उतारा क्रमांक - 1
कमल काल कामरगावला गेली .तिथे तिचे काका काकू आणि कामना ताई राहायचे .कमलने तिथे कागदकाम शिकले .कागदापासून तिने कळी ,काटेजहाज ,कावळा ,विमान आकाशकंदिल अशा अनेक वस्तू बनवल्या .काका काकू आणि कामना ताईने कमलचे कौतुक केले .कमलला कागदी वस्तू पाहून कमालीचा आनंद झाला .
प्रश्न सोडवा -
कमल कोणत्या गावाला गेली?
कमल गावाला कधी गेली ?
कामरगावला कोण राहायचे ?
कमलच्या ताईचे नाव काय आहे?
कमलने कोणते काम शिकले?
कमलने कागदाच्या कोणत्या वस्तू बनवल्या ?
कमलला कधी आनंद झाला ?
-------------------------------------
उतारा क्र - 2
काका ए काका ,अरे कप आण. काकू तू मला काकाने आणलेल्या कपातच काॅफी दे.कपिला कावड तयार ठेव. काजल ,कविता ,करण येतील.आपण सर्व काकूंना पाणी भरायला मदत करु.
पाणी भरून झालेकी, कारमधून ककवलीला आणि काझीरंगा अरण्याला भेट देऊ.
अरे हो ,रे कालवा करू नका.कावरेबावरे होऊन पाहू नका.. चला सोबत काजू ,करवंद,कणसे घ्या.अरे उन्हामुळे जीव कासावीस होतोय .कारमधील ए.सी. लावा बर.....आपण खूप मजा करू .आल्यावर काका काकूला करामती सांगू..
प्रश्न सोडवा -
१] काकू कपात काय देणार आहे?
२]उतार्यातील मुलांची नावे लिहा?
३] मुले कोणते जंगल पाहणार होते?
४]कावराबावरा शब्दाचा अर्थ सांगा.
५] कालवा म्हणजे काय?
६] मुलांनी सोबत कोणता खाऊ घेतला होता?
७]लिंग बदला. १) काका..२) मुलगी...
८] समानअर्थी शब्द सांगा .१)पाणी ...२) सोबत...
-------------------------------------
उतारा क्र - 3
कमल आणी तीचे कुटुंब शेजारच्या कुटुंबारोबर फीरायला गेले .सकाळची वेळ होती. रस्त्यात एक तलाव दिसला .कमल कांताला म्हणाली.कमळ छान उगवले काल मी पाहिले तेव्हा एक दोनच होते आज आठ दहा तरी असेल कांता कमला जोरात ओरडली कमल ऐ कमल हे बघ कासव कमल म्हणाली अगदी मासा बघ मासा साप, गाडुंळपण आहे .
प्रश्न सोडवा -
1) फीरायला कोण कोण गले ?
2) उतार्यातील मुलीची संख्या सांगा ?
3) तलावामध्ये काय दीसले ?
-------------------------------------
उतारा क्र - 4
कमल किशनराव कुलकर्णी ही अतिशय कुशल कलाकार होती.कथाकथन ,टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती तयार करणे
अशा कले मध्ये पारंगत होती.घरची जेमतेम परिस्तिथी आई वडील काबाडकष्ट करून आपल्या मुलाचे कलागुण जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न करायचे.पैश्याची कमतरता,भासायची पण कमल मध्ये कमालीचा आत्मविश्वास होता.चांगले करण्याची तिची धडपड शेजारीपाजारी, शिक्षक पाहायचे.तिच्या कलेला प्रोत्साहन द्यायचे. एक दिवस कमलने टाकाउपासून टाकाऊ कलाकृती बनवली.शाळेत कलाकौशल्य स्पर्धा होती .त्या शाळेचे प्रतिनिधित्व कमल ने केले .कमलच राज्यात पहिला नंबर आला.आई, वडील, शिक्षकांना कमालीचा आनंद झाला.सगळीकडे तिचे कौतुक झाले.तिच्या कष्टाचे चीज झाले
प्रश्न सोडवा -
1] कमलचे पूर्ण नाव काय होते?
