LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Monday, October 31, 2022

आ - कराची वाक्ये

आ - काराची वाक्ये 

**********************

पापड खा.

क्षमा करा. 

वाचन करा. 

नारायण आला.

भात वाढा. 

गवत कापा.

 खारा मासा. 

दरवाजा उघड. 

आठवडा बाजार.

गाढव पकडा.

वाडा पहा.

याद राखा.

कामावर चला.

लबाड पळाला.

बाळाचा चमचा.

राम आला.

चहा करा.

बाळ रडला.

मसाला वाटा.

दादा आला.

साखर खा.

कासरा धरा.

घाम गाळा.

गाडा चालवा.

आवाज आला.

आवडता गायक.

आवडता नायक.

आज्ञा पाळा. 

आराम करा.

भात करा.

आमचा दादा.

आषाढ मास.

वळणदार अक्षर.

बाकदार नाक.

आरामात बसा.

कामात काम.

गाढवाचा आवाज.

गावाला चला.

चादर वाळवा.

चाफळचा राम.

चाणाक्ष नारद.

कागद कापा.

जाताजाता या.

झाडाजवळ बसा.

झाडावर चढा.

ढाकण लावा.

तालावर नाचा.

थाटमाट पहा.

काम पहा. 

नकाशा दाखवा.

धागा पकडा.

धारदार पान.

धाडस करा.

नाटक काम.

नाटक पहा.

नागराज आला.

साप मारला.

पाळणा हलवा.

पापड भाजा.

पावडर लावा. 

पावसाळा आला.

रामायण वाचा. 

रामफळ खा.

फटाका वाजवा. 

वाटाणा खा. 

साक्षर करा.

 सायकल चालवा. 

सावध रहा. 

सावकाश चला.

हाक मारा.

हार घाला.

फाटका कपडा.

फारच छान.

फळबाग लावा.

 बाजार भरला.

अवकाश यान.

याद राखा.

राजवाडा पहा.

लाजरा बाळ.

वाळत घाला.

वाळका झाला.

गजर वाजला. 

शाम आला.

नवरा पळाला.

हादरा झाला.

 साबण लावा.

हात हालवा.

बाबा साप पहा. 

रामा शाळा पहा.

नाना पापड आणा.

घरात साप आला.

काढा तयार करा.

शारदा खारका खा.

बाबा सातारला जातात.

मालनला राग आला.

अक्षदा उतारा वाच.

सामना छान झाला.

मला क्षमा करा.

वानर आवाजाला घाबरला.

माया कागद काप.

रामा बटाटा उकड.

मसाला छान झाला.

लाल झालर लावा.

ताटावर झाकण टाका.

शामराव गावाला जातात. 

कामगार कामावर चालला.

जयरामला साप चावला.

 रामा पावसात पळाला. 

काकाचा हात भाजला. 

हावरट सागर पळाला.

पाळणा छान सजवला. 

कागदाचा लगदा झाला.

सागर ससा बघ.

सदा कागद काप. 

आकाशात ढग असतात.

रामा पसारा आवर.

आबा आरशात पाहतात.

 दसरा जवळ आला. 

आशाचा नवरा पळाला. 

आकाश पावा वाजव.

 पावसाळा जवळ आला.

 शालन खराटा उचल. 

उमा फराळ कर. 

काजल कचरा काढ. 

बाळ पाटावर बसला. 

बाळा साखरभात खा.

 आमचा पराग शहाणा.

शारदा ताट वाढ. 

नवा सदरा घातला.

 गजानन आमचा गटनायक.

गावाजवळचा झरा आटला.

 वरात वाजतगाजत काढतात.

 काका नाव बदला. 

आकाशात ढग पहा.

 नाटकाचा तमाशा झाला.

 कपाटात नारळ बघ. 

पाटावर उभा रहा.

 नळाचा काठ भरला.

 माझा हात भाजला.

 डाळ-भात हवा का ?

 काय काय पहाणार ? 

कामगार काम करतात. 

आमचा आवडता काका. 

काय हा थाटमाट. 

हावरट कमलाकर पळाला.

काका फळा उचला.

माया वडापाव खा.

उमा कचरा काढ.

बाळाला घास भरवा.

नाताळ जवळ आला.

पाटावर उभा रहा.

नवा सदरा घातला.

बाळाला पावडर लावा.

आराखडा तयार झाला. 

दादाला टाटा करा.

 रागाचा पारा चढला.

 झाडाचा पाला काढला.

 पायात वहाना घाला.

 पाणवठा साफ करा. 

आता बास करा.

रामा बाण मार.

लसणाचा भाव काय ?

 सागरचा दात पडला.

माकडाचा नाच पहा.

 वातावरणात फरक पडला. 

वाजतगाजत वरात काढा. 

दादा सातारला चला.

 ससा फार घाबरला. 

रामलाल फाटक उघड.

दाराला टाळा लावा.

पटपट काम करा.

आकाशातला तारा पहा.

पारायणाचा लाभ फार.

मला नकाशा पहायचाय.

कावळा झाडावर बसला.

 नामा कामाला लागला. 

नारायण सावकाश आला. 

माधवचा सदरा फाटला.

साक्षात ज्ञानलाभ झाला. 

नानाचा कान कापला.

 रमाला गजरा आवडला.

धार लावायला काणस वापरतात. 

आमचा बाळ फार शहाणा. 

कशाला घाबरता आहात आपण? 

आळस झटका, कामाला लागा. 

 मदत करायला माझा हात.

 दार उघडायला माझा हात.

 छानछान बाग पहायला चला. 

बाळा दात साफ कर.

ससा घाबरला व पळाला.

काम करायला कशाला लाजता.

आता वाजतगाजत वरात काढा.

 बाबा मला क्षमा करा.

मला पापड हवाच हवा.

काळा कावळा झाडावर बसला.

रामा माझा सदरा पहा. 

आज काका सातारला जाणार.

बाळा सायकल सावकाश चालव.

 नवा सदरा मला हवा.

चला पाणवठा साफ करायला.

थाटमाट हा पहा जरा.

आता दसरा जवळ आला.

 लता गावात जा जरा.

नारायणचा कारखाना पहाणार का?

झाडावर माकडदादा राहतात ना ?

बाराचा पाढा पाठ करा.

चला आता कामाला लागा.


 

No comments:

Post a Comment