अलंकार व त्याचे प्रकार
--------------------------
ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार म्हणतात. जसे एखाद्या स्त्री चे सौंदर्य तिने परिधान केलेल्या दागिन्यामुले खुलते. तसेच सौंदर्य भाषेला अलंकाराने येते.
अलंकारांचे दोन प्रकार आहेत.
१. शब्दालंकार
२. अर्थालंकार
शब्दालंकार : कधी कधी शब्द, वर्ण, अक्षरे यांची रचना अत्यंत आकर्षकपणे कबी लेखक करतात. अशा पद्धतीने जे अलंकार साधले जातात ते शब्दालंकार होत.
अर्थालंकार : कपी कधी शब्द तोडून शब्दातील अर्थाची रचना खुबीदारपणे केली जाते. अशा रीतीने जे अलंकार साधले जातात ते अर्थालंकार होत.
१. शब्दालंकार
१. अनुप्रास : जेव्हा वाक्यात तेच तेच अक्षर किंवा वर्ण वरचेवर आल्यामुळे जी एक चमत्कृती साधते व त्यामुळे सुंदरता निर्माण होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात.
उदा.
१. पंचपतिव्रतांनी पुण्यसंपादनासाठी प्रत्यही तुझी पूजा करावी - प अक्षराची पुनरावृत्ती.
२. फदफड करूनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती । सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती ।।
(र, ह, प, ब अक्षरांची पुनरावृत्ती)
२. यमक : कवितेच्या एका चरणाच्या शेवटी एखादे अक्षर किंवा समूह येतो तोच दुसन्या ओळीत शेवटी वेगळ्या अर्थाने येतो तेव्हा यमक अलंकार होतो.
उदा.
१. नभ सोनाळले तशी पायी घुंगुरली सांज माझी जखम नेसली कुण्या स्मरणाचा साज
२. जगाचा भला धोरला हा पसारा । तुला वाटला काय नि:सार सारा ।।
२. अर्थालंकार
१. उपमा : उपमा देताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
(अ) ज्याला उपमा द्यावयाची त्याला उपमेय म्हणतात.
(ब) ज्याची उपमा द्यावयाची त्याला उपमान म्हणतात.
(क) दोहोंत साम्य दाखविणान्या शब्दास साधर्म्यवाचक शब्द म्हणतात.
उदा.
तिचे मुख चंद्रासारखे आहे.
( येथे मुखास उपमा द्यावयाची म्हणून मुख शब्द उपमेय होय. त्यास चंद्राची उपमा द्यावयाची म्हणून चंद्र शब्द उपमान होय. सारखे हा शब्द साधर्म्यवाचक शब्द होय. )
१. सहानुभूती ही सोन्यासारखी आहे.
२. शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते.
३. जसे मांजरीचे दात तिच्या पिलांना बोचत नाहीत, तसे आईचे अपशब्द पोरांचे आशीर्वाद असतात.
४. त्यामधील रस्ते शरीरातील नसाप्रमाणे दिसत होते.
५. "चित्रपटकट असे शिशुभाषण येईल काय कामा ।"
२. उत्प्रेक्षा : दोन वस्तूंमधील सारखेपणामुळे एक वस्तू ही जणू दुसर्यासारखी आहे असे वर्णन आले अपता उत्प्रेक्षा अलंकार होतो. (उपमेय हे जणू उपमान आहे) या
अलंकारात जणू, वाटते, भासे, गमे असे शब्द योजलेले असतात.
उदा.
१. खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरीबरती ।
देवदर्शना जणू चालल्या भाविक या तरुणी ।
२. गवत डुले केवि आता
प्राणमया जणू कविता
हिरवळते लसलसते तरुण जीवनाची
उघड उर्मिले कवाड उजळतसे प्राची
३. रूपक : उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन जेव्हा येते म्हणजेच एक वस्तू व दुसरी वस्तू यांत काहीच भेद नाही, त्या एकरूप आहेत असे वर्णन असते तेव्हा रूपक अलंकार होतो.
उदा.
१. प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
(प्राप्तकाल हाच एक विशाल पर्वत आहे.)
२. तुम्ही दिलेले औषध हे अमृत होय. (औषध व अमृत यांत अभेद दाखवला आहे.)
३. त्याच्या मनावर रक्ताचे पिंपळपान उमटले.
४. माणुसकीचे हे गौरीशंकर आपल्याला गाठावयाचे आहे.
४. श्लेष : जेव्हा खुबीने एक शब्द असा वापरला जातो की त्याचे भिन्न अर्थ होऊ शकतात तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा.
१. औषध नलगे मजला ।
नलगे = लागत (जस्सी) नाही, दुसरा अर्थ नल राजाचे दर्शन हेच माझे औषध,
२. शंकरास पूजिले सुमनाने ।
सुमन = फूल, चांगले पवित्र मन
३. असा पक्षी लक्षी बहुविहग लक्षी न उडता ।
लक्षी = पाहून, एक लाखात.
५. अनन्वय : उपमेय हे उपमेयासारखेच होय. त्याला दुसर्या कशाचीच उपमा देतायेत नाही, असे वर्णन आले की अनन्वय अलंकार होतो.
उदा.
१. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
(ताजमहालासारखा ताजमहाल असे वर्णन आहे.)
