वचन
..............................................................................
नामावरून वस्तू एक आहेत
की अनेक आहेत , याचा बोध घेणे म्हणजे त्या नामाचे वचन होय.
..........................................................................
आपल्या मराठी भाषेमध्ये वचनाचे दोन प्रकार आहेत.
1 ] एक वचन
2 ] अनेक वचन
...........................................................................
एक वचन
नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो , तेव्हा त्याचे एक वचन मानले जाते.
उदा-
घोडा
कोल्हा
बाबा
नदी
माळ
घर
......................................................................
अनेकवचन
नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो , तेव्हा त्याचे अनेकवचन मानले जाते.
उदा-
घोडे
कोल्हे
बाबा
नद्या
माळा
घरे
..........................................................................
एखादी व्यक्ती वयाने , ज्ञानाने , अधिकाराने थोर असल्यास त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीचा उल्लेख अनेक वचनी करतो . याला " आदरार्थी एक वचन " असे म्हणतात.
उदा-
1 ] लोकमान्य टिळक थोर राष्ट्रपुरुष होते.
2] महात्मा गांधी थोर राष्ट्रपुरुष होते.
.........................................................................
+ एक वचन नामांची अनेकवचनी रूपे +
पुल्लिंगी नामे -
1] बहुतेक आ-कारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचनी रूपे ए-कारान्त होतात.
एकवचन | अनेकवचन |
घोडा | घोडे |
कोल्हा | कोल्हे |
आंबा | आंबे |
राजा | राजे |
एकवचन | अनेकवचन |
बाबा | बाबा |
दादा | दादा |
मामा | मामा |
नाना | नाना |
एकवचन | अनेकवचन |
देव | देव |
नातू | नातू |
एकवचन | अनेकवचन |
माळ | माळा |
जात | जाती |
गोष्ट | गोष्टी |
चूक | चुका |
एकवचन | अनेकवचन |
नारी | नारी |
विद्या | विद्या |
बालिका | बालिका |
वधू | वधू |
एकवचन | अनेकवचन |
नदी | नद्या |
बी | बिया |
सासू | सासवा |
जळू | जळवा |
एकवचन | अनेकवचन |
रान | राने |
देऊळ | देवळे |
एकवचन | अनेकवचन |
तळे | तळी |
मडके | मडकी |
No comments:
Post a Comment