LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


वाक्यप्रचार व त्याचे अर्थ

🔰वाक्यप्रचार व त्याचे अर्थ🔰
=====================
🔰सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

🔰साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे

🔰सामोरे जाणे - निधड्या छातीने संकटास तोंड देणे

🔰साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे

🔰साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

🔰सुताने स्वर्गाला जाण - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे

🔰सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे

🔰सूतोवाच करणे - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे

🔰संधान बांधने - जवळीक निर्माण करणे

🔰संभ्रमात पडणे - गोंधळात पाडणे

🔰स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे

🔰स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

🔰हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे

🔰हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे

🔰हरभऱ्याच्या झाडावर चढणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे

🔰हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.

🔰हस्तगत करणे  -ताब्यात घेणे.

🔰हातपाय गळणे - धीर सुटणे.

🔰हातचा मळ असणे - सहजशक्य असणे.

🔰हात ओला होणे - फायदा होणे.

🔰हात टेकणे  -नाइलाज झाल्याने माघार घेणे.

🔰हात देणे - मदत करणे.

🔰हात मारणे - ताव मारणे भरपूर खाणे.

🔰हाय खाणे - धास्ती घेणे.

🔰हात चोळणे - चरफडणे.

🔰हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

🔰हात हलवत परत येणे - काम न होता परत येणे.

🔰हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे.

🔰हाता पाया पडणे - गयावया करणे.

🔰हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.

🔰हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे.

🔰हातावर शीर घेणे - जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.

🔰हात धुवून पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

🔰हूल देणे - चकवणे.

🔰पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.

🔰प्रश्नांची सरबत्ती करणे - एक सारखे प्रश्न विचारणे.

🔰प्राण कानात गोळा करणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.

🔰प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न करणे.

🔰फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण करणे.

🔰फुटाण्यासारखे उडणे - झटकन राग येणेवाक्प्रचार.

🔰बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.

🔰ब्रम्हा करणे - बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे.

🔰बारा वाजले - पूर्ण नाश होणे.

🔰बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे.

🔰बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडीत मारणे.

🔰बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.

🔰बेत हाणून पाडणे  बेत सिद्धीला जाऊ न देणे.

🔰बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहते.

🔰बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

🔰बोल लावणे - दोष देणे.

🔰बोळ्याने दूध पिणे - बुद्धिहीन असणे.

🔰बोलाफुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.

🔰भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.

🔰भान नसणे - जाणीव नसणे.

🔰भारून टाकणे  -पूर्णपणे मोहून टाकणे.

🔰मनात मांडे खाणे  -व्यर्थ मनोराज्य करणे.

🔰माशा मारणे - कोणताही उद्योग न करणे.

🔰मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.

🔰मधून विस्तव न जाणे - अतिशय वैर असणे.

🔰मूग गिळणे  -उत्तर न देता गप्प राहणे.

🔰मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.

🔰मनात घर करणे -मनात कायमचे राहणे.

🔰मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.

🔰मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.

🔰मन सांशक होणे - मनात संशय वाटू लागणे.

🔰मनावर ठसण  -मनावर जोरदारपणे बिंबणे.

🔰मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे.

🔰मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.

🔰रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे.

🔰राईचा पर्वत करणे - शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.

🔰राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

🔰राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.

🔰राम नसणे - अर्थ नसणे.

🔰राम म्हणणे - शेवट होणे मृत्यू येणे.

🔰लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

🔰लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे.

🔰लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.

🔰लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे.

🔰लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे.

🔰वकील पत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे.

🔰वाट लावणे - विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे.

🔰वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारले
वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणेे.

🔰वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

🔰वाचा बसणे - एक शब्द येईल बोलता न येणे.

🔰विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.

🔰विसंवाद असणे  - एकमेकांशी न जमणे.

🔰वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुस-यावर काढणे.

🔰विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

🔰वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.

