LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Monday, October 31, 2022

ई - काराची वाक्ये

ई- काराची वाक्ये 

****************

तिखट मिरची.

झाडाची सावली. 

काळी पिशवी.

बाजरीची भाकरी.

अळणी भाजी.

दाट झाडी.

शाळा भरली.

सकाळी उठा.

 बादली भरली.

भाजी आणली.

दिवाळी आली.

मजा आली.

पाणी तापवा.

टाळी वाजवा.

पिशवी उचलली. 

कळी उमलली.

हलगी वाजवली.

टिचकी मारली.

रिकामी विहीर.

अती घाई

सईबाई आली.

ढीगभर बाजरी.

मीठ भाकर.

रिती रिवाज.

चहाची किटली. 

पितळी खिसणी.

पिठाची गिरणी.

काळी टिकली.

 पिक पाणी.

निराळी चव.

गरिबी वाईट.

बिचारा भिकारी.

 रिकामी पिशवी.

हिरवी साडी.

चवदार काकडी.

 इडली-चटणी. 

गरम चपाती. 

खिडकी लावली.

 चिमणी बसली.

दीपकची गाडी.

पाटलाची फजिती. 

मधाची बाटली.

वाकडी काकडी. 

दाट सावली.

नवीन किटली.

वासाची उटणी.

 कमी काम.

पणती लावा.

भाजी चिरा.

बासरी वाजवली.

मराठी भाषा.

तिखट चटणी.

रिकामी बाटली.

कडवट कारली. 

माझी मावशी.

पिवळी पिशवी.

किटली पडली. 

टिकली लावली.

गादी उचलली.

 खीर वाढली.

 ढीग भरला.

 नदी आटली.

पाटी आणली.

 वाटी हरवली.

 गाडी चालवली.

साडी फाडली.

 लाठी मारली.

 ताजी भाजी.

 माळी आला.

यादी बनवली.

बरणी पडली.

वीट मारली.

 शीळ घातली.

 चीर पडली. 

तीर मारला.

समई लावली.

पपई कापली.

 धरणी माता. 

वीजवाहक तार.

चटणी भाकरी.

 भाजी भाकरी.

 जमीन भिजली.

मामी गाडीत बसली. 

हिराबाई घरी आली.

 राणी गादीवर बसली.

नीता नदीला चालली.

 गीता लिहीत बसली.

रीना पावसात भिजली. 

ताई पहिली आली. 

शहाणी माझी बाळी.

मी परी पाहिली.

मिरची तिखट लागली.

डाळीची आमटी वाढली.

 झाडाची सावली पडली.

 मावशी चिखलीला निघाली.

 नवरी सासरी चालली. 

बाजरी काढली नाही. 

झाडी बरीच वाढली.

मी बासरी वाजवली.

 मी भाजी मागितली.

 काशीरामला राखी दिली.

ताई राखी आण.

गणपतीची आरती झाली.

 बाजरीची मळणी झाली. 

बळीराम सावलीत बसला.

 पाटील पारावर बसला.

 नागीण बिळात चालली.

 पणती विझली नाही.

दीपिकाची बातमी समजली.

 रविवारी बकरी आणली.

नवीन गाळणी आणली.

काकीची साडी भिजली.

 निळी रिबीन आणली.

 धीरज गावी निघाला.

 सारी तयारी झाली.

आई तयारीला लागली.

 सगळी कामाला लागली.

फराळाची मजा आली.

दाराची कडी लावली.

खाली उडी मारली.

मनी आजारी पडली.

कालीदास पाणी भर.

 मनिषा भाजी कर.

मामी कढी करा.

 चिमणी उडाली आकाशी.

एक टाळी वाजवली.

चिमणी चिवचिवत आली.

निळी पिशवी उचलली.

कपाळी टिकली लावली.

काळी पाटी काढली.

 हिरवी भाजी चिरली.

 ताई लवकर उठली. 

आजी भाजी चीर.

 भाजी शिजली नाही.

आजी काशीला निघाली.

मी चपाती मागितली. 

दिवाळीत आकाशदिवा लावला. 

गायीला पाय चार. 

बादलीत पाणी भरा. 

सरिता खीर खा.

बाळाला मिठी मारली.

 नदीत पाणीच पाणी.

 साखळी नळीला लावली.

सकाळी सगळी जमली. 

रिकामी रिक्षा निघाली.

मी उडी मारली.

 मनिषा गरगर फिरली.

भाजीवाली आली नाही.

आमची आवडीची गाणी.

 दिलीपची गाडी निघाली.

निळी पगडी आणली.

 साडी किती छान.

 किती आळशी काशिनाथ.

चिव चिव चिमणी.

 सविता खडीसाखर खा.

 पायरीवर निमा बसली.

खिडकीत वही सापडली. 

शशिकला कणिक मळ.

अजित कळशी उचल.

 रिमझीम पावसात भिजा.

सगळी मला चिडवतील. 

नवीन किसणी आणली.

कविता कारली खीस.

अविनाश कविता वाच.

पक्षी किलबील करतात. 

सरिता पहिली आली.

मी कहाणी वाचली. 

जिजाबाई शिवाजीची आई.

 पायावरती गिरकी मारली. 

मी तिकीट काढली. 

विहीर रिकामीच राहिली.

 आज किती तारीख.

बडबड कमी करावी. 

धरणी आईची माया. 

कशी जाईल वाया.

नवीन पाटी आणली.

लिना वीणा वाजव.

 दारावर चिमणी बसली.

दादाची पाटी हरवली.

 माझी मावशी आली.

चहाची किटली पडली.

लता दिदी गाणी गातात.

मी हिरवा पक्षी पाहिला. 

मावशी पिवळी साडी आण. 

कशी माझी बसली मनी.

 अशी माझी छबी ती.

फिरता फिरता ती पडली. 

इडली चटणी हवी मला. 

बिचारा भिकारी परत फिरला. 

हलगीचा आवाज कानी आला.

 कमी काम कमी दाम. 

सहलीला फारच मजा आली.

**************************

पाटलाची फार फजिती झाली.

 चहाची नवीन किटली आणली.

मावशी ताजी भाजी आण.

 मी रामाला काठी मारली.

 रविवार माझा आवडीचा वार. 

माझी नवीन वही हरवली

**********************


No comments:

Post a Comment