LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


अक्षय तृतीया

 अक्षय तृतीया

-----------------------------------

हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्ययोनीत जन्माला येणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करुन घेण्याची तीएक मोठी संधी असते. मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तर्‍हेने उपयोग करुन घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्याच त्या फेऱ्यात फिरत राहतो. अक्षयतृतीस या दिवसाचे महत्त्व असे आहेकी या दिवशी भूकेल्याला अन्न, तहानेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र याप्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते. अशी समजूत आहे. मात्र अक्षयतृतीयेचा अर्थ ह्याहून व्यापक आहे. हा दिवा खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आग, तेज, वायु व आकाश या पंचमाहाभुतांविषयी. कारण त्यांच्या साह्यानिच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते. आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्या मनुष्य देहाचं दान मिळालेल आहे. म्हणूनच अक्षयतृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान, करण्यात येते.

वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भूत असते. चित्राचे बोट आलेला वसंतऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो.

वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली, म्हणूनही हा अतिशय शुभदिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत महुर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, योग्य मुहूर्तावर सुरु केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळत असे मानतात. अक्षय्य याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. अक्षयतृतीयाच्या दिवशी अगदी गुंजभर वा १ ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते म्हणून अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते.

धार्मिक रीतीवाजांनुसार अक्षय्यतृतीयाच्या दिवशी आपले दिवगंत आई-वडील, आजी-आजोबा वा आप्त स्वकीय जलदान-अन्नदानवाटपा निमित्ताने गावातील, शहरातील अनाथालये, वृद्धाश्रम, शिक्षणलय, रुग्णसेवा संस्था, यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षयतृतीयाचा सण साजरा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो.

संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र-वैशाख या दोन महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते. परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एकाच दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस आहे अक्षय्य तृतीयेचा. अक्षयतृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. तरी विदर्भात या दिवसाला दिवाळी सणासारखे महत्त्व आहे. गरिबतला गरीब माणुसही आपल्यापरीने नांगरणीला सुरवात करतात. नांगराची पूजा करून शेतीच्या कामाला सुरवात करण्यात येते. कृषीक्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय्य तृतीया हा अक्षय्य – उंदड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.

--------------------------------

No comments:

Post a Comment