LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Saturday, November 13, 2021

सम , विषम , मूळ , जोडमूळ , सहमूळ , संयुक्त , त्रिकोणी व चौरस संख्या


सम ,  विषम ,  मूळ ,  जोडमूळ ,  सहमूळ ,  संयुक्त ,  त्रिकोणी    चौरस संख्या

 1 ते 100 अंकांची गणित पाटी

1   ते 10

11 ते 20

21 ते 30

३१ ते 40

41 ते 50

५१ ते 60

६१ ते 70

71 ते 80

81 ते 90

91 ते 100

1

11

21

31

41

51

61

71

81

91

2

12

22

32

42

52

62

72

82

92

3

13

23

33

43

53

63

73

83

93

4

14

24

34

44

54

64

74

84

94

5

15

25

35

45

55

65

75

85

95

6

16

26

36

46

56

66

76

86

96

7

17

27

37

47

57

67

77

87

97

8

18

28

38

48

58

68

78

88

98

9

19

29

39

49

59

69

79

89

99

10

20

30

40

50

60

70

80

90

100

💥समसंख्या -

ज्या संखेच्या एकक स्थानी 0 , 2 ,4 , 6 , 8  यापैकी एखादा अंक असतो  त्या संख्यांना समसंख्या म्हणतात.

 उदा- 280  , 392 ,568 , 8 , 964

*  सर्व सम  संख्यांना ' 2 '  ने नि :शेष भाग जातो.

----------------------------------------------------

 💥 विषम संख्या - 

ज्या संखेच्या एकक स्थानी 1,3 ,5,7,9  यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात.

 उदा-  321 , 633 , 905 , 869 , 9

*  विषम  संख्येला ' 2 '  ने भागले असता बाकी 1 उरते.

 सम व विषम संख्या विषयी महत्त्वाचे -

1]  दोन संख्यांची बेरीज ,  वजाबाकी ,  गुणाकार  समसंख्या असतो.

2+2 =4

8-6=2

8 x 7 = 56

2] दोन विषम संख्यांची बेरीज वजाबाकी समसंख्या असते. तर गुणाकार फक्त विषम असतो.

3+3=6

7-5=2

9x5=45

------------------------------------------------

💥 मूळ संख्या -

  ज्या संख्यांना ' 1 '  ने  आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो ,  अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात.

1  ते 100  पर्यंतच्या मूळ संख्या -

2  ,  3  ,  5  ,  7  ,  11  ,  13  ,  17  ,  19  ,  23  ,  29  ,  31  ,  37  ,  41  ,   43  ,  47  ,  53  ,  59  ,  61  ,  67  ,  71  ,  73  ,  79  ,  83  ,  89  ,  97

* 1  ते 50  पर्यंत 15  मूळ संख्या  तर 1  ते 100  पर्यंत  एकूण 25 मूळ संख्या आहेत.

* 1  ते 100  मधील एकूण मूळ संख्यांच्या अंकांची आदलाबदल केल्यास {   एकक दशक स्थानी व दशक एकक स्थानी }  एकूण ' 9 '  मूळ संख्या मिळतात.

* 2 '  हि एकमेव  सम मूळ संख्या आहे . ती सर्वात लहान व सर्वात मोठी एकमेव  सममूळ संख्या आहे.

---------------------------------------------------

💥 संयुक्त संख्या - 

ज्या संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

 उदा - 35  या संख्येला 1 , 5 , 7 ,35  या  संख्यांनी भाग जातो म्हणून 35  ही संयुक्त संख्या आहे.

-----------------------------------------------

💥 जोडमूळ संख्या-  

दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते . त्या मूळ संख्या च्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात.

 उदा -   3-5  ,  5-7  ,  11-13  ,  17-19  , 29-31  ,  41-43  ,  59-61  ,  71-  73 

1  ते 100  पर्यंत विकून जोड मूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत.

---------------------------------------------------

💥 सहमूळ संख्या /  सापेक्ष मूळ संख्या-

  दिलेल्या संख्येत  '  1  '  हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या  असे म्हणतात.

 किंवा

 कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात.

 उदा-9,10

9  चे विभाजक = (1) , 3 , 9

10  चे विभाजक= (1) , 5, 10 

9  व 10  सामाईक विभाजक = 1  आहे.

 म्हणून 90 हा या सहमूळ संख्या आहेत.

 सहमूळ  संख्यांचा सामाईक विभाजक ' 1 '  हाच असतो.

---------------------------------------------------

💥 त्रिकोणी संख्या-

 दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.

 सूत्र-     n ( n+1 )

            2

 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या  -  1  ,  3  ,  6  ,  10  ,  15  ,  21  ,  28  ,  36  ,  45  ,  55  ,  66  ,  78  ,  91

---------------------------------------------------

💥 चौरस संख्या-

 दिलेल्या संख्येला जर त्याच संख्येने  गुणल्यास मिळणारी संख्या ही चौरस संख्या (  वर्ग संख्या )   असते.

 उदा-     9 x 9 = 81

81  ही संख्या ' 9 '  चा वर्ग आहे.

 1ते 100 पर्यंत एकूण 10 चौरस संख्या आहेत.

[ 1  ,  4  ,  9  ,  16  ,  25  ,  36  ,  49  ,  64  ,  81  ,  100 ]

---------------------------------------------------









1 comment:

  1. 👌👌👌khup chhan information ahe basic concepts clear hotat.thank you sir

    ReplyDelete