LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


नवीन शैक्षणिक धोरणात कशा होतील परीक्षा ......!!

नवीन शैक्षणिक धोरणात कशा होतील परीक्षा ......!! 

----------------------------------

🔰काही ठळक मुद्धे 🔰

---------------------------

🍁नवीन राष्ट्रीय धोरणानुसार मूल्यमापनाच्या  उद्दिष्टात बदल करून ते अधिक नियमित व रचनात्मक केले जाईल.


🍁 नवीन मूल्यमापन हे विद्यार्थ्याचे कौशल्य तपासेल. ते मूल्यमापनाच्या क्षमतेवर आधारित असेल.


🍁 नवीन  शैक्षणिक धोरणातील  मूल्यमापनामधून  विश्लेषण कौशल्य ,  तार्किक विचार  व संकल्पना किती समजली हे तपासले जाईल .


🍁 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय व त्यात निवड करण्याची लवचिकता असेल.


🍁 इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा आहेत तशाच असतील फक्त परीक्षेच्या पद्धती बदललेल्या असतील.


🍁 बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळेल.


🍁 महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनुसार  बोर्डाच्या परीक्षेसाठी  अनेक विषय निवडण्याची मुभा राहील.


🍁  या शैक्षणिक धोरणानुसार एका शालेय शैक्षणिक वर्षामध्ये दोनदा परीक्षेला ( बोर्डाच्या) बसता येईल. म्हणजे एक मुख्य परीक्षा व दुसरी त्यात सुधारणा करण्यासाठी ची परीक्षा.  एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तो पुन्हा परीक्षा देऊ शकेल.


🍁 शाळेतील शिक्षकांना दर्जेदार अध्यापन करणे ही महत्त्वाची अट असेल.


🍁 सध्या पहिली ते आठवीसाठी कोणतीही परीक्षा नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ,  इयत्ता पाचवी  व इयत्ता आठवी साठी परीक्षा होईल.


🍁इयत्ता तिसरीच्या परीक्षा पायाभूत साक्षरता ,  संख्याज्ञान ,  पायाभूत कौशल्य यावर आधारित असतील.


🍁  या होणाऱ्या परीक्षा घोकंपट्टीवर आधारित  नसतील.


🍁 प्रत्येक विषयाची अध्ययन निष्पत्ती (  लर्निंग आउटकम )  विकसित झाली आहे की नाही  हे पाहणारी परीक्षा असेल.


🍁  नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्ती  मुलांनी  आत्मसाद केली की  नाही याची पारख निश्चितपणे केली जाईल.


🍁 शालेय परीक्षांच्या निकालाचा वापर शालेय एकूणच व्यवस्थेच्या विकासासाठी केला जाईल. म्हणजेच एखाद्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नसेल तर संदर्भित वर्गशिक्षकांना '  विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक का नाही ? '  असाही जाब   शिक्षण विभागामार्फत विचारला जाऊ शकतो.

------------------------------------


No comments:

Post a Comment