LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Thursday, October 27, 2022

लिंग - GENDER

लिंग  

(GENDER)

**************************

मराठी भाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेतही स्त्री-पुरुषदर्शक लिंगभेद आहेत. लिंगाचा व्याकरणदृष्टीने संबंध फक्त नामाशी असतो. नामाच्या इतर कोणत्याही रूपाशी वचन विभक्ती इत्यादी. लिंगाचा संबंध नाही आणि नामाचा हा लिंगविचारसुद्धा प्रामुख्याने त्याच्याऐवजी वापरले जाणारे पुरुषवाचक सर्वनाम (he she, it आणि त्यांचे पीप विशेषण his, her, its) यांचा वापर करतानाच होतो.

**************************

प्रकार

(1) पुल्लिंग (Masculine Gender) :- 

पुरुषजात दाखविणारी नामे / पुरुषवाचक सजीव पदार्थ दर्शविणारी नामे पुल्लिंगी समजतात, उदा., man, boy, father, king, poet, hero, bull.

(2) स्त्रीलिंग (Feminine Gender ) : -

 स्त्री जात/ स्त्रीवाचक सजीव पदार्थ दर्शविणारी नामे स्त्रीलिंगी समजतात. उदा., woman, girl, mother, queen, cow, heroine.

(3) सामान्य लिंग (Common Gender) :-

 स्त्री-पुरुष भेद असूनही जी नामे दोहोंसाठी वापरली जातात ती नामे सामान्य लिंगी किंवा उभयलिंगी समजली जातात. अशा नामांचे लिंग संदर्भावरूनच स्पष्ट होते. उदा., child, teacher, person, pupil, orphan, thief, neighbour, baby, friend, cook, dancer, painter, student, calf.

(4) नपुंसकलिंग (Neuter Gender):-

 ज्या नामाचे स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग दर्शविले जात नाही अशी नामे नपुंसकलिंगी समजतात. सामान्यतः निर्जीव वस्तू नपुंसकलिंगी मानतात / समजतात.

उदा., Pen, book, cap, chair, river, table.

सामान्यतः पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे खालीलप्रमाणे 

🧿1. पुल्लिंगी नामाबद्दल स्वतंत्र शब्द वापरून

Boy-Girl

Father-Mother

King-Queen

Husband-Wife

Man-Woman

Sir-Madam

🧿2. पुल्लिंगी नामासess हा प्रत्यय जोडून

Lion-Lionessबनतात.

Host-Hostess

Poet-Poetess

 Author-Authoress 

🧿3. मूळच्या पुल्लिंगी नामांमध्ये काही फरक / बदल करून नंतर - ess हा प्रत्यय जोडून

Actor-Actress

Waiter-Waitress

God-Goddess

Tiger-Tigress

Master-Mistress

inspector-inspectress 

🧿4. नामाच्या आरंभी किंवा शेवटी लिंगभेद दर्शविणारा शब्द जोडून

He goat-She goat

Milk man- Milk maid

Grand father-Grand mother

Pea cock-Pea hen

Landlord-Landlady

 Washerman-Washerwoman

🧿5. काही नामांची स्त्रीलिंगी रूपे अनियमित असतात. ती लक्षातच ठेवली पाहिजेत,

Hero-heroine

Bridegroom-bride

Dog-bitch

 Fox-vixen

mister-miss

Lad-lass

🧿6. सजीव प्राण्यांचा समूह दर्शविणारी नामे (Collective nouns) नपुंसकलिंगी असतात. उदाहरणार्थ,

class, army, committee. The comittee gave its decision.

🧿7. लहान मुले, क्षुद्र प्राणी दर्शविणारी नामे नपुंसकलिंगी असतात. ant, child, bird, fly, baby It is a baby. It is an ant.

🧿8. निर्जीव वस्तू पुष्कळदा सजीवाच्या भूमिकेतून वापरतात. तेव्हा त्याच्याबद्दल पुल्लिंगी / स्त्रीलिंगी सर्वनामे वापरतात, तसेच सामर्थ्याचे वा शक्तीचे किंवा हिंसेचे वा क्रूरतेचे प्रतीक म्हणून वापरले जाणारे शब्द पुल्लिंगी समजतात. उदाहरणार्थ,

sun, time, death, winter, summer.

The sun gives his light to all.

🧿9. सौंदर्य, सभ्यता किंवा आकर्षकता दर्शविणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी समजतात. moon, nature, peace, spring, autumn, justice, mercy, hope, charity.

The moon spreads her pleasant rays at night. 

🧿10. Ship आणि Car हे शब्द स्त्रीलिंगी वापरतात.

The Darya Daulat is a ship.

Her colour is white.





No comments:

Post a Comment