LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


PRONOUN - सर्वनाम

 

============================
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना " सर्वनाम " असे म्हणतात .
Pronoun :-  A word which is used instead of a noun is called  Pronoun.
============================
◾️ सर्व नामामुळे नामाची पुनरावृत्ती टाळता येते.
◾️ सर्वनाम हे नामाच्या जागी वापरले जाते.
◾️ सर्वनामाला उपपद लागत नाही.
◾️ सर्वनामाचे अनेकवचन नामाप्रमाणे होत नाही.
============================
◾️KINDS OF PRONOUN- सर्वनामाचे प्रकार◾️
◾️Personal Pronoun - पुरुषवाचक सर्वनाम
◾️ Interrogative Pronoun -  प्रश्नार्थक सर्वनाम
◾️ Demonstrative Pronoun - दर्शक सर्वनाम 
◾️ Indefinite Pronoun -  अनिश्चितवाचक सर्वनाम
◾️ Relative Pronoun -  संबंधदर्शक सर्वनाम
◾️Distributive Pronoun -  विभाजक सर्वनाम
============================
Personal Pronoun - पुरुषवाचक सर्वनाम
◾️ पुरुषवाचक सर्वनामे नामाच्या जागी वापरली जातात.
◾️ पुरुषवाचक सर्वनामे असून कोणत्याही वाक्याचा कर्ता  या आठ मध्येच सामावलेला असतो.
◾️  इंग्रजी भाषेत क्रियापद नेहमीच कर्त्याच्या रूपानुसार येत असल्याने क्रियापद  चालवताना पुरुषवाचक सर्वनाम वापरतात.
◾️ तृतीय  पुरुषी एकवचनी पुरुषवाचक सर्वनामे वापरताना पुल्लिंगी He ,  स्त्रीलिंगी She ,  व नपुसकलिंगी It  असा वापर केला जातो.
◾️ समुदायवाचक नामचा वापर केवळ एक समुदाय अशा अर्थाने केला असेल तर त्याऐवजी it  वापरतात.

 पुरुषवाचक सर्वनाम

 

 एकवचन

 अनेकवचन

 प्रथम पुरुष

I         मी

We    आम्ही

 द्वितीय पुरुष

You    तू

You    तुम्ही

तृतीय पुरुष

He     तो

She    ती

It      तो

Theyते त्या ती


============================
Interrogative Pronoun -  प्रश्नार्थक सर्वनाम
 प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्वनामांना ' प्रश्नार्थक सर्वनाम '  असे म्हणतात.
◾️Who  हे  प्रश्नार्थक सर्वनाम  व्यक्तीसाठी वापरतात.
◾️What  हे सर्वनाम वस्तू साठी वापरतात.
◾️Which  हे सर्व नाम व्यक्ती व वस्तू या दोन्हींसाठी वापरतात.
◾️ व्यक्तीचा व्यवसाय किंवा नोकरी संदर्भात विचारणा करण्यासाठी What  हे सर्वनाम वापरतात.

काही महत्त्वाची प्रश्नार्थक सर्वनामे

What

काय

Who

 कोण

Where

 कोठे

When

 केव्हा

Why

 का

Whom

 कोणाला

Whose

 कोणाचा

Which

 कोणता

How

 कसा

How many

 किती

How much

 किती

How far

 किती दूर (अंतर)

How long

 किती काळ( वेळ)

Of whom

 कोणाबद्दल

To whom

 कोणाला

With whom

 कोणाबरोबर

whatever

 काहीही

Whoever

 कोणीही

Whichever

 कोणतेही


============================
Demonstrative Pronoun - दर्शक सर्वनाम 
 जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
◾️EX- This , That , These , Such .
◾️This  आणि That  हे एकवचनी सर्वनाम आहे.
◾️These  आणि Those  हे अनेकवचनी सर्वनाम आहे.
◾️This  आणि These  हे जवळच्या वस्तू ,  व्यक्ती  दाखविण्यासाठी वापरतात.
◾️That  आणि Those  हे दूरच्या अंतरावरील वस्तू ,  व्यक्ती दाखविण्यासाठी वापरतात.
◾️ दर्शक  सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही.
============================
Indefinite Pronoun -  अनिश्चितवाचक सर्वनाम
 या प्रकारची सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा  उल्लेख करीत नाहीत. नामांचा सामान्यपणे उल्लेख  किंवा सर्वसाधारण  अर्थानेच निर्देश करतात.
◾️EX - One , nobody , nothing , some , anyone , several , somebody , everyone.
============================
Relative Pronoun -  संबंधदर्शक सर्वनाम
 संबंधदर्शक सर्वनाम  वापरून दोन वाक्य जोडता येतात. पहिल्या वाक्यातील नामा ऐवजी दुसऱ्या वाक्यात अशा प्रकारचे  सर्वनाम येते .
EX- I want to go to school which is near my house.
============================
Distributive Pronoun -  विभाजक सर्वनाम
 ज्या सर्वनामामुळे  एकावेळी एकच व्यक्ती किंवा एकच बसतो यांचा निर्देश केला जातो त्यांना विभाजक सर्वनाम असे म्हणतात.
◾️EX-each , either , neither , any , anyone , no one , each other , one another.

============================
No comments:

Post a Comment