🔰शब्द जमिनीवर पडू न देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

🔰शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

🔰शिगेला पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.

🔰शंभर वर्ष भरणे - नाश होण्याची वेळी घेणे.

🔰श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.

🔰सहीसलामत सुटणे - दोष न येता सुटका होणे.

🔰दगा देणे - फसवणे.

🔰दबा धरून बसणे -टपून बसणेे.

🔰दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

🔰दात धरणे - वैर बाळगणे.

🔰दाढी धरणे - विनवणी करणे.

🔰दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

🔰दातांच्या कन्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

🔰दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

🔰दत्त म्हणून उभे राहणे-  एकाएकी हजर होणे.

🔰दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे.

🔰द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

🔰दात ओठ खाणे - द्वेषाची भावना दाखवणे.

🔰दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.

🔰दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

🔰दातास दात लावून बसणे - काही न खातो उपाशी राहणे.

🔰दुःखावर डागण्या देणे - झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

🔰धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.

🔰धाबे दणाणणे - खूप घाबरणेे.

🔰धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.

🔰धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.

🔰नजरेत भरणे  -उठून दिसणे.

🔰नजर करणे - भेटवस्तू देणे.

🔰नाद घासणे - स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

🔰नाक ठेचणे - नक्शा उतरवणे.

🔰नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.

🔰नाकावर राग असणे - लवकर चिडणे.

🔰नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

🔰नाकी नऊ येणे - मेटाकुटीला येणे फार त्रास होणे.

🔰नांगी टाकणे - हातपाय गाळणे.

🔰नाकाने कांदे सोलणे - स्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे.

🔰नक्राश्रू ढाळण - अंतर्यामी आनंद होत असताना बाह्यतः दुःख दाखवणे.

🔰नक्शा उतरवणे - गर्व उतरवणे.

🔰नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.

🔰पाठीशी घालने - संरक्षण देणे.

🔰पाणी पडणे - वाया जाणे.

🔰पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे.

🔰पाणी पाजणे - पराभव करणे.

🔰पाणी सोडणे - आशा सोडणे.

🔰पदरात घेणे - स्वीकारणे.

🔰पदरात घालने - सुख पटवून देणे स्वाधीन करणे.

🔰पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे.

🔰पाठ न सोडणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे.

🔰पाढा वाचणे - सविस्तर हकीकत सांगणे.

🔰पादाक्रांत करणे -जिंकणे.

🔰पार पाडणे - पूर्ण करणे.

🔰पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.

🔰पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.

🔰पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.

🔰पायाखाली घालने - पादाक्रांत करणे.

🔰पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.

🔰पाठ दाखवणे - पळून जाणे.

🔰पायमल्ली करणे - उपमर्द करणे.

🔰पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे.

🔰पोटात घालने - क्षमा करणे.

🔰पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.

🔰पोटावर पाय देणे - उदर निर्वाहाचे साधन काढून
पदरमोड करणे / दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

🔰पोटाला चिमटा घेणे - पोटाला न खाता राहणे.

🔰चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.

🔰जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

🔰जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे.

🔰जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदार पणे बोलणे .

🔰जिवात जिव येणे- काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे.

🔰जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.

🔰जीव मोठीच धरणे - मन घट्ट करणे.

🔰जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून झाली.

🔰जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

🔰जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.

🔰जीवावर उदार होणे  -प्राण देण्यास तयार होणे.

🔰जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.


🔰जीव खाली पडणे - काळजी मुक्त होणे.

🔰धडा करणे जिवाच्या धडा करणे - पक्का निश्चय करणे.

🔰जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

🔰जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.

🔰जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

🔰जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

🔰जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

🔰जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.

🔰जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे

🔰झाकले माणिक - साधा पण गुणी मनुष्य.

🔰झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

🔰टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

🔰टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

🔰टाके ढीले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

🔰टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.

🔰डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.

🔰डाळ शिजणे  -थारामानी मिळणे आणि सोया जुळणे मनाजोगे काम होणे.

