LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Thursday, October 13, 2022

समूहदर्शक शब्द

समूहदर्शक शब्द 

---------------------- 


आंब्याच्या  झाडांची  - राई


नोटांचे - पुडके


प्रश्नपत्रिकांचा - संच


मेंढ्यांचा - कळप


वेलींचा - कुंज


उंटांचा, लमाणांचा तांडा


पालेभाजीची  - गड्डी/जुडी


हरिणांचा - कळप


माकडांची - टोळी


नोटांची, पोत्यांची - थप्पी


करवंदांची - जाळी


पक्ष्यांचा - थवा


उपकरणांचा - संच


फुलझाडांचा - ताटवा


खेळाडूंचा - संघ


भाकऱ्यांची रुपयांची - चवड


यात्रेकरूंचा - जथा


जहाजांचा - काफिला


वाद्यांचा - वृंद/मेळ


द्राक्षांचा - घड, घोस


माणसांचा - जमाव


प्रवाशांची - झुंबड


पुस्तकांचा, वह्यांचा - गठ्ठा


केळ्यांचा - लोंगर/घड


फळांचा - घोस / ढीग


किल्ल्यांचा - जुडगा


बांबूचे - बेट


गुरांचा - कळप


महिलांचे - मंडळ


चोरांची / दरोडेखोरांची - टोळी


वस्तूंचा - संच


तारकांचा - पुंज, समूह


विद्यार्थ्यांचा - गट / वर्ग


धान्याची - रास


मुंग्यांची - रांग


नारळांचा - ढीग


हत्तींचा - कळप


सैनिकांचे/ची - पथक/तुकडी/पलटण


उतारूंची - झुंबड


पाठ्यपुस्तकांचा - संच


केसांचा - झुबका, पुंजका 


केसांची - बट, जट, गुंतवळ 


पिकत घातलेल्या आंब्यांची - अढी


काजूची, माशांची - गाथण 


फुलांचा - गुच्छ


 गाईगुरांचे - खिल्लार


 मडक्यांची - उतरंड


गवताची - गंजी, पेंढी


लाकडाची, उसाची -  मोळी


विटांचा, कलिंगडांचा - ढीग


दूर्वांची - जुडी


 मुलांचा  - घोळका


नाण्यांची - चळत


 विमानांचा - ताफा


साधूंचा - जथा


खो-खो चा -  संघ


लोकांची - झुंड


शिपायांची - पलटण


गुलाबांचा - ताटवा


गवताची - गंजी


वारकऱ्यांची - दिंडी 

No comments:

Post a Comment