क्रियाविशेषण अव्यय
..............................................................................
क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
क्रिया बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला ' क्रियाविशेषण अव्यय 'म्हणतात .
उदा-
मुलगी जलद चालते.
मुलगा चल चालतो.
मुली जलद चालतात.
मुले जलद चालतात.
वरील वाक्यामध्ये लिंग , वचन यांच्यामध्ये बदल केला , तरी ' जलद' या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही . ते आहे तसेच राहते . म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
.........................................................................
क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार
1 ] कालवाचक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील केव्हा घडली , किती वेळ , किती वेळा घडली अव्यय क्रिया घडवण्याची वेळ किंवा काळ दाखवतात म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदा-
काल शाळेला सुट्टी होती.
मी दररोज व्यायाम करतो.
तो वारंवार आजारी पडतो.
आज , काल , उद्या , आता , तूर्त , लगेच , जेव्हा , नंतर , दररोज , वेळोवेळी , मागे , केव्हा , आज-काल इत्यादी
2] स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील शब्द क्रिया घडवण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवतात म्हणून त्यांना स्थळवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदा-
वारा सर्वत्र असतो.
वाघ माझ्या समोरून गेला.
येथून डोंगर जवळ आहे.
3] रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील शब्दावरून क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतात म्हणून त्यांना रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा-
रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे.
अनेक मुले उभ्याने पाणी गटागटा पितात.
झटकन , पटकन , हळूहळू , खळखळ , सावकाश , आपोआप , मुद्दाम , उगीच , फुकट इ.
4] परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील शब्दावरून क्रिया किती वेळा घडली हे समजते. अशा शब्दांना परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा-
त्या मुलीला मी दोनदा सांगितले.
तो मुलगा वाचताना किंचित अडखळतो.
आम्ही मंदिरात पाचवेळा गेलो.
5 ] प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील शब्द त्या- त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात. अशा शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा-
तुम्ही आमच्याकडे याल का ?
आपण मला आपल्या घरी न्याल का ?
तुम्ही आमच्या गावी जाल का ?
6 ] निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील शब्द त्या- त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवते म्हणून त्यांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा-
तो न चुकता गणिते सोडवतो.
गाडी न थांबता गेली.
...........................................................................
No comments:
Post a Comment