🔰डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

🔰डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.

🔰डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

🔰डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

🔰डोळ्यात धूळ फेकणे  -फसवणूक करणे.

🔰डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणून बुजून दुर्लक्ष करणे.

🔰डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणे.

🔰डोळे निवणे - समाधान होणे.

🔰डोळ्यांत खुपणे - सहन न होणे.

🔰डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

🔰डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे .

🔰डोळे दिपवले - थक्क करून सोडले.

🔰डोळ्यात प्राण आणणे  एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

🔰डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे.

🔰डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.

🔰डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहाने.

🔰तडीस नेणे  -पूर्ण करणे.

🔰ताळ्यावर आनने - योग्य समज देणे.

🔰तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

🔰तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

🔰तिलांजली देणे - सोडणे त्याग करणे.

🔰तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे नाहीसे होणे.

🔰तोंडाला पाने पुसणे - फसवणे.

🔰तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे.

🔰तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरले भयभयीत होणे.

🔰तोंडाला पाणी सुटणे - लालसा उत्पन्न होणे.

🔰त्राटिका - कजाग बायको.

🔰तोंडात बोट घालने  -आश्चर्यचकित होणे.

🔰तोंड ढाकणे - बोलणे.

🔰तोंडावाटे ब्र न काढणे  -एकही शब्द न उच्चारणे.

🔰थांब न लागणे - कल्पना न येणे.

🔰थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

🔰उष्टे हाताने कावळा न हाकण - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.

🔰एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

🔰अंगावर काटे उभे राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

🔰अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

🔰अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

🔰अंथरूण पाहून पाय पसरणे -ऐपती नुसार खर्च करणे.

🔰कणिक तिंबणे - खूप मार देणे.

🔰कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

🔰कपाळमोक्ष होणे - मरण पावणे.

🔰काण फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे.

🔰कागदी घोडे नाचवणे - लेखनात शूरपणा दाखविणे

🔰कानावर हात ठेवणे - माहीत नसल्याचा बहाणा करणे.

🔰कानउघाडणी करणे - शब्दात चूक दाखवून देणे.

🔰काका वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

🔰कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

🔰कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

🔰काट्याने काटा काढणे - शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

🔰काट्याचा नायटा होणे - शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

🔰कावरा बावरा होणे - बावरने.

🔰काळजाचे पाणी पाणी होणे - अति दुःखाने मन विदारण होणे.

🔰कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

🔰कंठस्नान घालने - ठार मारणे.

🔰कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

🔰कंबर कसणे - एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

🔰कुंपणानेच शेत खाणे - ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

🔰केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कप्तान एखाद्याचा घात करणे.

🔰कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

🔰कोपरापासून हात जोडणे - काही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे.

🔰खडा टाकून पहाणे  - अंदाज घेणे.

🔰खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.

🔰खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.

🔰खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.

🔰खडे फोडणे - दोष देणे.

🔰खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

🔰खाजवुन खरुज काढणे - मुद्दाम भांडण करून उकरून काढणे.

🔰खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणार याचे वाईट चिंतेने.

🔰खो घालने - विघ्न निर्माण करणे.

🔰गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.

🔰गळ्यातील ताईत - अतिशय प्रिय.

🔰गळ घालने - अतिशय आग्रह करणे.

🔰गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.

🔰गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.

🔰गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत मार्ग योग्य मार्गाला येणे.

🔰गुजराण करणे - निर्वाह करणे.

🔰गुण दाखवणे - निर्गुण दाखवून दुर्गुण दाखवणे.

🔰गंगेत घोडे न्हाने - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

🔰गळ्यात धोंड पडणे - तिचं असताना जबाबदारी अंगावर पडणे.

🔰गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे.

🔰घडी भरणे - विनाश काळ जवळ येऊन ठेपणे.

🔰घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

🔰घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे.

