन काटकोन असतात अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात.
चौरसाचे गुणधर्म-
📋चौरसाच्या सर्व भुजा एकरूप असतात.
📋चौरसाचे सर्व कोन एकरूप असतात.
📋चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो.
📋चौरसाचे दोन्ही कर्ण परस्परांशी एकरूप असतात.
📋चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोन करून दुभागतात.
------------------------------------
🍁🍁 समलंब चौकोन🍁🍁
ज्या चौकोनात समोरील बाजूंच्या जोड्यांपैकी फक्त एकाच जोडीतील भुजा परस्परांना समांतर असतात त्यास समलंब चौकोन किंवा समांतर द्विभुज चौकोन असे म्हणतात.
-------------------------------------
🍁 🍁पतंग किंवा पतंगाकृती चौकोन🍁🍁
ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात , अशा चौकोनाला पतंग किंवा पतंगाकृती चौकोन असे म्हणतात.
📋यांच्या समोरासमोरील कोणाची जोडी एकरूप असून कर्ण परस्परांशी लंब असतात.
📋 एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो.
📋 याचे कर्ण समान लांबीचे असतात.
------------------------------------
No comments:
Post a Comment