राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२)
---------------------------------
१)शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजार पेठ कोणत्या वर्षी बसविली ?
१) १८९१
२) १८९०
३) १८९६
४) १८९५
२)ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
१) १८ ऑगस्ट १९०१
२) १८ ऑगस्ट १९०४
३) १८ ऑगस्ट १९०५
४) यापैकी नाही
३)समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे ........ होते.
१) श्रीमंत आप्पासाहेब
२) राजर्षी शाहू महाराज
३) चौथे शिवाजी महाराज
४) श्रीमंत जयसिंग राव
४)शाहू महाराजांना कोणत्या संस्थानच्या महाराणीने दत्तक घेतले होते ?
१) सातारा
२) बडोदा
३) इंदौर
४) कोल्हापूर
५)शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे ?
१) धनंजय कीर
२) रा. ब. पारसनीस
३) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
४) डॉ. य. दि. फडके
६) राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते ?
१) निंबाळकर
२) भोसले
३) घाटगे
४) पवार
७) छत्रपती शाहूंना ....... या नावाने ओळखले जात असे.
१) लोकांचा राजा
२) प्रजेचा राजा
३) महाराजा
४) बहुजन समाज व दलितांचा राजा
८)शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?
१) सदाशिवराव भाऊ बोकिल
२) सदाशिवराव भाऊसाहेब
३) सदाशिवराव बेनाडीकर
४) सदाशिवराव आठवले
९)राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली ?
१) गंगाधर कांबळे
२) सदाशिव लक्ष्मण पाटील
३) नारायण भटजी
४) दत्तोबा साळवी
१०)राजर्षी शाहू महाराज क्षात्रजगतगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक झाली ?
१) सदाशिव लक्ष्मण पाटील
२) गणेश सुदाम पाटील
३) वासुदेव जोशी
४) माणिकचंद पाटील
११)शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात ....... यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापन केली.
१) भास्करराव जाधव
२) हरिभाऊ चव्हाण
३) अण्णासाहेब लठ्ठे
४) परशराम घोसरवाडकर
१२)१९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक शाखा स्थापन करुन छत्रपती शाहू महाराज यांनी ...... यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले ?
१) भास्करराव जाधव
२) अण्णासाहेब लठ्ठे
३) हरिभाऊ चव्हाण
४) म. ग. डोंगरे
१३) ........ विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला.
१) कोलंबिया
२) केंब्रिज
३) मुंबई
४) पुणे
१४)शेतकर्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला ?
1) महाराष्ट्र शासन
२) निजाम सरकार
३) राजर्षी शाहू महाराज
४) कर्मवीर भाऊराव पाटील
१५)राजर्षी शाहू महाराजांच्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
a) त्यांनी १९१० मध्ये सहकारी सोसायट्यांच्या कायदा केला.
b) १९१६ मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला.
c) त्यांनी १९१८ मध्ये आंतरजातीय विवाह कायदा संमत केला.
d) त्यांनी १९०६ मध्ये सत्यशोधक परिषद आयोजित केली.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a), (b), (c), (d) सत्य आहेत.
२) (a), (b), (c) सत्य आहेत, (d) सत्य नाही.
३) (b) आणि (c), सत्य आहेत, (a) आणि (d) सत्य नाहीत.
४) (a), आणि (d), सत्य आहेत, (b) आणि (c) सत्य नाहीत.
१६)स्वतःच्या संस्थानात मागास वर्गा करिता ५०% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण?
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) बाळासाहेब औंधकर
३) छत्रपती शाहू महाराज
४) पंतसचिव भोरकर
१७)१९०२ मध्ये सरकारी नोकर्यांत मागासवर्गीयांसाठी जाग राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) महात्मा गांधी
३) आर. डी. कर्वे
४) छत्रपती शाहू महाराज
१८) कोणत्या समाजसुधारकाने २६ जुलै १९०२ ला मागासवर्गीयांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्याचे जाहीर केले?
१) शाहू महाराज
२) म. फुले
३) वि. रा. शिंदे
४) महर्षी कर्वे
१९) राजर्षी शाहू महाराजांनी दि. २७ जुलै १९१८ रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केली?
अ) पारधी, गारुडी, कोल्हाटी, भामटे
ब) कैकाडी, कोल्हाटी, पारधी, वडार
क) महार, मांग, रामोशी, बेरड
ड) भामटे, गट्टीचोर, गारुडी, पारधी
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त क
४) फक्त क आणि ड
२०) शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
१) आर्य समाज
२) सत्यशोधक समाज
३) प्रार्थना समाज
४) ब्राह्मो समाज
२१)कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते ?
१) विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा
२) आंतरजातीय विवाहाचा कायदा
३) घटस्फोटाचा व वारसाचा कायदा
४) क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा
२२)स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा .......... यांनी अमलात आणला.
१) महर्षी धोंडो केशव कर्वे
२) महात्मा जोतिबा फुले
३) डॉ. भांडारकर
४) राजर्षी शाहू महाराज
२३)छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी १९१७ साली..... येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरविली होती.
