LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


NOUN - नाम

 



NOUN - नाम 
==========================
कोणत्याही व्यक्तीचे, प्राण्याचे, ठिकाणाचे, वस्तूचे, भावनेचे ,कल्पनेचे, गुणाचे किंवा इतर कशाचेही नाव  सांगणारा शब्द  म्हणजे " नाम "  होय.

Noun :-  A noun is a word used as the name of a person , place  for any living or non-living things in the world .

EX-
 Suhas ,  Ramesh ,  Nitin ,  cow ,  dog ,  cat ,  honesty ,  sincerity.

============================
KINDS OF NOUN - नामाचे प्रकार.
1 ]  विशेष नाम - Proper Noun
2 ]  सामान्य नाम - Common Noun
3 ]  समुदाय वाचक नाम - Collective Noun
4 ]  पदार्थवाचक नाम - Material Noun
5 ]  भाववाचक नाम - Abstract Noun
============================
विशेष नाम - Proper Noun
 एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या ,  व्यक्तीच्या ,  प्राण्याच्या ,  देशाच्या ,  पर्वताच्या ,  नदीच्या ,  डोंगराच्या ,  वास्तूच्या  किंवा वस्तूचा नावाला विशेष नाम असे म्हणतात .
EX-
 Suhas ,  Tiger , India , Himalaya , Ganga , Koyna , Sunday , January , Diwali 

❇️  विशेष नामाचे पहिले अक्षर नेहमी मोठ्या लिपीत असते.
❇️  विशेष नामाच्या शेवटी येणारे ए हे मुळाक्षर कधी वापरतात तर कधी वापरत नाहीत.
❇️  विशेषनामा पूर्वी   उपपद a , an ,the  वापरत नाहीत. जर विशेष नामा पूर्वी  the  हे उपपद वापरले असेल तर त्या विशेष नावाचा अर्थ/ उपयोग नेहमीपेक्षा वेगळा असतो. 
===========================
2 ] सामान्य नाम - Common Noun
 एकाच प्रकारच्या व्यक्तींना , प्राण्यांना ,  वस्तूंना ,  पदार्थांना किंवा ठिकाणांना जे सर्वसामान्यपणे नाव असते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

EX-
book , man , cow , boy , village , flower , sea , river

❇️ सामान्य नामांच्या एक वचनी रुपापूर्वी  a , an , the  यापैकी योग्य उपपदाचा वापर आवश्यक आहे.

EX- a boy , an orange , the table

❇️ काही विशेष नाम हे देखील सामान्य  नामासारखी वापरली जातात.
 ============================
समुदाय वाचक नाम - Collective Noun
 एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक वस्तू किंवा व्यक्ती यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या एका शब्दाने केला जातो त्यास  " समुदाय वाचक  " नाम असे म्हणतात. 

EX-team , family , class , army , people 

❇️ समुदाय वाचक नाम  हे सामान्यत: एकवचनी वापरतात.
❇️  समुदायवाचक नामाचे क्रियापद एकवचनी असते.
❇️ काही समुदायवाचक नामे नेहमीच अनेकवचनी वापरली जातात. Ex - people , cattle 
============================
पदार्थवाचक नाम - Material Noun
ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून विविध वस्तू-पदार्थ बनवले जातात व सामान्यत: पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत अशा मूळ पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नावास ' पदार्थवाचक ' नाम असे म्हणतात.

EX-
water , gold , oil , wood , air ,glass , tea 

❇️पदार्थवाचक नामे मोजता येत नाहीत .एक , दोन , तीन ............अशा संख्येत ती मोजता येत नाहीत.
❇️  पदार्थवाचक नामापूर्वी a  किंवा an  हे उपपद वापरत नाहीत. परंतु the  हे मोफत कधीकधी वापरले जाते.
❇️ पदार्थवाचक नामांच्या एक वचनी  रूपांपूर्वी any , some , more , much  अशा प्रकारचे परिणामदर्शक शब्द वापरलेले असतात.
some water , some milk , much time , more money
❇️ पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
❇️ काही पदार्थवाचक   नामे सामान्य नामे म्हणून वापरली जातात ,  यावेळी त्यांचा अर्थ वेगळा होतो.
==========================
 भाववाचक नाम [ Abstract Noun ]
 ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही ,  परंतु केवळ मनाच्या कल्पना करू शकतो ,  विचार करू शकतो किंवा जाणू शकतो , अशा स्थितीच्या ,  गुणाच्या ,  भावनेच्या ,  कल्पनेच्या ,   क्रियेच्या  विचार पद्धतीस भाववाचक नाम म्हणतात.

EX-
sleep , truth , beauty , courage ,childhood , laughter.

===================================



No comments:

Post a Comment