🔰भूमितीचे मूलभूत संबोध🔰
============================
🔰बिंदू : [ . ]🔰
🔯अतिशय अणकुचीदार अशा टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो.
🔯बिंदू नाव देण्यासाठी इंग्रजी Capital अक्षरांचा उपयोग करतात.
🔯उदा. A , B , C ...................
===========================
🔰रेषा🔰
🔰रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते.
🔰रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते हे दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाणांच्या खुणा केलेल्या असतात.
🔰रेषेची लांबी मोजता येत नाही.
🔰रेषा अनंत बिंदूनी बनलेली असते.
🔰रेषेवरील कोणत्याही दोन बिंदुंच्या नावावरून त्या रेषेला नाव दिले जाते.
उदा-रेषा PQ किंवा QP
🔰कधी कधी एकाच अक्षराने रेषा ओळखली जाते.
उदा-रेषा M
===========================
🔰प्रतल🔰
🔰 टेबलाचा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठभागाचा भाग आहे. या अमर्याद पृष्ठभागाला " प्रतल " असे म्हणतात.
🔰प्रतल अनंत बिंदुनी बनलेली असतात.
🔰प्रतलाला नाव देण्यासाठी एका अक्षराचा वापर केला जातो.जसे - प्रतल O
🔰प्रतालाची आकृती कधी कधी छायांकित करतात.
===========================
🔰 रेषाखंड 🔰
🔰वरील आकृतीत दाखवलेल्या रेषा M वर P बिंदू पासून Q बिंदूपर्यंतच्या रेषेच्या भागाला ' रेषाखंड ' म्हणतात.
🔰रेषाखंडाच्या टोकांवरील बिंदुना " अंत्यबिंदू " म्हणतात.
🔰अंत्यबिंदूच्या नावावरून रेषाखंडाला नाव देतात.
उदा- रेषाखंड PQ किवा रेषाखंड QP.
🔰रेषाखंडाला " रेख " असेही म्हणतात.
🔰रेषाखंडाला ' रेख ' असेही म्हणतात.
==========================
🔰 किरण 🔰
🔰किरण एका बाजूला अमर्याद असतो .
🔰ज्या बाजूला अमर्याद आहे त्या बाजूला बाणाची खुण करतात.
🔰रेषा L वर A हा सामाईक आरंभबिंदू असून किरण AB व किरण AC हे विरुद्ध किरण आहेत.
===========================
No comments:
Post a Comment