LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Saturday, December 4, 2021

काळ


काळ 

------------------------------------

वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात.

 काळाचे मुख्य प्रकार

1 ] वर्तमान काळ

2 ] भूतकाळ

  3 ] भविष्यकाळ

-------------------------------------

 वर्तमान काळ -  क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमानकाळ असतो.

 उदा- 

 मी अभ्यास करतो.

 द्विज अभ्यास करतो.

-------------------------------------

 भूतकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो भूतकाळ असतो.

उदा- 

 मी अभ्यास केला.

 द्विजने  अभ्यास केला.

-------------------------------------

 भविष्यकाळ -  क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा तो भविष्यकाळ असतो.

उदा- 

 मी अभ्यास  करीन.

 द्विज अभ्यास  करील.

-------------------------------------

काळाचे उपप्रकार 

 साधा काळ 

खालील वाक्ये अभ्यासा :

1)  मी वर्तमानपत्र वाचतो.

2) मी वर्तमानपत्र वाचले.

3) मी वर्तमानपत्र  वाचेन.

 वरील  वाक्यांमधील  वाचतो ,  वाचले ,  वाचेन या क्रियापदांच्या रुपांवरून  केवळ क्रियेचा काळ कळतो.

 पहिल्या वाक्यातून  वर्तमानकाळ ,  दुसऱ्या वाक्यातून  भूतकाळ  व तिसऱ्या वाक्यातून  भविष्यकाळ  दिसतो.

 वरील वाक्यांमध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाची रूपे वापरलेली आहेत.

 अशाप्रकारे क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजतो अथवा निर्देशित होतो त्याला  " साधा काळ "  असे म्हणतात.

-------------------------------------

  अपूर्ण काळ -

 खालील वाक्ये अभ्यासा.

1)  तो मुलगा खेळत आहे.

2)  तो मुलगा खेळत होता.

3)  तो मुलगा खेळत असेल.

 वरील वाक्यात खेळ धातूच्या खेळ या धातुसाधित आचे अपूर्ण क्रिया दर्शन रूप आले आहे व त्याच्या पुढे असं या धातूची वर्तमानकाळ भूतकाळ व भविष्यकाळातील रूपे आली आहेत.

1 ) पहिल्या वाक्यात खेळण्याची क्रिया वर्तमान काळात चालू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचे समजते हा अपूर्ण  वर्तमानकाळ होय.

2)  दुसऱ्या वाक्यात खेळण्याची क्रिया भूतकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे आपल्याला समजते हा अपूर्ण भूतकाळ होय.

3) आवाक्यात खेळण्याची क्रिया भविष्यकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे आढळून येते हा अपूर्ण भविष्यकाळ होय.

 वरील प्रमाणे वर्तमान काळात ,  भूतकाळात ,  भविष्यकाळात  अशा तिन्ही काळात यत्या क्रियेची अपूर्णता दाखवलेली असते .म्हणून त्यास अपूर्ण काळ असे संबोधले जाते.

-------------------------------------

 पूर्ण  काळ

 खालील वाक्य अभ्यासा. 

1) ईशांशने लाडू खाल्ला आहे.

2)ईशांशने लाडू खाल्ला होता.

3)ईशांशने लाडू खाल्ला असेल.

 वरील तिन्ही वाक्यात क्रियापदाची रूपे बनवताना "  खा "  या धातूची पूर्ण  क्रिया दर्शवणारी  धातुसाधिते  आली आहेत.

1 ) पहिल्या वाक्यात  खाल्ला आहे . या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया ही वर्तमान काळात पूर्ण झाली आहे असे जाणवते म्हणून हा पूर्ण वर्तमानकाळ होय.

2)  दुसऱ्या वाक्यात  खाल्ला होता. या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भूतकाळात पूर्ण झाली असे समजते म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.

3)  तिसर्‍या वाक्यात खाल्ला असेल .  या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली असेल असे समजते म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ होय.

-------------------------------------

रीति काळ

 खालील वाक्य अभ्यासा.

1)  मुलगा पुस्तक वाचत असतो.

2)  मुलगा पुस्तक वाचत असे.

3)  मुलगा पुस्तक वाचत जाईल.

 वरील वाक्यामध्ये '  वाचत असतो ' , '  वाचत असे '  व ' वाचत जाईल '  या संयुक्त क्रियापदांच्या   रुपावरून वाचनाची  रीत  समजते  म्हणून त्याला

रीति काळ  असे म्हटले जाते.

1)  एखादी क्रिया वर्तमानकाळात करण्याची कर्त्याची रीत असेल  तर त्याला रीति वर्तमान काळ असे म्हणतात.

 2)  एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची   रीत असेल तर त्याला रीति भूतकाळ असे म्हणतात.

3 )  2)  एखादी क्रिया भविष्कायकाळात सतत करण्याची कर्त्याची   रीत असेल तर त्याला रीति भविष्यकाळ असे म्हणतात.

------------------------------------





No comments:

Post a Comment