LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Number [ वचन ]

 Number [ वचन ]

.........................................................................................

मराठी मध्ये ज्याप्रमाणे नामाचे एकवचन व अनेकवचन  होते त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये सामान्य नाम व समुदायवाचक नाम यांचे एकवचन व अनेकवचन होते. आपण बोलताना एका व्यक्ती विषयी वा वस्तू विषयी बोलतो किंवा अनेक व्यक्ती विषयी व वस्तूविषयी बोलतो हे स्पष्ठ करावे लागते.

🔰एकवचनी नामामुळे एक व्यक्ती , वस्तू  किंवा स्थळ यांचा बोध होतो.

🔰अनेकवचनी नामामुळे एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा स्थळ यांचा बोध होतो.

🔰एकवचनी नामासाठी एकवचनी क्रियापद वापरतात.

🔰अनेकवचनी नामासाठी अनेकवचनी क्रियापद वापरतात.

🔰अनेकांच्या पैकी एक अशी रचना करताना त्यापुढे अनेकवचन वापरतात.

*****************************************

एकवचनी नामाचे अनेकवचन वचन करताना अनेक पद्धती - नियम आहेत.

🔘बहुतेक एक वचनी नामाला S हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन करतात.

Pen - Pens

Hand - Hands

🔘नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी एखादा स्वर (a,e,i,o,u) येत असेल तर त्या नामाचे अनेकवचन S लावून करतात.

Boy - Boys

Key - Keys

Day - Days

🔘नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी व्यंजन असेल (म्हणजे स्वर नसेल ) तर y चा लोप होतो आणि  y च्या जागी ies वापरून त्या नामाचे अनेकवचन होते..

Baby - Babies

City - Cities

Story - Stories

🔘ज्या नामाच्या शेवटी  s , sh , ss , x किंवा z यापैकी अक्षर येत असेल तर त्या नामाचे अनेकवचन करताना  es हा प्रत्यय लावतात.

Bus - Buses

Dish - Dishes

Box - Boxes

Class - Classes

Bench - Benchess

🔘नामच्या शेवटी  O असून त्यापूर्वी व्यंजन असेल तर अनेकवचन  es जोडून होते.

Hero - Heroes

Potato - Potatoes

Buffalo - Buffaloes 

अपवाद 

Photo - Photos

Piano - Pianos

kilo - Kilos 

🔘मात्र नामाच्या शेवटी  O  असून त्यापूर्वी स्वर असेल तर अनेकवचन करताना फ़क़्त  S असेल.

Radio - Radios

Studio - Studios

Cuckoo - Cukoos

🔘 नामाच्या शेवटी f किंवा fe ही अक्षरे असल्यास  f  किंवा  fe काढून टाकून त्यांच्या जागी  ves  ही अक्षरे घातली म्हणजे त्या नामांचे अनेकवचन तयार होते.

Leaf - Leaves 

Wife - Wives

Shelf - Shelves

🔘नामातील स्वरात बदल करून काही नामांचे अनेकवचन तयार होते.

Man - Men 

Mouse - Mice

Foot - Feet

🔘स्वरात बदल होऊन en  प्रत्यय असेल तर जोडून काही नामांचे अनेकवचन तयार होते.

Child - Children

Ox - Oxen

Kit - Kitten

🔘 काही नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच / एकच असते.

Sheep - Sheep

Deer - Deer 

Swine - Swine

🔘काही नामे मोजण्यासाठी वापरली जातात व त्यामुळे अनेकवाचनात वापरतात .कोणताही प्रत्यय लावत नाहीत.

Hundred 

Pair

Dozen

🔘काही नामे अनेकवचनिच वापरतात .

Trousers

Scissors

Mealses

🔘अनेकवचनी दिसत असली तरी प्रत्यक्षात वापर एकवचनी असतो.

Mathematics

News

Gallows

🔘काही समुदायवाचक नामे एकवचनी दिसत असली तरी नेहमी अनेक वचनात वापरतात .

Information

Furniture

Luggage

🔘संक्षिप्त रूपाचे अनेकवचन करताना बहुधा प्रमुख शब्दास जोडततात.

 M.P. -M.P.s

M.L.A - M.L.A.s

M.D. - M.D.s

🔘वर्णमालेतील एका अक्षराचे अनेकवचन करताना Apostrophe चिन्हांनंतर s लावतात.

A -A'S

D - D's

K - K'S

🔘नामाच्या शेवटी  ful असेल तर अनेकवचन  s लावून करतात.

Handful - Handfuls

Mouthful - Mouthfuls


🏀 काही अनेकवचने 🏀

I - We

you - you

he - they

she - they

it - they

is - are

this - these

that - those

was - were

shoe - shoes

rupee - rupees

bush - bushes

batch - batches

watch - watches

gas - gases

brush - brushes

fox - foxes

bench - benches

address - addresses

bus - buses

fly - flies

country - countries

lorry - lorries

family - families

puppy - puppies

colony - colonies

lady - ladies
















No comments:

Post a Comment