LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Tuesday, October 4, 2022

CODING - कोडिंग

 

कोडिंग म्हणजे काय?

+-+-+-+-+-+-+-+-+-+-+-+-+-+-+-+

नासा च्या जॉर्ज लँड आणि बेथ जार्मन्स यांनी केलेल्या एका शैक्षणिक अभ्यासात   लक्षात  आलंय की मुलांची creativity ही सर्वात जास्त वयाच्या 6 व्या

Coding Information Marathiवर्षात असते आणि त्या नंतर थोडं त्यात कमी येत जाते.

कोडींग ही भविष्याची भाषा असणार आहे. येत्या शतकात मुलांना आवश्यक असणारे हे एक महत्त्वाचे कौशल्य असणार आहे आणि  प्राथमीक शैक्षणिक अभ्यासक्रम पासून कोडींग चा समावेश करावा यावर चर्चा होत आहेत.

कोडिंग चे वैशिष्ट्य

कोडींग मध्ये तर्कशुद्ध, रचनासंगती भर दिला जातो- लॉजिक अँड सिक्वेन्स

कोडिंग मुळे वेबसाईट ,ऍप्स आणि विविध ग्राफिक्स अनिमेशन तयार करता येतात.

अडचणी, समस्या सोडवण्यात विद्यार्थी नैपुण्य मिळवतात

विध्यार्थीचीं सारासार,तर्कसंगत विचार करण्याची क्षमता वाढते.

विध्यार्थी सर्जनशील होतात.

आपण एक दक्ष , जागृत पालक असाल,वेळीच  भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञान चा वेध घेऊन आपल्या मुलांना कोडींग अभ्यासक्रम ची गोडी लहानपणी च लावू शकता.


आपल्याला कोडींग बद्दल बेसिक माहिती आहे का ?

 स्क्रिप्ट म्हणजे काय ? 

कॉम्पुटर मध्ये कोडिंग हे फार महत्वाचे आहे.आता सगळ्याच इलेक्ट्रॉनिक डिव्हिएस कोडींग शिवाय चालू शकत नाहीत.

आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर करतो.तशीच संगणकाची ही एक भाषा आहे,त्या भाषेला मशीन कोड असे म्हणतात.कॉम्पुटर वरील प्रत्येक अंक,अक्षर हे संगणकासाठी एक मेमरी असते.

संगणक कोडिंग भाषेशिवाय दुसरी कोणती भाषा समजू शकत नाही.कोडींग संगणकाला आपण दिलेल्या सूचनांचे पालन करायला सांगते.

कोडींग चा वापर करून तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट बनवू शकता.तसेच तुम्ही कोडिंग च्या मदतीने स्वतःचे  अँप आणि गेम देखील बनवू शकता.

-------------------

प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय ?

print(“Hello, World!”)

“Hello, World!

वरील इंग्रजी अक्षरांना बारकाईने बघा.ते शब्द कॉम्पुटर ला त्यांच्या भाषेत कसे समजते हे दाखवले आहे.तुम्ही जर सतत मशीन कोड चा अभ्यास केला तर तुम्हाला कोडिंग नक्कीच करता येईल .वरील इंग्रजी शब्दांमध्ये असणाऱ्या कोडिंग प्रोग्राम चे नाव ‛Python’ आहे.सर्व प्रोग्रामिंग भाषांचे कार्य एकच असते.

तुम्हाला जर Hello Word टाईप करायचे असेल तर तुम्ही ते Print (“Hello,world”) असे टाईप करणार,तो टाईप केलेला कोड कॉम्पुटर ला समजतो आणि तो त्याचे प्रतिउत्तर Hello World असे देते.

कोडींग म्हणजे काय ?- 

कोडिंग म्हणजे एक संगणकीय भाषा आहेत ज्यात काही सूचना देवून कॉम्प्युटर ल तुमी हवे ते काम करण्यास सांगू शकता , ज्या द्वारे तुमी विविध एप्स , वेबसाईट्स आणि सॉफ्टवेअर तयार करू शकतात.

कोडींग ही कॉम्पुटर ला भाषा ओळखण्याची प्रोसेस आहे.python मध्ये प्रत्येक ओळ ही कॉम्पुटर च्या भाषेची संलग्न आहे. कोडमध्ये जो ओळीचा संच असतो त्याला स्क्रिप्ट म्हणतात.


प्रत्येक स्क्रिप्ट चे वयक्तिक वेगळे काम असते

कधी इमेजची साईझ कमी करण्यासाठी असते,

कधी म्युजिक चा आवाज कमी करण्यासाठी असते.

कधी calculator तयार करता येतात तर

नेट च स्पीड मोजला जातो

तुम्ही सोशल मिडियावरती एखाद्याच्या पोस्ट ला लाईक करता,तर त्याचा कॉम्पुटर ला स्क्रिप्ट द्वारे संदेश पोहोचते आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या स्क्रिन वरती दिसते.कॉम्पुटर तुम्ही जी आज्ञा द्याल त्याचे तो पालन करेल.

प्रोग्रॅम म्हणजे काय ?

प्रोग्रॅम कॉम्प्युटर चा एक महत्वाचा भाग आहे.प्रोग्रॅम कडे कॉम्पुटर द्वारे दिलेल्या प्रत्येक कार्याची जबाबदारी असते.प्रोग्रॅम हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी कामी येते.

कोडींग शिकणे खरच अवघड आहे का ?

कोडींग शिकणे खूप असे कठीण नाही आणि तुम्ही ते बेसिक पासून शिकू शकता.सोप्या भाषेत म्हणायच झालं तर,कोडींग हे ग्रंथालयातील पुस्तकासारखे असते.काही पुस्तकातील तुम्हाला स्टोरी समजतील,तर काही पुस्तकातील स्टोरी आपल्या  डोक्यावरून जातील.

पुस्तक वाचायला सोपे असो किंवा अवघड ते असतात तर पुस्तकच ना!तुम्ही जशी जशी जास्त पुस्तके वाचाल, तशी तशी तुमचे ज्ञान वाढेल.तसेच तुम्ही कोडींग चा जेवढा अभ्यास कराल,तेवढे तुम्ही कोडींग क्षेत्रात पुढे जाल.

कोडींग शिकताना जर तुम्हाला काही गोष्टी अवघड वाटत असतील,तर त्या गोष्टी तुम्ही कोडिंग क्षेत्रातील तज्ञाकडून शिका आणि पुढे जा.

मुख्यतः कोड कसा दिसतो ?

Print (“What is your name ?”)

Name = input ()

Print (“Hello “ + name)

जेव्हा कॉम्पुटर वरती स्क्रिप्ट चालू होते, तेव्हा कॉम्पुटर स्क्रिन वर प्रश्न दाखवतो.

नंतर कॉम्पुटर तुमच्या सूचनांची वाट पाहतो.

तुम्ही Hello name टाईप केल्यानंतर कॉम्पुटर ला सुचना मिळते

 नंतर कॉम्पुटर  Python या कोड भाषे द्वारे व त्या मदतीने त्या सुचनेचे क्रियेमध्ये रूपांतरित करतो

आणि तुमच्या कॉम्पुटर स्क्रिन वर तुम्हाला हवी असणारी गोष्ट दिसते.

कोडींग शिकायचे असेल तर तुमच्यासाठी Python हा चांगला पर्याय आहे.

तुम्हाला सुरवातीला कोडिंग शिकणे हे फार कठीण वाटेल,पण हळू हळू तुम्हाला समजेल की कोडिंग हे तर सोपे आहे.

---------------------------------

काही कोंडिंग भाषा 

जावास्क्रिप्ट -JAVA SCRIPT 

जावास्क्रिप्ट ही वर्ल्ड वाइड वेबला सामर्थ्य देण्यासाठी एक प्रोग्रामिंग भाषा आहे. पुढच्या आणि बॅक-क्विट डेव्हलपमेंटची त्याची प्रभावीता, वेगवेगळ्या भाषांसह उत्कृष्ट क्षमता, अष्टपैलुत्व आणि अद्ययावत यामुळे ती मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा बनते.

