LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


मराठी व्याकरण : ऱ्हस्व दीर्घ


मराठी व्याकरण  : ऱ्हस्व दीर्घ 

..........................................................................................

1 ] मराठी शब्दांतील  प्रकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात.

उदा.  खीर ,  गरीब ,  कठीण ,  बहिण ,   इ.


2]  पण तत्सम शब्दातील आकारांत पूर्वीचे इकार उकार मूळ संस्कृत प्रमाणे ऱ्हस्वच  राहतात.

 उदा -  गुण ,  मधुर ,   अनिल ,  नागरिक ,  सामाजिक इ.


3] मराठी शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ स्वरात असेल तर उपान्त्य इकार व उकार ऱ्हस्व असतो .

 उदा -  किडा ,  वकिली ,  दिवा ,  तालुका   इ.


4]  पण  तत्सम शब्दातील उपान्त्य अक्षरे  दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृत मध्ये असल्याप्रमाणे दीर्घ ठेवावीत.

 उदा.  भीती ,  प्रीती ,  संगीत ,  क्रीडा ,  परीक्षा  इ.

.............................................................................................

No comments:

Post a Comment