LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


लेखनविषयक नियम - अनुस्वार

              💢 लेखनविषयक नियम  - अनुस्वार 💢

-----------------------------------------------------------------------

 अनुस्वार

1 ]  ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ;  त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा .

 उदा -   घंटा ,  आंबा ,  कुंकू ,  अलंकार ,  गुलकंद ,  करंजी ,  कांदा ,  गंमत ,  सुंठ ,  अंगठा ,  पैंजण

2 ]  संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसेच आलेल्या शब्दातील अनुस्वार पर-सवर्णाने {  म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील  पंचमवर्णाने }  लिहिण्यास हरकत नाही.

 उदा -  घंटा -घण्टा , चंपक - चम्पक

3 ] य , र , ल , व , श , ष ,  स ,  ह  यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वरा बद्दल संस्कृत प्रमाणे केवळ शीर्ष बिंदू द्यावा .

 उदा -  संयम .  संरक्षण ,  संवाद ,  संसार ,  सिंह ,  संस्था ,  कंस

4 ]   नामांच्या व सर्व नामांच्या  अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

 उदा -  [  एकवचन ]  मुलास ,  घरात ,  त्याचा ,  देशासाठी

         [  अनेकवचन ]  मुलांस ,  घरांत ,  त्यांचा ,  देशांसाठी

5 ]  वरील नियमांचे व्यतिरिक्त शुद्धलेखनाच्या पूर्वीच्या नियमानुसार जे अनुस्वार आपण देत होतो ते आता देऊ नयेत .

 उदा - पहांट , केंस  , लांकुड  , गांव  , टोंक , कांही इ.


 थोडक्यात  महत्वाचे -  स्पष्ट उच्चारलेल्या जाणाऱ्या अनुनाशिकांवर नामे आणि सर्वनामे यांच्या अनेक वचनी सामान्य रुपांवर येणाऱ्या  अनुस्वारांखेरीज  आता कुठेही अनुस्वार देण्याची गरज नाही.

........................................................................................................

No comments:

Post a Comment