💢 क्रियापद 💢
..............................................................................
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास ' क्रियापद ' असे म्हणतात.
..........................................................................
क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला ' क्रियापद ' असे म्हणतात.
................
💥 क्रियापद या शब्दातील पद या शब्दाचा अर्थ शब्द असाच आहे. मग क्रियापद या शब्दाचा अर्थ " क्रिया दाखविणारा शब्द " असा होईल , पण नुसत्या क्रियेचा बोध करून देणार या शब्दाला क्रियापद म्हणत नाहीत.
उदा-
बाबा रोज शेतात जाऊन येतात.
या वाक्यातील क्रिया दाखवणारे दोन शब्द आहेत .
1] जाऊन 2] येतात
हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवतात .
या वाक्यात जाऊन या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
या वाक्यात ' येतात ' या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून येतात हे क्रियापद आहे .
.............................................................................
क्रियापदांचे प्रकार
1 ] सकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यात कर्म असते.
उदा- राम आंबा खातो.( सकर्मक क्रियापद)
2] अकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते.
उदा- राम पळाला.( अकर्मक क्रियापद)
3] सहाय्यक क्रियापद - वाक्यातील मुख्य क्रियेचा अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.
उदा- राम आंबा खात होता.( सहाय्यक क्रियापद)
4] संयुक्त क्रियापद - धातुसाधित (मुख्य क्रिया) व सहाय्यक क्रियापद मिळून तयार होणारे क्रियापद.
उदा- खात + होता = खात होता.
( धातुसाधित) + ( सहाय्यक क्रियापद) = संयुक्त क्रियापद.
5] प्रायोजक क्रियापद - जेव्हा कुणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दर्शवणारे क्रियापद.
उदा- समीर मुलाला रडवतो.( प्रायोजक क्रियापद)
6] शक्य क्रियापद - या क्रियापदावरून शक्यता अथवा सामर्थ्य यांचा बोध होतो.
उदा- मला ही टेकडी चढवते.( शक्य क्रियापद)
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment