LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Wednesday, December 8, 2021

केवलप्रयोगी अव्यय.


  केवलप्रयोगी अव्यय

.............................................................................

  आनंद ,  आश्चर्य ,  दुःख ,  तिरस्कार इत्यादी भावना अचानकपणे उद्गारातून व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला '  केवलप्रयोगी अव्यय '  असे म्हणतात. 

..........................................................................

💥 आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्यांच्या द्वारे व्यक्त करतो.

 💥कधीकधी हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो.

 💥उद्गार दर्शवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ते वाक्याचा भाग नसतात. ते स्वतंत्र उदगार असतात.

 💥व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचा त्यांच्या पुढे येणाऱ्या वाक्याशी संबंध नसतो.

 💥उद्गारवाची अवयवच्या  पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह  [ ! ] हवे.

 उदा-

अ ] अहाहा !  किती छान सौंदर्य .

ब ]  बाप रे!  केवढा मोठा साप .

क ] अरेच्या !  तिकडे कुठे तू .

ड ]   चुप !  एक शब्द बोलू नकोस.

इ ]  अय्या !  कधी आलीस तू.

...........................................................................


No comments:

Post a Comment