LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


होळी

 होळी

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरुन प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वार्‍याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे नारायणने रक्षण केले. नंतर नारायणनेच हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करुन वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते.

              आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

                   होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आपले मन स्वच्छ व्हावे आणि स्नेहाचे एक नवे पर्व आपण दुसर्‍या दिवसापासून सुरु करावे. घरात भरभरुन आलेल्या धान्यातूनच नैवेद्य होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जाते. निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा आदर्श.

आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता, आंब्याला लगडलेल्या बाळकैर्‍या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस आले आहेत असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment