LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Saturday, October 1, 2022

ऑपरेटिंग सिस्टम - OS

ऑपरेटिंग सिस्टम 

Examples of Operating System

------------------------------

 ANDROID 

 IOS 

 WINDOWS

 या काही महत्वाच्या आणि जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अशा ऑपरेटिंग सिस्टम आहेत.

Windows

संगणक क्षेत्रात सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे windows ऑपरेटिंग सिस्टम होय. Microsoft Windows चे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. 

Windows XP,

 Windows 7, 

Windows 8,

Windows 10 

Windows 11 

हे काही प्रमुख windows चे प्रकार आहेत.

------------------------

Linux


ही ऑपरेटिंग सिस्टम आपण दैनंदिन जीवनात जरी वापरत नसलो तरी आपले भरपूर ओएस हे linux चे संस्करण आहेत. जगभरातील 500 हुन अधिक सुपर कॉम्प्युटर लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. लिनक्स ही फ्री आणि ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे.

-----------------------

Android

जगातील सर्वाधिक स्मार्ट डिव्हाईस आणि मोबाईल मध्ये Android या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला जातो. Android चे देखील Windows प्रमाणे प्रकार आहेत . Android 1 ते 12 हे प्रत्येक वेगळे प्रकार आहेत. 

--------------------------------

iOS

Apple कंपनीच्या iPhone मध्ये iOS ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते. iOS ही ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल क्षेत्रातील एक सर्वाधिक सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम म्हणून ओळखली जाते.

याशिवाय 

Blackberry OS, 

Symbian, 

MacOS, 

Chrome OS, 

KaiOS 

या काही ऑपरेटिंग सिस्टम देखील प्रसिद्धीला आल्या होत्या.

ऑपरेटिंग सिस्टम अशी करते  काम .

 ऑपरेटिंग सिस्टम काम कशी करते याविषयी आपणास माहिती झाले असेलच मात्र याविषयी  समजून घेऊयात. आपण एखादी वर्ड फाईल सुरू करू.

आता आपण या वर्ड फाईल मध्ये कीबोर्ड वरून 1 हे बटन दाबून स्क्रीन वर आपल्याला 1 हा अंक दिसतो.

आपण जेव्हा 1 हे बटन दाबतो तेव्हा त्याची बायनरी किंमत म्हणजेच 0001 ही कीबोर्ड कडून पाठविली जाते. ऑपरेटिंग सिस्टम बायनरी पद्धतीने ती किंमत इनपुट हार्डवेअर कडून घेऊन आउटपुट साठी पाठवते.

आता आउटपुट स्क्रीन वर दाखवत असताना ही बायनरी किंमत पुन्हा वापरकर्त्याला कळेल अशा दशांश अंकात दाखवली जाते.

म्हणजेच वापरकर्ता हा देणारे इनपुट आणि त्याला मिळणारे आउटपुट हे पूर्णपणे त्याला समजेल असे असते. 

----------------------  

No comments:

Post a Comment