🔰घाम गाळणे - खूप कष्ट करणे

🔰घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

🔰घोडे मारणे - नुकसान करणे.

🔰घोडे पुढे धामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणेे.

🔰घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

🔰चतुर्भुज होणे - लग्न करणे.

🔰चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

🔰चुरमुरे बाळा खात बसणे - खजील होणे.

🔰चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

🔰अग्निदिव्य करण - कठीण कसोटीला उतरणेे.

🔰अंगद धरणे - लठ्ठ होणे.

🔰अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवला.

🔰अंग काढून घेणे - संबंध तोडणे.

🔰अठराविश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

🔰अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

🔰अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.

🔰अंगाची लाही होणे - खूप राग येणे.

🔰अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

🔰आकाशाची कुराड - आकस्मिक संकट.

🔰अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

🔰अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

🔰अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

🔰अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.

🔰आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.

🔰आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

🔰आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने.

🔰आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.

🔰आकाशाला गवसणी घालने - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

🔰आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

🔰आज लागणे - झळ लागणे.

🔰आपल्या पोळीवर तूप ओढणे - स्वतःचा फायदा करून घेणे.

🔰आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.

🔰उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

🔰इतिश्री करणे - शेवट करणे.

🔰उखाळ्या-पाखाळ्या काढणे - एकमेकांची उणीदुणी काढणे किंवा दोष देणे.

🔰उचलबांगडी करणे-एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

🔰उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे दूरवरून निर्देश देणे स्वतः सामील न होता सल्ले देणे.

🔰उदक सोडले - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

🔰उध्वस्त होणे - नाश पावणे.

🔰उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

🔰उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

🔰उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.

🔰उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.

🔰उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

🔰निवास करने - रहाणे.

🔰दुमदुमून जाणे - निनादून जाणे.

🔰सांगड सांगड घालने - मेळ साधने.

🔰प्रेरणा मिळणे - स्फूर्ती मिळणे.

🔰नाव मिळवणे - कीर्ती मिळवणे.

🔰हात न पसरणे - न मागणे.

🔰आड येणे  -अडथळा निर्माण करणे.

🔰धन्य होणे - कृतार्थ होणे.

🔰उदास होने - खिन्न होणे.

🔰विहरणे - संचार करणे.

🔰बाबरने - गोंधळणे.

🔰वाट तुडवणे - रस्ता कापणे.

🔰पाहुणचार करणे - आदरातिथ्य करणे.

🔰अनमान करणे - संकोच करणे.

🔰ताट वाढणे - जेवायला वाढणे.

🔰तोंडीलावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.

🔰छोटे शाई चालवणे - दांडगाई करणे.

🔰लांछनास्पद असणे  -लाजिरवाणी असणे.

🔰सुळकांडी मारणे - सूर मारणे.

🔰मागमूस नसणे - थांगपत्ता नसणे.

🔰अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

🔰कंपित होणे - कापणे थरथरणे.

🔰बेत आखणे - योजना आखणे.

🔰यक्षप्रश्न असणे - महत्त्वाची गोष्ट असणे.

🔰प्रस्ताव ठेवणे - ठराव मांडणे.

🔰विरोध दर्शवणे  - प्रतिकार करणे.

🔰प्राप्त करणे - मिळवणे.

🔰गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.

🔰सारसरंजाम असणे - सर्व साहित्य उपलब्ध असणे.

 🔰हाडीमांसी भिनने -अंगात मुरणे.

🔰स्तंभित होणे - आश्चर्याने स्तब्ध होणे.

🔰मान्यता पावणे - सिद्ध होणे.

🔰तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे.

🔰कहर करणे - अतिरेक करणे.

🔰कोडकौतुक होणे - लाड होणे.

🔰अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

🔰रुची निर्माण होणे - गोडी निर्माण होणे.

🔰गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र रहाणे.

🔰कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.

🔰कसं लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.

