LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


विशेषण

 


  विशेषण

..........................................................................

 नामाबद्दल विशेष  माहिती सांगून नामाची  व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास ' विशेषण ' असे म्हणतात.

 नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला '  विशेषण ' असे म्हणतात.

 - विशेषण हे नामा बद्दल अधिक माहिती सांगते नामाची व्याप्ती मर्यादित करते व ते साधारणपणे   नामा पूर्वी येते.

---------------------------------------------------

 विशेषणाचे प्रकार

1 ]  गुणविशेषण

2]  संख्या विशेषण

3]  सार्वनामिक विशेषण

4 ] 

 अशाप्रकारे विशेषणाचे प्रकार पडतात.

 गुणविशेषण

 ज्या विशेषणाच्या  योगाने  नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात.

 नामाचा गुण किंवा विशेष दाखवणारा गुणवाचक शब्द.

 उदा-

 काळा ,   हिरवा ,  आंधळा ,  श्रीमंत  ,   हुशार 

 आंबट बोरे ,  शुभ्र ससा ,  मोठी मुले ,  शूर सरदार ,  रेखीव चित्र ,  निळासावळा झरा.

----------------------------------------------------

 संख्याविशेषण

 ज्या विशेषणाचा योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात.

 उदा-

 दोन ,  सात ,   आठवा ,  थोडी ,  पुष्कळ.

 पहिला वर्ग ,  चौथा बंगला ,  साठावे वर्ष.

..........................................................................

 सार्वनामिक विशेषण

 सर्वनामांचा उपयोग  विशेषणासारखा होणारा शब्द.

 उदा-

 ते झाड ,  , तो मुलगा ,  ही वाट ,  ही सायकल.

 हा मनुष्य , तो पक्षी ,  माझे पुस्तक ,  कोणता गाव

 वरील शब्दांमध्ये  हा ,  ते ,  तो ,  माझे ,  ही   मूळची सर्वनामे आहे. 

 ती आलेली सर्वनामे आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणाचे कार्य करतात.

.............................................................................

धातुसाधित विशेषणे-

 धातू पासून कृदंतरूप बनते  . जेव्हा कृदन्त रूपाचा वाक्यात विशेषणासारखा  उपयोग होतो , तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात.

 उदा- 

 हसरी मुले ,  चेहरा बोलका ,  सडलेली फळे

 पिकलेला आंबा ,  रांगणारे  मुल ,  वाहती नदी

............................................................................

  नामसाधित विशेषणे

  नामांपासून तयार केलेल्या  विशेषनांना नामसाधित विशेषणे म्हणतात.

उदा -

 माझा मित्र पुस्तक विक्रेता होता.

 मी आज साखर -काकडी खाल्ली.

 दादाला फळ -भाजी फार आवडते.

 वरील वाक्यात साखर , पुस्तक , फळ ही मूळची नावे आहेत.

 पण वरील वाक्यात ती त्यांच्यापुढे आलेल्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणजेच ती  विशेषणांचे कार्य करतात.

.............................................................................

  अव्ययसाधित विशेषणे

 काही विशेषणे  अव्ययांपासन  तयार झालेली असतात  त्यांना अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.

 उदा - 

वरचा मजला

 खालची गाडी

 मागील दार

 पुढची गल्ली

...........................................................................

 अधिविशेषण व विधीविशेषण

 नामापूर्वी येणाऱ्या  विशेषणाला अधिविशेषण असे म्हणतात.

 विशेषण  विशेष्याच्या आधी आल्यास अधिविशेषण म्हणतात.

 उदा- 

शहाणी मुले हुशार असतात.

 नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधीविशेषण म्हणतात.

विशेषण  विशेष्याच्या नंतर आल्यास अधिविशेषण म्हणतात.

 उदा-

 मुले शहाणी आहेत.

........................................................................

No comments:

Post a Comment