व्यंजन संधी
.............................................................................................
एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन
असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंज
असतो , तेव्हा त्या संधीला ‘ व्यंजन संधी ‘ म्हणतात.
.................................................................................................
व्यंजन संधीचे
नियम
नियम 1 ] – पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही
व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्धल त्याच्याच वर्गातील पहिले
कठोर व्यंजन येते.
अ
न |
जोडशब्द |
पोटशब्द |
एकापुढे
एक आलेले वर्ण |
होणारा
बदल |
1 |
शरत्काल |
शरद्
+ काल |
द्
+ क् |
द्
चा त् झाला |
2 |
क्षुत्पीडा |
क्षुध्
+ पीडा |
ध
+ प् |
ध
चा त झाला |
नियम 2] – पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही
व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्धल त्याच्याच
वर्गातील तिसरे कठोर व्यंजन येते.
अ
न |
जोडशब्द |
पोटशब्द |
एकापुढे
एक आलेले वर्ण |
होणारा
बदल |
1 |
षडानन |
षट
+ आनन |
ट
+ आ |
ट
चा ड झाला |
2 |
सदाचार
|
सत्
+आचार |
त्
+ आ |
त्
चा द् झाला |
नियम 3] – पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही
व्यंजनापुढे अनुनासिका आल्यास पहिल्या व्यंजनाबद्धल त्याच्याच वर्गातील अनुनासिक
येते.
अ
न |
जोडशब्द |
पोटशब्द |
एकापुढे
एक आलेले वर्ण |
होणारा
बदल |
1 |
जगन्नाथ
|
जगत्
+ नाथ |
त्
+ न् |
त्
चा न् झाला |
2 |
सन्मार्ग
|
सत्
+ मार्ग |
त्
+ म |
त्
चा न् झाला |
नियम 4] – त् या व्यंजनापुढे ज् ,च , ट , ल आल्यास त चा अनुक्रमे ज , च , ट , ल
होतो.
अ
न |
जोडशब्द |
पोटशब्द |
एकापुढे
एक आलेले वर्ण |
होणारा
बदल |
1 |
सच्चरित्र |
सत् +चरित्र |
त्
+ च |
त्
चा च झाला |
2 |
उज्ज्वल |
उत्
+ज्वल |
त्
+ ज् |
त्
चा ज् झाला |
No comments:
Post a Comment