2] कमल कोणत्या कलेत पारंगत होती?
3] कमलला कशाची आवड होती?
4] कमलने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला?
5] वाक्यात उपयोग करा
पारंगत असणे–
कौतुक करणे
कसोशीने प्रयत्न करणे
-------------------------------------
उतारा क्र - 5
कमलाकर काका कसारा येथील काजलच्या कायरा मुलीसाठी काजळ, काठाची साडी घेऊन गेले. तेथून ते कायरा सोबत प्राणिसंग्रहालयात गेले, तेथे त्यांनी काळा काळा कावळा, कासव, कांगारू पाहिले. फिरताना कपात गरमगरम चहा पिला. काकांनी कायराला वाटेत येताना कढई, वाती, कमळफुल, कळफलक,
कडे, घेऊन दिले, व काजलने सांगितलेले कापड, कापूर, कापसाच्या वाती, मक्याचे कणीस आणले.
प्रश्न सोडवा -
1] काका कोणत्या गावाला गेले.?
2] काळा रंग कोणाचा आहे?
3] फिरताना काकांनी कोणते पेय घेतले?
4] वाटेत कायराने कोणकोणत्या वस्तू घेतल्या?
5] कापसाच्या वाती कोणी सांगितल्या?
-------------------------------------
उतारा क्र - 6
कमलदास काल कळमदेवीला गेला. कळमदेवीला कल्पना राहात होती.कल्पना कडे कमळ फुले होतु.कमलदासने कल्पना कडील कमळफुल काढले. कल्पना कमलदासचा राग केला नाही.कल्पनाने कमलदासला कमळ फुलासोबत करवंदे काढून दिली.कमलदासनेही करवंदे काढली.करवंदे काढतांना कमलदासला करवंदाचा काटा टोचला .कल्पनाने कमलदासचा काटा काढून दिला.कल्पना कमलदास करवंदे खात बसली. करवंदे खातांना दोघांना आनंद झाला.
प्रश्न सोडवा -
1 ] कमलदास कोणत्या गावाला गेला.?
2 ] कळमदेवीला कोण राहात होती.?
3 ] कल्पना कडे काय काय होते.?
4 ] कमळफुल कोणी काढले.?
5 ] कमळफुलासोबत कल्पनाने काय दिले .?
6 ] कमलदासला कशाचा काटा टोचला.?
7 ] काटा कोणी काढून दिला .?
8 ] करवंदे कोण खात बसली?
9 ] कल्पना कमलदास काय खात बसली?
10 ] दोघांना आनंद केव्हा झाला?
-------------------------------------
उतारा क्रमांक - 7
खर सागा खाशाबा खानापूरला आपण खानावळ सुरू करूया का. आपण खानावळ मध्ये आपण खानावळ मध्ये खामगावचा प्रसिद्ध खाचणेचा खवा, खरबूज, खजूर विविध खाद्यपदार्थ ठेवुया. व बाजूला दुकान पण खोलुया,त्यात खसखस, खण, खटारागाडी, खडू, रंगीत खडे, खताचे प्रकार असा सर्व खजिना ठेवुया.
त्यासाठी आपल्या खुप खटाटोप करावा लागेल. मी लहान असले तरी कामात माझा खारीचा वाटा असेल. त्यासाठी आपण खारघर च्या खासदार काकांचे मार्गदर्शन घेऊया.
विचार करा खाशाबा, मी तोपर्यंत आईला खारीक खोबर आणून देते.
प्रश्न सोडवा -
1 ] उतारालेखन मध्ये किती व्यक्ति आहेत?
2 ] मार्गदर्शन कोणाचे घेणार आहेत?
3 ] खानावळ मध्ये खामगावचा प्रसिद्ध काय ठेवणार आहेत?
4 ] आईला काय आणून द्यायचे आहे?
5 ] डोके चालवा.
खारीक-खोबरे यासारखे तुम्हाला माहित असलेल्या शब्दांची यादी तयार करा.
