सूर्यमालेतील सर्व ग्रह पुढील प्रमाणे आहेत.
⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽
बुध (Mercury)
शुक्र (Venus)
पृथ्वी (Earth)
मंगळ (Mars)
गुरू (Jupiter)
शनी (Saturn)
युरेनस (Uranus)
नेपच्यून (Neptune)
============================
बुध
🚀 बुध सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह आहे
बुध सर्वात लहान ग्रह देखील आहे.
🚀जसे पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तसा बुध ग्रहाला कोणताही उपग्रह नाही.
🚀 बुध ग्रहाचे घनत्व 5.5 आहे जे पृथ्वीप्रमाणेच आहे.
🚀 बुध ग्रह पृथ्वी पेक्षा हळुवार फिरतो.
त्याला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला 88 दिवस लागतात.
🚀 बुध ग्रहावर दिवस अत्यंत गरम आणि रात्र बर्फाळ असते.
🚀 बुध ग्रहावर पृथ्वीच्या मानाने गुरुत्वाकर्षण फक्त 38 % आहे.
==========================
शुक्र
🚀शुक्र सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात उष्ण ग्रह आहे.
🚀 शुक्र खूप हळुवार फिरतो म्हणून या ग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या एक वर्ष एवढा असतो.
🚀शुक्र ग्रहाला रात्री आकाशात पाहिले जाऊ शकते.
🚀 रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला असलेला सर्वाधिक चकाकणारा तर शुक्र होय.
🚀शुक्र ग्रह सूर्याची प्रदक्षिणा 225 दिवसात पूर्ण करतो.
🚀या ग्रहावर अनेक ज्वालामुखी आहेत. म्हणूनच याच्या सभोवताली वायूमंडलात सल्फर डाय ऑक्साईड चे ढग आपणास पहावयास मिळतील.
===========================
पृथ्वी
🚀 पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा व निळ्या रंगाचा ग्रह आहे.
🚀 पृथ्वीला एक उपग्रह चंद्र देखील आहे.
🚀 पृथ्वी आकाराने सूर्यमालेतील तिसरा मोठा ग्रह आहे.
🚀 आपल्या सूर्यमालेत पृथ्वी एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे.
🚀 पृथ्वीचा जवळपास 71% भाग पाण्याने व 29% भाग भूमीने व्याप्त आहे.
===========================
मंगळ
🚀मंगळ ग्रहाचे दोन उपग्रह आहेत ज्यांची नावे फोबोस आणि डेमोस आहे.
🚀 मंगळ ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 687 दिवसांचा कालावधी लागतो.
🚀 मंगळ ग्रहावर असलेले पर्वत निक्स ओलंपिया सर्वात मोठे आहे ज्याची उंची माउंट एव्हरेस्ट पेक्षा 3 पट अधिक आहे.
===========================
गुरू
या ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला 11.9 वर्षांचा कालावधी लागतो.
🚀 गुरू ग्रहाचे 79 उपग्रह आहेत आणि त्यामध्ये गेनिमिड सर्वात मोठा उपग्रह आहे.
🚀 गुरू ग्रहाला हिंदू प्राचीन इतिहासात देवतांचे गुरू देखील म्हटले जाते.
🚀 हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतो. परंतु सूर्याकडून प्राप्त ऊर्जेच्या दोन ते तीन पट ऊर्जा उत्सर्जित करतो.
============================
शनि
🚀 शनी ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह आहे.
🚀 गुरु ग्रह नंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह शनी आहे.
🚀 हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा 29.5 वर्षात पूर्ण करतो.
🚀 शनी ग्रहाचे 63 उपग्रह आहेत, ज्यामध्ये टायटन सर्वात मोठा उपग्रह आहे.
🚀 शनी ग्रहा हायड्रोजन व हेलियम पासून बनलेला आहे.
🚀 शनी हा सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर असलेले रिंगण स्पष्टपणे दिसू शकते.
============================
युरेनस
🚀 युरेनस सूर्यमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह आहे.
🚀 युरेनस वरील तापमान जवळपास -224 डिग्री सेल्सिअस आहे.
🚀 शनि नंतर सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असलेला ग्रह युरेनस आहे.
🚀 या ग्रहाचे 27 उपग्रह आहेत.
🚀 हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा 84 वर्षात पूर्ण करतो.
🚀 वायजर 2 हे एक मात्र अंतरिक्ष यान आहे जे युरेनस ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले आहे.
===========================
नेपच्यून
🚀 नेपच्यून सूर्यमालेतील शेवटच्या ग्रह आहे.
🚀 नेपच्यून ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 165 वर्षांचा कालावधी घेतो.
🚀 या ग्रहाला हिरवा ग्रह देखील म्हटले जाते.
🚀नेपच्यून ग्रहांचे 13 उपग्रह आहेत.
===========================
महत्वपूर्ण
काही काळापर्यंत आपल्या सूर्यमालेत एकूण 9 ग्रह होते. ज्यामध्ये नवव्या क्रमांकाचा शेवटचा ग्रह प्लूटो हा होता. परंतु 2006 साली झालेल्या इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन संमेलनात शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा ग्रह असण्याचा दर्जा हिरावून घेतला. यामागील कारण असे होते की हा ग्रह आकाराने लहान होता. व म्हणूनच सूर्यमालेतील सूचीमधून या ग्रहाला काढून लघुग्रहांच्या सूचित टाकण्यात आले.
No comments:
Post a Comment