शब्द्समुहाबद्धल एक शब्द
--------------------------
🔘अवर्णनीय
वर्णन करता येणार नाही
🔘अफवा
खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी
🔘अप्पलपोटा
स्वत:च्याच फायद्याचे पाहणारा
🔘अतुलनीय
तुलना करता येणार नाही असा
🔘अजिंक्य
कधीही न पराभूत न होणारा
🔘अनाथाश्रम
निराश्रितास आश्रय देणारी संस्था
🔘अगणित
ज्याची मोजणी करता येत नाही असा
🔘अमर
ज्याला मरण नाही असा
🔘अमृत महोत्सव
पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा उत्सव
🔘अजरामर
ज्याला जरा (म्हातारपण) व मरण नाही तो
🔘अतिथी
घरचा नसलेला / पाहुणा
🔘अनुयायी
एखाद्याच्या मागून जाणारा
🔘अग्रज
आधी जन्मलेला
🔘अनुज
मागून जन्मलेला
🔘अग्यारी
पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ
🔘अपूर्व
पूर्वी कधी न पाहिले / ऐकले असे
🔘अजातशत्रू
ज्यास कोणीही शत्रू नाही असा
🔘अल्पसंतुष्ट
थोडक्यात समाधान मानणारा
🔘अष्टावधान देणारा
अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष
🔘आगंतुक
तिथी, वार न ठरवता आलेला
🔘अनाकलनीय
समजण्यास, आकलन होण्यास कठीण
🔘अभूतपूर्व
पूर्वी कधीही न घडलेला
🔘अश्रूतपूर्व
पूर्वी कधीही न ऐकलेले
🔘अदृष्टपूर्व
पूर्वी कधीही न पाहिलेले
🔘अप्सरा
देवलोकातील स्त्रिया
🔘अभ्राच्छादित, मेघाच्छादित
ढगांनी झाकलेला
🔘अविस्मरणीय
कधीही विसर पडणार नाही असा
🔘अनाथ
कोणाचाही आधार नसलेला
🔘अनावर
पडदा दूर करणे
🔘अवीट
कधीही न विटणारे
🔘अन्योक्ती
एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अल्पायुषी,
🔘 अल्पायु
कमी आयुष्य असलेला
🔘अहेर
लग्नात द्यावयाची भेट
🔘अंगाई/अंगाईगीत
लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे
🔘अंकित
दुसऱ्याच्या ताब्यात असलेला
🔘अंगचोर
अंग राखून काम करणारा, कामचुकार
🔘अनुपम (अनुपमेय)
ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे
🔘अनमोल
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे
🔘अत्युच्च
अतिशय उंच
🔘अनावृष्टी
पाऊस न पडणे
🔘अविनाशी
कधीही नाश न पावणारे
🔘आजानुबाहू
ज्याचे हात गुढघ्यापर्यंत पोचतात असा
🔘आपादमस्तक
पायापासून डोक्यापर्यंत
🔘आत्मश्लाघा
स्वतःची स्वतःच स्तुती करणे
🔘आस्तिक
ईश्वरावर विश्वास ठेवणारा,
देव आहे असे मानणारा
🔘आसेतुहिमाचल
हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत
🔘 आबालवृद्ध
लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत
🔘आत्मवृत्त
आपली हकिकत स्वतःच निवेदन करणे
🔘आदिवासी
अगदी पूर्वीपासून राहणारे
🔘आंतरराष्ट्रीय
राष्ट्राराष्ट्रांतील
🔘आजन्म
जिवंत असेपर्यंत
🔘आमरण
मरेपर्यंत
🔘आशीर्वाद
तुमचे चांगले होवो असे बोलणे
🔘आल्हाददायक
मनाला आल्हाद देणारा
🔘आकाशगंगा
आकाशातील ताऱ्यांचा पट्टा
No comments:
Post a Comment