6 ] शब्द कोडे
छोटी छोटी गोल गोल,
पांढरीशुभ्र छान,
माझा आहे वेगळाच,
मसालेदार मान,
सांगा पाहू मी कोण.
-------------------------------------
उतारा क्रमांक - 8
खार झाडावर सरसर चढली .खुशीच्या खिडकीतून डोकाऊ लागली. खुशाल घरात यायचा प्रयत्न करू लागली.खलिफा,खातून खुशीचे मित्र तिथेच होते.सर्व खिडकीबाहेर पाहू लागले.खारूताई झाडावर आलेला पेरू खात मस्त पाहात होती.इकडून तिकडे सरसर चढत होती.सर्व मुले खूपखूप खूश झाली...आज त्यांना पुस्तकात पाहिलेली खारूताई प्रत्यक्ष पाहायला मिळाली होती.
प्रश्न सोडवा -
१) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
अ]खिडकितून कोण डोकावत होते?
आ] खुशीच्चा मित्रांची नावे लिहा.
इ] खारूताई कोणते फळ खात आहे?
ई] खार झाडावर कशी चढते?
२)रिकाम्या जागा भरा.
अ] खार ➖➖ खिडकितून डोकावू लागली.
आ]सर्व मुले खूपखूप ➖➖झाली.
३) उतार्यात आलेले जोडशब्द लिहा.
४)खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
अ] सरसर
आ] खुशाल
इ] इकडेतिकडे.
-------------------------------------
उतारा क्रमांक - 9
खजूरचे झाड होते.त्या खजूरच्या झाडावर खारूताई खाद्य शोधत होती.खेमाच्या आईने खारवलेल्या ओल्या खाऱ्या शेंगा खाटेवर टाकल्या. खारूताईने पाहिल्या व खजूरच्या झाडावरून सरसर खाली आली खाटेवर बसून छानपैकी खारवलेल्या खाऱ्या शेंगा खादाडसारखी खाऊ लागली.खारूताईला खारवलेल्या खाऱ्या शेंगाची मेजवानी मिळाली.खारूताईला खारवलेल्या खाऱ्या शेंगा खूप खूप आवडल्या
खातच बसली, खातच बसली.
खाता खाता सुस्त झाली खाटेवरच झोपून गेली.
प्रश्न सोडवा -
1 ] खारूताई कुठे होती?
2 ] खारूताई काय शोधत होती ?
3 ] खारूताईने काय पाहिले ?
4 ] सरसर झाडावरून कोण उतरले ?
5 ] खाटेवर काय होते ?
6 ] खारूताई काय खात होती ?
7 ] खारूताईला कशाची मेजवानी मिळाली?
8 ] खारूताई सुस्त का झाली.?
9 ] खारूताई कुठे झोपून गेली. ?
10 ] खाटेवर कोण झोपले.?
11 ] खरवलेल्या शेंगा कुणी फस्त केल्या ?
12 ] खा ने सुरू होणारे शब्द शोधा व लिहा.
-------------------------------------
उतारा क्रमांक -10
पहिला दीवस अमर कमल जगन राधा शाळेत आले मी आणि त्या मुलांचे पालक सोबत काही नवीन दाखला मुले व पालक .मीत्रहो शाळा म्ह्टले की पालकांना आणि मुलांना शाळेचा पहिला दिवस आपले मुलगा शाळेत जानार आपला ठसा कसा उमटेल म्हणून शिक्षक आणी पालक प्रयत्नात आसतात पालकांना मुलांना नवीन कपडे दप्तर बुट अशाप्रकारे स्वत ही चांगलेच तयार होऊन आपला ठसा शिक्षकावर उमटवतात. शिक्षकांना मुलांना पालकांना खास चाॅकलेट ,खाउ,काही भेट वस्तू देतात .
काही शाळेत पावलांचे ठसे ,हाताचे ठसे विविध रंगाने पालक आणि मुले दोघांचेही घ्यावेत तेव्हा ठसे भिंतीवर कागदावर घेतले यातूनच आजपासून प्रगतीचे ठसे दिसतील अशीच सविस्तर समजूत असणे गरजेचे आहे
जीवनात ठशाचे मह्त्वा मला समजले
प्रश्न सोडवा -
1) पहीलाच दिवशी शाळेत कोण कोण आले ?
