LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


अभिनंदन / शुभेच्छापत्र

अभिनंदन / शुभेच्छापत्र  

------------------------------------

🔰ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे , त्या व्यक्तीबद्दल , त्याच्या कामाबद्दल सर्व माहिती असावी.


🔰पुरस्काराबद्धल पत्र लिहावयाचे असल्यास पुरस्काराचे त्या त्या क्षेत्रातील महत्व  , तो नेमका कशासाठी दिला जातो , त्याचे स्वरूप इ.विषयी आपणास सविस्तर माहिती असावी .


🔰 एखाद्या विशिष्ठ पदावर , जागेवर झालेली निवड / नेमणूक इ.अशावेळी ते मानाचे पद  , त्याचे अधिकार , त्याच्या जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती असावी.


🔰 कुठल्या नात्याने आपण पत्र लिहित आहात , याचे भान असावे.

उदा. मंडाळाचा अध्यक्ष  , मंडळाचा कार्याध्यक्ष , एक नागरिक , क्रीडा मंडळाचा अध्यक्ष इ . प्रश्नाच्या स्वरूपानुसार , तसा स्पष्ठ उल्लेख पत्रात असावा.


🔰प्रेषकाला मनापसून आंनद झाला आहे , समाधान वाटते आहे , अभिमान वाटतो आहे , हे या शुभेच्छापत्रातून व्यक्त व्हावे.


🔰पत्र पाठवणाऱ्याचे त्या व्यक्तीबद्दल चे मत , भावना तसेच त्या व्यक्तीची कामगिरी नेमक्या शब्दात  व प्रभावीपणे मांडता यावी.


🔰 एकंदर समाजातील - जनमानसातील भावना , मत , प्रभाव , परिणाम , यांचाही थोडक्यात उल्लेख पत्रात असावा.

-------------------------------------

No comments:

Post a Comment