मानपत्र
-------------------------------------
मानपत्रातूनही आपण शुभेच्छा अभिनंदन पत्राप्रमाणे आपल्या भावना, विचार , वाटलेले समाधान व्यक्त करत असतो.मान्यवर व्यक्तीच्या कार्याचा गौरव करून त्यास पुढील वाटचालीस मदत करतो.शुभेच्छापत्रातून एक संवाद असतो.तर मानपत्राचे जाहीरपणे वाचन केले जाते.कलाकार , विचारवंत , शास्त्रज्ञ , सामाजिक कार्यकर्ते , शिक्षक-गुरु , अन्य मान्यवरांचा गौरव विविध निमित्ताने करण्यात येतो.
मानपत्र लिहिताना खालील बाबींची काळजी घ्यावी.......!
🔰 प्रभावी शब्द , आशयसंपन्नता , अर्थवाहीपणा या बाबी लक्षात घ्याव्यात.
🔰नेमक्या शब्दात समग्र जीवनकार्याचा साक्षेपाने आढावा घ्यावा.
🔰मान्यवरांना उद्देशून द्वितीय पुरुषी अनेकवचनी भाषा असावी. आदरार्थी-'आपण 'या श्ब्दाचा वापर करावा.
🔰कोणत्या समारंभात हे मानपत्र दिले जाणार आहे त्याचा उल्लेख मानपत्राच्या वरील बाजूस असावा.
🔰 शेवटी कोणाच्या हस्ते पुरस्कार दिला , अध्यक्ष इ . माहिती असावी.
-------------------------------------
No comments:
Post a Comment