१) नागपूर
२) पुणे
३) कोल्हापूर संस्थान
४) सांगली
२४)राजर्षी शाहू महाराजांनी समाज सुधारण्यासाठी कोणता दोन बाबींचा स्वीकार स्वीकार केला?
१) ब्राह्मणेतरांची सुधारणा व दलितांच्या सुधारणा
२) ब्राह्मण व ब्राह्मणेतरांच्या सुधारणा
३) दलित व आदिवासींचा विकास
४) यापैकी नाही
२५)छ. शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांच्यातील सहकार्य कोणत्या घटनांमुळे कमी झाले ?
१) काका महाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण
२) वेदोक्त प्रकरण व काकामहाराज प्रकरण
३) ताईमहाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण
४) वेदोक्त प्रकरण व ताईमहाराज प्रकरण
२६)अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एका व्यक्तीला सत्य सुधारक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जिथे ते स्वतः नेहमी जात असत. या व्यक्तीचे नाव काय?
१) कृष्णा कांबळे
२) गंगाराम कांबळे
३) रामचंद्र कांबळे
४) गणपत कांबळे
२७)राजर्षी शाहू महाराज १९२० साली ....... येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.
१) हुबळी
२) कोल्हापूर
३) बेळगाव
४) माणगांव
२८)कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांनी ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता म्हटले?
१) महाड
२) माणगाव
३) अमरावती
४) नाशिक
२९)२० मार्च १९२० रोजी माणगावला पहिली अस्पृश्यता निवारण परिषद कोणी भरविली होती?
१) छत्रपती शाहू
२) महात्मा जोतिबा फुले
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) कर्मवीर भाऊराव पाटील
३०) ....... यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली ?
१) ब्रिटिश सरकार
२) पंजाबराव देशमुख
३) कृष्णराव भालेकर
४) छत्रपती शाहू महाराज
३१) डॉ. आंबेडकरांनी .......... यांना अस्पृश्यतेचा सखा म्हटले आहे.
१) महात्मा फुले
२) राजर्षी शाहू
३) वि. रा. शिंदे
४) महर्षी कर्वे
३२) १९२० मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरविली ?
१) महात्मा गांधी
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) छत्रपती शाहू महाराज
४) वि. रा. शिंदे
३३)शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ?
१) अस्पृश्यता व जातिभेद निवारण
२) पडदा पद्धतीस विरोध
३) बालविवाहास विरोध
४) सतीच्या चालीस बंदी
३४) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते?
१) मिस क्लार्क बोर्डिंग
२) मुस्लीम बोर्डिंग
३) लिंगायत बोर्डिंग
४) मराठा बोर्डिंग
३५) शाहू महाराजांनी काय केले नाही?
a) प्राथमिक शिक्षण सक्तीने करण्यास जाहीरनामा.
b) शिक्षणात स्त्रियांना फी माफी.
c) प्रथम साहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही.
१) (a)
२) (b)
३) (c)
४) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
३६)राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठविले होते?
१) मुंबई
२) कोलकाता
३) राजकोट
४) बडोदा
३७)इ.स. १८८५-१८८९ या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?
१) राजकोट
२) बडोदा
३) धारवाड
४) लंडन
३८) १५ एप्रिल १९२० रोजी ......... यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पाया भरणी केली.
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) वि. दा. सावरकर
३) शाहू महाराज
४) भाऊराव पायगोंडा पाटील
३९)भारत देशातील कोणत्या संस्थानात प्रथमतः सर्व जातिधर्माच्या मुलांच्यासाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली ?
१) सातारा
२) कानपूर
३) कोल्हापूर
४) उदयपूर
४०)शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय?
१) दिगंबर जैन बोर्डिंग
२) वीरशैव लिंगायत वसतिगृह
३) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग
४) ढोर-चांभार बोर्डिंग
४१)मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी ........ विद्यार्थ्यांसाठी केली होती.
१) अस्पृश्य
२) ब्राह्मण
३) जैन
४) मराठा
४२)पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी केली ?
१) आगरकर
२) टिळक
३) आंबेडकर
४) शाहू महाराज
४३)शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?
१) दलित बोर्डिंग
२) मुस्लीम बोर्डिंग
३) वसतिगृह
४) मराठा बोर्डिंग
४४)मिस लिट्ल यांच्यानंतर शाहू महाराजांनी ....... यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली.
१) इंदूमती राणीसाहेब
२) श्रीमंत रखमाबाई केळवकर
३) ताराबाई शिंदे
४) पंडिता रमाबाई
४५) कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना .......... आणि ........ यांच्या प्रयत्नांनी झाली.
१) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार
२) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी
३) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे
४) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी
उत्तरे :
१-४
२-१
३-२
४-४
५-१
६-३
७-१
८-३
९-२
१०-१
११-४
१२-१
१३-२
१४-३
१५-३
१६-३
१७-४
१८-१
१९-३
२०-२
२१-२
२२-४
२३-३
२४-१
२५-४
२६-२
२७-४
२८-२
२९-१
३०-४
३१-२
३२-३
३३-१
३४-४
३५-४
३६-३
३७-१
३८-३
३९-३
४०-३
४१-१
४२-४
४३-३
४-२
४५-१
No comments:
Post a Comment