शब्दयोगी अव्यय
..............................................................................
वाक्यातील शब्दाला जोडून येणाऱ्या व दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविणार्या अविकारी शब्दाला " शब्दयोगी अव्यय " असे म्हणतात.
💥शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाहीत.
💥ते शब्दांना जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील ुसर्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात.
💥शब्दयोगी अव्यय नसती तर , त्या वाक्याचा अर्थ नीट लागला नसता.
💥 शब्दयोगी अव्यय व त्यांच्या रूपांमध्ये लिंग , वचन , विभक्ती , पुरुष , यामुळे बदल होत नाही .
उदा -
1 ] टेबलाखाली पुस्तक आहे.
2] खुर्चीमागे कपाट आहे.
3] सुर्य ढगामागे लपला.
4] झाडापुढे खेळ मांडला.
5 ] शाळेसमोर मुले खेळत होती.
महत्वाचे- शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात.
उदा-
राजूकडे चेंडु होता.
शाळेसमोर खेळ सुरू होता.
तसेच
शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषण यांनाही कधीकधी जोडून येतात.
उदा-
येईपर्यंत , बसल्यावर , जाण्यापेक्षा , थोडासुद्धा , परवापासून , बोलण्यामुळे इत्यादी.
............................................................................
No comments:
Post a Comment