२. तुलाच ध्यावे, तुलाच गावे, तुला पुजावे आई जगात अवघ्या तुझ्यासारखे दुसरे दैवत नाही.
(आईसारखी आईच असे वर्णन आहे.)
६. अपन्हुती : वस्तू पाहूनही ती वस्तू नसून दुसरीच आहे म्हणजेच उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन आले असता अपन्हुती अलंकार होतो.
उदा.
१. हे जीवन कसले ही तर मरणांची माला
जीवन हे जीवन नाही तर मरणांचीच माला आहे.
२. न हे नयन पाकळया उमलल्या सरोजातिल
डोळे हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्या आहेत.
३. ही फाटकी झोपडी, झोपडी नाही तर माझे काळीजच आहे.
४. पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी.
७. व्यतिरेक : उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे वर्णन आले असता व्यतिरेक अलंकार होतो.
उदा.
१. "जणु म्हणती शब्द तिचे आम्ही कोकिलरवासही जिंकू" तिचे शब्द (उपमेय) हे कोकिळेच्या आवाजापेक्षा ( उपमान)गोडपणात श्रेष्ठ आहेत.
२. सोन्याहुनी पिवळे ऊन
३. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
४. तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ पाणियाहुनि पातळ, कल्लोळ प्रेमाचा ।
८. अतिशयोक्ती : बाक्यातील मूळ कल्पना आहे त्यापेक्षा फारच फुगवून सांगितलेी असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.
उदा.
१. जो अंबरी उधळता खुर लागलाहे ।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ।
जो या यशास्तव कसे धवलत्व नेये।
शृंगारिला हय तयावरि वेगे ।
नळराजाचा घोडा आकाशात उधळल्यामुळे त्याच्या टापेमुळे चंद्रावर डाग निर्माण झाला
आहे असे अतिशयोक्त वर्णन आहे.
२. वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले. ३. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा ?
९. अर्थांतरन्यास : जेव्हा सामान्य सिद्धांताच्या समर्थनासाठी विशेष गोष्टीचे उदाहरण दिले जाते किंवा विशेष गोष्टीच्या समर्थनासाठी सामान्य सिद्धांत सांगितला जातो तेव्हा त्याला अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात.
उदा.
१. वृक्ष फार लवती फलभारे
लोंबती जलद पेऊनि नीरे
थोर गर्व न धरि विभवाचा
हा स्वभाव उपकार-पराचा
थोर व्यक्ती नम्र असतात, त्यांना गर्व नसतो हे स्पष्ट करण्यासाठी वृक्ष व ढग यांची विशेष उदाहरणे दिली आहेत.
२. देखूनी उदया तुझ्या द्विजकुले गाती अती हर्षुनी ।
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरी जाऊनी
देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभी भास्करा ।
अत्युच्ची पदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा ।।
येथे कवीने सर्वश्रेष्ठ पदावर गेल्यावर धोरसुद्धा बिघडतात हा सामान्य नियम काढला आहे.
१०. स्वभावोक्ती : एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे, स्थळाचे वा अविर्भावाचे हुबेहूब वर्णन कवी करतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो.
उदा.
१. मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उपडी पद लांबवीले
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ॥
(गतप्राण झालेल्या पक्ष्याचे हुबेहूब वर्णन येथे कवीने केले आहे.)
११. अन्योक्ती : एखाद्यास उद्देशून जे बोलावयाचे ते त्याचा उल्लेख न करता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचे याला अन्योक्ती म्हणतात.
बोडक्यात लेकी बोले सुने लागे.
उदा.
१. सरळ्याची धाव कुंपणापर्यंत
२. सांबाच्या पिंडीते बससि अधिष्ठून वृश्चिका आज ।
विंचू पिंडीवर असल्याने मारता येत नाही पण तेथून खाली उतरल्यावर त्याला मारता येते. दुष्ट माणसे जोपर्यंत एखाद्या बड्या माणसाच्या आश्रयास असतात तोवर काही करता येत नाही. पण तो आश्रय दूर होताच त्यांना प्रायश्चित ध्याये लागते. अशा लोकांना उद्देशून वरील उक्ती आहे.
१२. चेतनगुणोक्ती : अचेतन, जड, निर्जीव वस्तू या सजीव (बेतन) असल्यप्रमाणे आरोप करून जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा, चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
उदा.
१. कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊनि बाळे ।
२. उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमेंट्रो खाऊन रस्ता तृप्त झाला. (रस्ता हा निर्जीव पण सजीवाप्रमाणे तो खातो हा आरोप.)
३. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले.
४. गाऊ लागले मंगल पाठ सृष्टिचे गाणारे भाट
५. चक्री वारं अंगाभोवती पुमत पुमत निषून गेलं
६. "आला हा दारी उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौंदर्याचे देईल ज्याचे त्याला."
१३. दृष्टांत : एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी जो दाखला किंवा उदाहरण दिले जाते त्यास दृष्टांत अलंकार असे म्हणतात.
उदा.
१. हे पाखरू मजसि येईल काय कामा ।
ऐसे नृपा न बद पूरितलोक कामा ।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी ।। छाया करी तपनदीप्तिस ही निवारी ॥
No comments:
Post a Comment