LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Sunday, January 2, 2022

वर्तुळ संपूर्ण माहिती

  

वर्तुळ संपूर्ण माहिती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
1 )  केंद्र - 


🟠 कंपासच्या साह्याने दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते.
 🟠 कंपासाचे  ज्या ठिकाणी ठेवून वर्तुळ काढले जाते त्या बिंदूस वर्तुळाचे केंद्र म्हणतात.
 🟠वर्तुळात एकच केंद्रबिंदू असतो.
 🟠वरील आकृतीत o  हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
2 ) त्रिज्या -

🟠 वर्तुळाचे केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणार्‍या रेषा खंडाला त्रिज्या म्हणतात.
🟠 वर्तुळात असंख्या त्रिज्या असतात.
🟠 वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची  लांबी समान असते.
🟠 वरील वर्तुळात  रेख ON  त्रिज्या आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
3 ]  व्यास

🟠 वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या व  वर्तुळावरील दोन बिंदू जोडणाऱ्या  रेषाखंडाला   व्यास म्हणतात.
🟠 व्यासाची लांबी त्रिज्येच्या दुप्पट असते.
🟠 वर्तुळात  असंख्य व्यास असतात.
🟠 वर्तुळाच्या सर्व व्यासांची लांबी समान असते.
🟠 प्रत्येक व्यास ही जीवा असते.
🟠 व्यास सर्वात जास्त लांबीची जीवा असते.
🟠 वरील वर्तुळात  रेख MN हा व्यास आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
4 )  जीवा

🟠 वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात.
🟠 वर्तुळाला असंख्य जीवा असतात.
🟠 वर्तुळात सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे व्यास होय.
🟠 वरील वर्तुळात रेख AB  ही जीवा आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
5 ) कंस

🟠 वर्तुला वरील कोणत्याही दोन बिंदू मुळे वर्तुळाचे दोन भाग होतात.  त्यापैकी प्रत्येक भागास  कंस म्हणतात.
🟠 दोन पैकी कोणता कंस हे निश्चितपणे जाणण्यासाठी किंवा समजण्यासाठी कंसाला तीन अक्षरी नाव दिले जाते.
 वरील आकृतीत कंस PQR  किंवा कंस PSR  वाचला जातो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

6 )  वर्तुळखंड

🟠 वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळ यांना मिळून वर्तुळक्षेत्र म्हणतात.
🟠 वर्तुळक्षेत्रात एक जीवा काढली असता जीवे मुळे वर्तुळक्षेत्राचे दोन भाग होतात .  प्रत्येक भागास वर्तुळखंड म्हणतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
7 ) अर्धवर्तुळ

🟠 O  केंद्र असलेल्या वर्तुळात कंसाची जीवा AB हा त्या वर्तुळाचा व्यास आहे . 
🟠  येथे कंस ACB  व  कंस ADB  समान मापाचे आहेत. यापैकी प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ म्हणतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 वर्तुळावर आधारित काही महत्त्वाची सूत्रे

 वर्तुळाचा व्यास    =   2 r ( r = वर्तुळाची त्रिज्या)

 वर्तुळाचा परिघ = 2 π r (  22 / 7 किंवा 3.14)

 वर्तुळाचा अर्धपरिघ = π r

   वर्तुळाचे क्षेत्रफळ =

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment