LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Thursday, January 13, 2022

वाक्यांचे प्रकार


 वाक्यांचे प्रकार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 वाक्या मधून प्रकट होणाऱ्या अर्थावरून त्यांचे विविध प्रकार समजतात.

 वाक्याच्या अर्थाच्या आधारे वाक्यांचे पाच प्रकार पडतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 विधानार्थी वाक्य -  ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास ' विधानार्थी किंवा साधे वाक्य ' असे म्हणतात.

 उदा - 

 राजेश व्यायाम करतो. पूर्ण

  सकाळी  थंडीत फिरायला जाणे चांगले असते.

 विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 प्रश्नार्थी वाक्य -  ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास  ' प्रश्नार्थी वाक्य ' असे म्हणतात.

 उदा -

 तू केव्हा आलास ?

 तू गावी जाणार आहेस का ?

 कोण आहे तो ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 उद्गारार्थी वाक्य -  या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो ,  त्या वाक्यास ' उद्गारार्थी वाक्य ' असे म्हणतात.

 उदा - 

 बापरे !  केवढा मोठा साप !

 अबब !  केवढा मोठा हत्ती !

 अहाहा !  किती गोड आहे हा आंबा !

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 होकारार्थी वाक्य - जेव्हा विधानात होकार असतो ,  तेव्हा त्यास ' होकारार्थी वाक्य ' म्हणतात.
 उदा -
 रमेश परीक्षेत पास झाला.
 जॉन शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाला.
 रितिका धावण्याच्या स्पर्धेत यशस्वी झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 नकारार्थी वाक्य -  जेव्हा विधानात नकार असतो तेव्हा त्यास ' नकारार्थी वाक्य ' असे म्हणतात.
 उदा - 
राघू शाळेत जात नाही.
 ते गावाला जाणार नाहीत.
 मुलांनी वर्गात गोंधळ घालू नये.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 +++  महत्त्वाचे व लक्षात ठेवा  +++
 होकारार्थी नकारार्थी वाक्यांचे एकमेकांत रूपांतर करताना दोन्ही वाक्यांच्या अर्थात बदल करू नये.
 उदा - 
 जॉन शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाला . ( होकारार्थी वाक्य)
 जॉन शिष्यवृत्ती परीक्षेत नापास झाला नाही.( नकारार्थी वाक्य)
=========================

💢 क्रियापदांच्या रूपावरून वाक्याचे प्रकार💢

 स्वार्थी वाक्य -  वाक्यातील क्रियापदाचा रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास ' स्वार्थी वाक्य ' म्हणतात .
 उदा -  रोहित ने अभ्यास केला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
आज्ञार्थी वाक्य - वाक्यातील क्रियापदावरून  बोलणाऱ्याचा हेतू ,  आज्ञा ,  विनंती  किंवा उपदेश देण्याचा दिसतो त्यास 'आज्ञार्थी वाक्य'असे म्हणतात .
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
 विध्यर्थी वाक्य - वाक्यातील  क्रियापदावरून  बोलणाऱ्याचा हेतू  , कर्तव्य किंवा इच्छा व्यक्त करण्याचा असतो , तेव्हा त्यास '  विध्यर्थी वाक्य ' म्हणतात.
 उदा - 
 संपूर्ण मानव जात सुखी असावी.
 सर्वांना मनासारखे जगता यावे.
  सोनाराने कान टोचावे.
 प्रत्येकाने कायदा पाळावा.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
  संकेतार्थी वाक्य -  वाक्यातील क्रियापदावरून  एक गोष्ट दुसरीवर अवलंबून आहे ,  असे कळते तेव्हा  त्यास ' संकेतार्थी वाक्य '  असे म्हणतात.
 उदा-
 जर तू अभ्यास केला तरच चांगले गुण मिळतील.
 जर तू  पौष्टिक आहार घेतलास  तरच निरोगी  राहशील.
 जर हवे ते पुस्तक मिळाले ,  तर माझे संशोधन पूर्ण होईल.
=========================
💢  विधानावर आधारित वाक्याचे प्रकार 💢
 केवल वाक्य -  ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात.
 उदा-
 रमेश नियमित शाळेत जातो.
 तानाजी लढता लढता मरण पावला.
 तो मुलगा दररोज व्यायाम करतो.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
 मिश्र वाक्य -  एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्ये  यांना  गौणत्वसूचक  उभयान्वयी   अव्ययाने  जोडून जे एक  संमिश्र वाक्य तयार होते त्यास '  मिश्र वाक्य '  असे म्हणतात.
 उदा -
 जर पाऊस पडला तर चांगले पीक येईल.
 जर ढग नसतील तर ऊन चांगले पडेल.
 जे चकाकते , ते सोने नसते.
 गुरुजी म्हणाले ,  की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे .
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
 संयुक्त वाक्य -  दोन किंवा अधिक केवल वाक्य  प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास  ' संयुक्त वाक्य ' म्हणतात .
 उदा-
 आई कामावरून संध्याकाळी घरी येते आणि स्वयंपाक करते.

 मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.

 सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो.
===========================

 

No comments:

Post a Comment