Phyton 

पायथनला इंटरनेट आणि लॅपटॉप प्रोग्रामसाठी वापरल्या जाणार् ही एक उत्तम, प्रोग्रामिंग भाषा म्हणून ओळकाहलि जाते जाते, -प्रामुख्याने पूर्णपणे लॅपटॉप प्रोग्राम, गॅझेट, फॅक्ट्स सायन्स आणि कम्युनिटी सर्व्हरवर आधारित असलेली ही भाषा आहे .

C- ही भाषा विशेषत: विंडोज OS सह वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि नेट फ्रेमवर्कचा एक भाग आहे. ही विलक्षण वेगवान आणि स्थिर आहे या वास्तविकतेमुळे ही कॉम्प्युटर प्रोग्रामरद्वारे मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

JAVA -जावा ही एक भाषा आहे जी मोठ्या संस्था मध्ये प्रसिद्ध आहे आणि Android एप्स डेव्हलपमेंटमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

php -पीएचपी प्रोग्रामिंग भाषा मोठ्या प्रमाणात इंटरनेट-प्रामुख्याने आधारित पूर्णपणे सॉफ्टवेअर प्रोग्राम वाढविण्यासाठी वापरली जाते आणि डेटाबेसशी संवाद साधणारी डायनॅमिक कंटेंट तयार करण्यासाठी इंटरनेट बिल्डर्सना एक सक्षम साधन म्हणून पर्याय देते

C+- सी++ – ही एक सामान्य-तर्कसंगत प्रोग्रामिंग भाषा आहे जी कार्य प्रणाली, ब्राउझर, गेम्स आणि त्यापेक्षा जास्त विस्तृत करण्यासाठी वापरली जाते .

R -आर ही सहसा सांख्यिकीय संगणन, तथ्य विश्लेषणे आणि वैद्यकीय संशोधनात वापरल्या जाणार् या जास्तीत जास्त प्रसिद्ध भाषांपैकी एक आहे. याचा उपयोग सांख्यिकीशास्त्रज्ञ, तथ्य विश्लेषक, संशोधक आणि उद्योजकांकडून तथ्ये पुनर्प्राप्त करण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी, व्हिज्युअलाइझ करण्यासाठी आणि भेट देण्यासाठी केला जातो. त्याच्या अर्थपूर्ण वाक्यरचना आणि वापरण्यास सुलभ इंटरफेसमुळे, आर सध्या जास्त लोकप्रिय झाली आहे .

SQL – एसक्यूएलही डेटाबेसमधील तथ्ये गोळा करण्यासाठी, हाताळण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी एक व्यापक भाषा आहे. मायएसक्यूएल, एमएस एक्सेस, ओरॅकल, सायबेस, इन्फॉर्मिक्स, sql सर्व्हर सारख्या सर्व रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम (आरडीएमएस) एसक्यूएलचा त्यांची व्यापक डेटाबेस भाषा म्हणून वापर करतात.

CSS – सीएसएस-html तयार करण्यासाठी सीएसएस वारंवार वापरला जातो. हे लेआउट, रंग आणि फॉन्ट सह डिझाईन आणि कंटेण्ट डिझाईन साठीही वापरले जाते

COBOL – कोबोल- कोबोल चा जास्त उपयोग युटिलिटी पॅकेजेस लिहिण्यासाठी केला जातो जसे की संरक्षण डोमेन, विमा इत्यादींच्या या क्षेत्रात जास्त उपयोग केला जातो .

SAS -ही एक लॅपटॉप प्रोग्रामिंग भाषा आहे जी सांख्यिकीय विश्लेषणासाठी ओळखली जाते.

LOGO – लोगो-एक निर्देशात्मक प्रोग्रामिंग भाषा, लोगो ग्राफिक्सच्या वापरासाठी ओळखली जाते.

---स्रोत - इंटरनेट

No comments:

Post a Comment