व्यंजनांचे प्रकार
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 ] स्पर्श व्यंजने -
* क , ख पासून भ , म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
* फुप्फूसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जिभ, कंठ, ताल, दात, पोट या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्णन उच्चारले जातात. म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात.
2 ] अनुनासि के/पर-सवर्ण- ड. , त्र , ण , न या वर्णांचा उच्चार त्या-त्या वर्णांच्या उच्चस्थानबरोबर नासिकेतून म्हणजे नाकातून ही होतो म्हणून त्यांना ' अनुनासिक ' वर्ण असे म्हणतात.
3 ] कठोर व मृदू व्यंजने-
* ज्या व्यंजनांचा उच्चार यांची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात.
* कठोर व्यंजनानाच श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात.
* तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य , कोमल किंवा मृत्यू होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात.
* मृदू व्यंजनानाच नाद किंवा घोष वर्णन असे म्हणतात.
4] अर्धस्वर / अंतस्थ -
* य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई , ऋ , लृ , उ या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखीच आहेत.
* संधी होताना या स्वरांच्या जागी वरील बाजूने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात.
* अर्धस्वर ही मृदू व्यंजने आहेत.
5] उष्मे- घर्षक -
* श , ष ,स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.
* उष्मन = वायु मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो.
* यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. म्हणून त्यांना उष्मे म्हणतात.
* यांचा समावेश कठोर वर्ण मध्ये होतो.
6 ] महाप्राण व अल्पप्राण व्यंजने-
* ' ह 'या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण म्हणतात.
* अशा ' ह ' मिसळून आलेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात.
* अशा रीतीने 14 वर्णन महाप्राण वर्ण मानले जातात.
* उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण म्हणतात.
No comments:
Post a Comment