LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


सायबर फसवणूक अशी टाळा ...!!


 सायबर फसवणूक अशी टाळा ...!!

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

सायबर सुरक्षा ही आत्ताच्या काळाची महत्वाची गरजच झाली आहे. अनेक व्यवहार Online पद्धतीने होत आहे. या व्यवहारामध्ये अनेकदा आपली फसवणूक झालेली आढळून येते. याबाबत आपण काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

चला तर पाहूया कशी सायबर सुरक्षा पाळता वा घेता येईल.

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

🔰स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशन पासून दूर रहा .

आपल्या बँक ACCOUNT चा PIN , PASSWORD , OTP ,ट्रान्झीक्शन ID लिक होण्याचा धोका असल्याने स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशनला UPI चा ॲक्सेस देऊ नका. हे टाळण्यासाठी आपण सेटिंग मध्ये जाऊन स्क्रीन शेअरिंग ॲपसाठी UPI चा ॲक्सेस बंद करावा .

===========================

🔰  रजिस्टर्ड असलेले नाव व्हेरिफाय करा.

UPI ट्रान्झीक्शन करण्यापूर्वी लाभार्थीचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. UPI ॲपवरून QR कोड स्कॅन करून किंवा आपण मॅन्युअली नंबर टाकल्यास आपणास लाभार्थीचे नाव दिसून येते.  सदर चे नाव बरोबर असल्याची खात्री करा. सदरचे ट्रान्झीक्शन करताना व्यक्तीचे नाव बरोबर असल्याची खात्री त्या व्यक्तीस विचारून करा.

===========================

🔰 UPI चा ॲक्सेस ब्लॉक करा.

UPI द्वारे ट्रान्झीक्शन करताना नेहमी UPI  अड्रेस शेअर केला जातो. या अड्रेस द्वारे तुमचा मोबाईल नंबर जाऊ शकतो. UPI खात्यासाठी मजबूत असा स्क्रीन LOCK किंवा PASSWORD तसेच PAYMENT पिन चा वापर करावा . UPI खात्याबाबत थोडीशी जरी शंका वाटली तर तात्काळ PASSWORD आणि PIN बदलावा. अशा करण्याने आपणास आपले UPI अकौंट सुरक्षित करता येईल.

===========================

🔰 शक्यतो मोबाईल नंबर वर पैसे पाठवू नका.

मोबाईल नंबर वर पैसे पाठविताना आपणाकडून चुकीचा मोबाईल नंबर टाईप केला जाऊ शकतो किंवा निवडला जाऊ शकतो.पैसे पाठवीत असताना  , पैसे मिळवणाऱ्या कडून UPI आय डी तसेच QR कोड विचारावा . बऱ्याच वेळा समोरची व्यक्तीचा मोबाईल नंबर बदललेला असतो त्यावेळी आपली फसवणूक होणेची शक्यता असते.

===========================

🔰UPI संदर्भातील ॲप्स सतत अपडेट करत रहा.

UPI द्वारे सुरक्षित व्यवहार किंवा पैसे पाठवण्यासाठी आपण ॲप्स चा वापर करत असतो. सदरची ॲप्स सतत अपडेट केलेली असावेत. ज्यामुळे ॲपची सुरक्षितता जास्त प्रमाणात होत असते. ॲप अपडेट केल्याने  सिक्युरिटी संदर्भात सर्व गोष्टी अपडेट केल्या जातात..

===========================

🔰व्यवहार करण्यासाठी कमीत कमी ॲप्सचा वापर करावा. 

UPI चे एखादे ॲप व्यवहार करण्यासाठी पुरेशी असते.  अनेक ॲप्सच्या वापराने  पासवर्ड ,  पिन यामध्ये गफलत होऊ शकते.  जास्त ॲप च्या वापराने इंटरनेटची एक्सेस  कमी प्रमाणात मिळू  शकतो.  असे होण्याने ट्रान्झीक्शन करण्यात अडचणी निर्माण होतात.

===========================

No comments:

Post a Comment