स्वरांचे प्रकार
स्वरांचे प्रकार तीन आहेत
1 ] ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर
2] संयुक्त स्वर
3 ] सजातीय स्वर व विजातीय स्वर
--------------------------------------------------------
1 ] ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर
ऱ्हस्व स्वर
स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ , इ ,उ , ऋ , लृ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो , म्हणून त्याला 'ऱ्हस्व स्वर' असे म्हणतात.
दीर्घ स्वर
आ , ई , ऊ , ए ,ऐ , ओ , औ या स्वराचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो. म्हणून त्यांना ' दीर्घ स्वर ' असे म्हणतात.
---------------------------------------------------
2 ] संयुक्त स्वर
दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
ए ,ऐ , ओ ,औ हे संयुक्त स्वर आहेत .
उच्चार करण्यास लागणारा कालावधी वरून एखादा स्वर हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवण्यात येते. त्यांना मात्रा असे म्हणतात.
स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात.
------------------------------------------------------
3 ] सजातीय स्वर व विजातीय स्वर
एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.
उच्चा स्थानानुसार अनेक जोड्या तयार होऊ शकतात.
उदा. अ - आ
इ - ई
उ -ऊ
भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.
उदा . अ - इ
अ - उ
इ - ए
उ - ए
Tanjila Mujim Nadaf
ReplyDeleteAdarsh Navnath Puri
ReplyDeleteNice
ReplyDelete