LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


पत्र लेखन - प्रकार व मांडणी

🔰पत्र लेखन - प्रकार व मांडणी🔰

------------------------------------

आपल्या मनातील विचार , मते , भावना अभिव्यक्त करायचे माध्यम म्हणजे  ' बोलणे '. हे सर्व अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे " पत्रलेखन ......! ".

पाहूया पत्र लेखनाचे प्रकार :: - 

[ अ ] औपचारिक पत्रे 

[ ब ] अनौपचारिक पत्रे 

-------------------------------------

📋औपचारिक पत्रांची मांडणी कशी असावी ?

📒पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे  नाव , हुद्धा  , व पत्ता असावा.

📒पत्यानंतर योग्य तो दिनांक , ई-मेल , मोबाईल क्रमांक असावा.

📒डावीकडे योग्य तो मायना असावा. संबंधित व्यक्तीचे नाव , हुद्धा व थोडक्यात पत्ता असावा.

📒विशेषनाम पत्रात असेल तर ते लिहावे.अन्यथा प्रति , प्रेषक या ठिकाणी अ , ब , क असा उल्लेख करावा.

📒विषय - औपचारिक पत्रात " विषय " लिहणे अत्यावश्यक ठरते. विषयानुसार पत्राचा हेतू संबंधित त्रयस्थ व्यक्तीच्या पटकन लक्षात येतो. त्यामुळे नेमका विषय लक्षात येतो.

📒 महोदय  / महोदया असे लिहून पत्रलेखनाला सुरुवात करावी.

📒पाल्हाळीकपणा  करता   तरीही सविस्तरपणे नेमक्या शब्दात विषयविस्तार करावा.

📒2 ते 3 परिच्छेदात नेमक्या शब्दात विषयविस्तार करावा.

📒सगळ्यात शेवटी आपला / आपली कृपाभिलाषी / आज्ञार्थी यापैकी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.

-------------------------------------

📋  अनौपचारिक  पत्रांची मांडणी कशी असावी ?

📒अनौपचारिक पत्र लिहण्याचे विशिष्ठ असे नियम-संकेत नाहीत.

📒 उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक , वार , गावाचे नाव लिहावे .

📒 मध्यभागी ओम /श्री असेही लिहण्यासाची प्रथा आहे.

📒डावीकडे प्रिय / तीर्थरूप  / आदरणीय इ. योग्य  भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात करावी.

📒 शेवटी व्यक्तीनुसार नमस्कार , आशीर्वाद  लिहून तुझा / तुझी / तुमचा इ. लिहून समारोप करावा.

📒 पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी , गप्पा मारल्यासारखी साधी -सोपी  , मनमोकळी असावी. वर्णनात्मक , खेळकर  , दिलखुलास , आपलेपणाची असावी .

-------------------------------------

No comments:

Post a Comment