LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


शब्दयोगी अव्यय

 


 शब्दयोगी अव्यय

..............................................................................

 वाक्यातील शब्दाला जोडून येणाऱ्या व दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविणार्‍या अविकारी शब्दाला "  शब्दयोगी अव्यय  " असे म्हणतात.

 💥शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाहीत.

 💥ते शब्दांना जोडून येऊन त्यांचा  त्याच वाक्यातील ुसर्‍या एखाद्या  शब्दाशी संबंध जोडतात.

 💥शब्दयोगी अव्यय नसती तर ,  त्या वाक्याचा अर्थ नीट लागला नसता.

💥 शब्दयोगी अव्यय व त्यांच्या रूपांमध्ये लिंग , वचन , विभक्ती  , पुरुष , यामुळे बदल होत नाही .

उदा - 

1 ]  टेबलाखाली पुस्तक आहे.

2] खुर्चीमागे कपाट आहे.

3] सुर्य ढगामागे लपला.

4]  झाडापुढे खेळ मांडला.

5 ] शाळेसमोर मुले खेळत होती.

 महत्वाचे- शब्दयोगी अव्यय सामान्यतः  नामांना जोडून येतात.

 उदा- 

राजूकडे चेंडु होता.

 शाळेसमोर खेळ सुरू होता.

 तसेच

  शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषण  यांनाही कधीकधी जोडून येतात.

 उदा-

 येईपर्यंत ,  बसल्यावर ,  जाण्यापेक्षा ,  थोडासुद्धा ,  परवापासून ,  बोलण्यामुळे   इत्यादी.

............................................................................


1 comment:

  1. अतिशय सोप्या पद्धतीने समजून दिले आहे.अशीच माहिती देत जावे .धन्यवाद

    ReplyDelete