🔰वरदान देणे - कृपाशीर्वाद देणे.

🔰आत्मसात करणे - मिळवणे अंगी बाणवणे.

🔰रियाज करणे - सराव करणे.

🔰पाठिंबा देणे - दुजोरा देणे.

🔰चेहरा खोलने - आनंद होणे.

🔰छाननी करणे - तपास करणे.

🔰अवाक होणे - आश्चर्यचकित होणे.

🔰ओढा असणे - कल असणे.

🔰समरस होणे - गुंग होणे.

🔰प्रतिष्ठान लाभणे - मान मिळवणे.

🔰डाव येणे - खेळात राज्य येणे.

🔰मात करणे - विजय मिळवणे.

🔰सहभागी होणे - सामील होणे.

🔰फिदा होणे - खुश होणे.

🔰दिशा फुटेल- तिकडे पडणे  सैरावैरा पळणे.

🔰ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.

🔰हवालदील होणे - हताश होणे.

🔰मनावर बिंबवणे - मनावर ठसवणे.

🔰धुडगूस घालने - गोंधळ घालून करणे.

🔰सपाटा लावणे - एक सारखे वेगात काम करणे.

🔰किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

🔰खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे टाळाटाळ करणे.

🔰मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या आसक्ती मध्ये वाहून जाणे.

🔰हाऊस मागवणे -आवड पुरवून घेणे.

🔰स असणे - अत्यंत आवड असणे.

🔰राबता असणे - सतत ये-जा असणे.

🔰फंदात न पडणे - भानगडीत न अडकणे.

🔰नाव कमावणे - कीर्ती मिळवणे.

🔰बहिष्कार टाकणेे -वाळीत टाकणे नकार देणे.

🔰कारवाया करणे  कारस्थाने करणे.

🔰कट करणे - सख्य नसणे मैत्री नसणे.

🔰निद्राधीन होणे - झोपणे.

🔰प्रत्यय येणे - प्रचीती येणे.

🔰रवाना होणे - निघून जाणे.

🔰देखभाल करणे - जतन करणे.

🔰डोळे फिरले - खूप घाबरणे.

🔰पाळी येणे - वेळे येणे.

🔰दडी मारणे - लपून राहणे.

🔰विसावा घेणे  - विश्रांती घेणे.

🔰व्रत घेणे - वसा घेणे.

🔰प्रतिकार करणे - विरोध करणे.

🔰झुंज देणे लढा देणे - संघर्ष करणे.

🔰अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

🔰टिकाव लागणे - निभाव लागणे.

🔰तगून राहणे - मुखोद्गत असणे.

🔰हशा पिकणे - हास्य स्फोट होणे.

🔰दिस बुडून जाणे - सूर्य मावळणे.

🔰वजन पडणे - प्रभाव पडणे.

🔰भडभडून येणे -हुंदके देणे गलबलले.

🔰वनवन करणे- खूप भटकणे.

🔰देहातून प्राण जाणे - मरण येणे.

🔰हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.

🔰वाऱ्यावर सोडणे - अनाथ करणे.

🔰बत्तर बाळ्या होणे - चिंध्या होणे नासधूस होणे.

🔰प्रक्षेपित करणे - प्रसारित करणे.

🔰बेत करणे - योजना आखणे.

🔰पदरी घेणे - स्वीकार करणे.

🔰भ्रमण करणे - भटकंती करणे.

🔰देखरेख करणे - राखण करणे.

🔰उदास होणे - खिन्न होणे.

🔰उत्पात करणे - विध्वंस करणे.

🔰अभंग असणे - अखंड असणे.

🔰ललकारी देणे - जयघोष करणे.

🔰रोज ठेवणे चिडणे - नाराजी असणे.

🔰तोंड देणे - मुकाबला करणे सामना करणे.

🔰प्राणाला मुकले -  जीव जाणे मरण येणे.

🔰मती गुंग होणे - आश्चर्य वाटणे.

🔰आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहण.

🔰लळा लागणे - ओढ वाटणे.