2) पालकांना कशाचाच आनंद वाटतो ?
3) शाळेत मुलांचेच स्वागत कसे केले ?
4) पालकांनी आपला ठसा कसा ऊमटवला ?
5)शाळेत मुले कुनासोबत आली ?
6) मुलांच्या दप्तरात काय काय असेल ?
7) मुले कशाप्रकारे तयार होऊन आली ?
8) आपला ठसा ऊमटवण्यासाठी शिक्षकांनी कसे प्रयत्न केले ?
9) ठसे कशा कशा वर घेतले ?
10) यातुन शाळेतिल मुले काय शिकतील ?
------------------------------------
उतारा क्रमांक - 11
गायत्रीला गायनाची आवड आहे. तिचा गळाही गोड आहे .नवीन गाणे ऐकले की ती लगेच गाऊन बघायची. तिला गायनाचा छंदच जडला. गायनासाठी गायत्रीने गावाकडील गणित शिक्षिकेची नोकरी सोडली. गुरुवारी गाणगापुरला गायत्रीचे गायन आहे. ती गवळन गाणार आहे. गायन म्हणजे तिचे जग. या गायकीच्या जगात तिला गरूडासारखी गगनभरारी घ्यायची आहे.
प्रश्न सोडवा -
1 ] गायनाची आवड कोणाला आहे?
2 ] गायत्रीला कशाची आवड आहे?
3 ] गायत्रीला कशाचा छंद जडला?
4 ] गायत्री कोणत्या विषयाची शिक्षिका होती?
5 ] गायत्रीला कोणती नोकरी होती?
6 ]गायत्री कुठे नोकरी करायची?
7 ] गायत्रीचे गायन कुठे आहे?
8 ] गायत्री काय गाणार आहे ?
9 ] लिंग बदला =1 )गायिका
2 )शिक्षिका
-------------------------------------
उतारा क्रमांक - 12
गडचिरोली गाव खूप लांब आहे. गणपत काकांची गार्गी तेथे गजरे व हार विकते .शेजारी गणेशाचे मंदिर आहे. गजानन तेथे पुजारी आहे.
गणेश मंदिरात खूप गर्दी असते.
गणेशोत्सव तर खूप धामधुमीत साजरा होतो. गजेंद्रने गणेशाला मोदकांचा प्रसाद चढविला. गणेशाला जास्वंद व दुर्वा खूप आवडतात. गजाननने गार्गीकडून गणेशमुर्तीसाठी हार घेतला.
गजानन, गार्गी,गजेंद्रव इतर यांनी
गणेशाची पूजा, आरती केली.मंदिर गजबजून गेले.
गदाधरने गणेश मंदिरात सुंदर गालीचा दिला.छान गणेशाची गाणी लावलेली होती. गणेश मंदीराचा परिसर गणेश मंदिरामुळे
नेहमी गजबजलेला असतो.
प्रश्न सोडवा -
1 ] गावाचे नाव काय आहे?
2 ] गडचिरोलीला कशाचे मंदिर आहे.?
3 ] गणेश मंदिराततील पूजारी कोण ?
4 ]गार्गी कोणते काम करते.?
5 ]कोणता उत्सव धामधुमीत होतो.?
6 ]गजाननने काय विकत घेतले.?
7 ] गणेश आरतीला कोण कोण होते.?
8 ] गालीचा कोणी दिला.?
9 ]गजेंद्रने काय दिले?
10 ] गणेशाला मोदक कुणी आणले.?
11 ] प्रसाद काय होता.?
12 ] गणेशाची ,गणपतीची आरती कोणती सांगा
13 ] गणपतीचे चित्र मिळवा व रंगवा
14 ] गणेशाच्या आवडत्या वस्तू कोणत्या.?
------------------------------------
No comments:
Post a Comment