🔰आंबून जाणे - भेटून जाणे थकणे विपर्यास होणे.

🔰डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे.

🔰कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.

🔰हसता हसता - पोट दुखणे खूप हसणे.

🔰बस्ती घेणे - धक्का घेणे घाबरणे.

🔰घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.

🔰प्रचारात आणणे - जाहीरपणे माहिती देणे.

🔰ठसा उमटवणे - छाप पाडणे.

🔰चक्कर मारणे - फेरफटका मारणे.

🔰दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे.

🔰अमलात आणणे - कारवाई करणे.

🔰प्रतिष्ठापीत करणे - स्थापना करणे.

🔰ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.

🔰धडपड करणे - खूप कष्ट करणे.

🔰सूड घेणे - बदला घेणे.

🔰चाहूल लागणे - मागोवा लागणे.

🔰विरस होणे - निराशा होणे उत्साहभंग होणे.

🔰ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.

🔰परिपाठ असणे - विशिष्ट पद्धत असणे नित्यक्रम असणे.

🔰छातीत धस्स देशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.

🔰आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

🔰नाळ तोडणे - संबंध तोडणे.

🔰वारसा देणे - वडिलोपार्जित हक्क सोपवणे.

🔰अप्रूप वाटणे  -आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

🔰तारांबळ होणे - घाईगडबड होणे.

🔰जम बसने - स्थिर होणे.

🔰बस्तान बसणे - पसंती मिळणे अनुकूलता लाभणे.

🔰मराठी भरारी मारणे - झेप घेणे.

🔰पार पाडणे - सांगता करणे.

🔰संपवणे-  संपन्न होणे.

🔰आयोजित करणे - सिद्धता करणे प्रभावित होणे.

🔰छाप पडणे - परिसीमा गाठणे .

🔰राकोटीला जाणे - काळ्यापाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे.

🔰प्रघात पडणे - रीत असणे.

🔰बाहू स्फुरण पावणे -स्फूर्ती येणे.

🔰भान ठेवणे - जाणीव ठेवणे.

🔰नजर वाकडी करणे - वाईट हेतू बाळगणे.

🔰गट्टी जमणे - दोस्ती होणे.

🔰पहारा देणे - राखण करणे.

🔰लवलेश नसणे - जराही पत्ता नसणे जराही न होणे

🔰उपोषण करणे - लंघन करणे उपाशी राहणे.

🔰ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.

🔰खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

🔰समजूत काढणे - समजावणे हेवा वाटणे.

🔰मत्सर वाटणे - काळजी घेणे.

🔰चिंता वाहने - आस्था असणे.

🔰बडेजाव वाढवणे - प्रौढी मिरवणे.

🔰वंचित रहाणे -एखादी गोष्ट न मिळणे.

🔰भरभराट होणे -प्रगती होणे समृद्धी होणे.

🔰बांधणी करणे - रचना करणे.

🔰कटाक्ष असणे - कल असणे.

🔰भर असणे - जोर असणे.

🔰पुढाकार घेणे - नेतृत्व करणे.

🔰हातभार लावणे - सहकार्य करणे.

🔰कणव असणे - आस्था किंवा करून असणे.

🔰गढून जाणे - मग्न होणे गुंग होणे.

🔰काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

🔰मिशांना तूप लावणे - उगीच ऐट दाखवणे.

🔰अंगाला होणे - अंगाला छान बसणे.

🔰अंगी ताठा भरणे - मग्रुरी करणे.

🔰पोटात ठेवणे - गुप्तता ठेवणे.

🔰अठरा गुणांचा  खंडोबा -लबाड माणूस.

🔰धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा.

🔰जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.

🔰डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.

🔰कुणकुण लागणे - चाहूल लागणे.

🔰कच्छपी लागणे - नादी लागणे.

🔰धिंडवडे निघणे - फजिती होणे.

🔰बाजार गप्पा - निंदानालस्ती.

🔰अंगावर काटा येणे - भीती वाटणे.

🔰जीव वरखाली होणे - घाबरणे.

🔰उसंत मिळणे - वेळ मिळणे.

🔰चितपट करणे - कुस्ती हरविणे.

🔰फटफटती सकाळ होणे - पोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे.

🔰डोळे वटारणे - रागाने बघणे.

🔰दक्षता घेणे  -काळजी घेणे.

🔰साशंक होणे - शंका येणे.

🔰ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यात उदाहरण नसणे.

🔰भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे शुद्धीवर येणे.

🔰निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे.

🔰वाचा बंद होणे -तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे.

🔰तोंड भरून बोलणे - खूप स्तुती करणे.

🔰गाजावाजा करणे - खूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

🔰नूर पातळ होणे - रूप उतरणे.

🔰सने बळ आणणे  - खोटी शक्ती दाखविणे.

🔰उताणा पडणे - पराभूत होणे.

🔰खितपत पडणे - क्षीण होत जाणे.

🔰भाऊबंदकी असणे - ना त्यांना त्यात भांडण असणे

🔰सांजावने - संध्याकाळ होणे.

🔰कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडले.

🔰भंडावून सोडले - त्रास देणे.

🔰खायचे वांदे होणे - उपासमार होणे खायला न मिळणे.

🔰तगादा लावणे - पुन्हा पुन्हा मागणी करणे.

🔰पडाव पडणे - वस्ती करणे.

🔰चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.

🔰लष्टक लावणे - झंझट लावणे निकड लावणे.

🔰ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

🔰पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.

🔰अनभिज्ञ असते - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे.

🔰कूच करने - वाटचाल करणे.

🔰संभ्रमित होणे - गोंधळणे.

🔰विदीर्ण होणे - भग्न होणे मोडतोड होणे.

🔰साद घालने - मनातल्या मनात दुःख करणे.

🔰वेसन घालने - मर्यादा घालने.

🔰बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे.

🔰रक्षणाची काळजी घेणे - योगक्षेम चालविणे.

🔰मिनतवारी करणे - दादा पुता करणे.

🔰गाजावाजा करने - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

🔰उसने बळ आनने - खोटी शक्ती दाखविणे.

🔰उताणे पडणे - पराभूत होणे.

🔰कानशिलं ची भाजी होणे - मारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे.

🔰हीच काय दाखविणे - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.

🔰दातखिळी बसणे - बोलती बंद होणे.

🔰नाक मुठीत धरणे - अगतिक होणे.

🔰काळीज उडणे - भीती वाटणे.

🔰नसती बिलामत येणे -नसती कटकट ओढणे.

🔰पिंक टाकणे -थुंकणे.

🔰सख्या नसणे  प्रेमळ नाते नसणे.

🔰चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे.

🔰आंदण देणे - देऊन टाकणे.

🔰मनोरथ पूर्ण होणे - इच्छा पूर्ण होणे.

🔰पुनरुज्जीवन करणे  -पुन्हा उपयोगात आणणे.

🔰निष्प्रभ करणे - महत्व कमी करणे.

🔰अट्टहास करणे - आग्रह धरणे.

🔰बळ लावणे - शक्ती खर्च करणे.

🔰हुडहुडी भरणे - थंडी भरणे.

🔰उच्छाद मांडला- धिंगाना घालने.

🔰सही ठोकणे - निश्चित करणे.

🔰माशी शिंकणे  -अडथळा येणे.

🔰पाचवीला पूजले - एखादी गोष्ट जन्मापासून असणे.

🔰तजवीज करणे - तरतूद करणे.

🔰प्रतिबंध करणे - अटकाव करणे.

🔰जळफळाट होणे - रागाने लाल होणे.

🔰डोक्यावर घेणे - अति लाड करणे.

🔰देणे-घेणे नसणे - संबंध नसणे.

🔰बस्तान ठोकणे - मुक्काम ठोकणे.

🔰आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.

🔰आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.

No comments:

Post a Comment