विभक्ती
-----------------------------------
💦वाक्यात जे शब्द येतात , ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यता येत नाहीत. वाक्यात वापरतांना त्यांच्या स्वरूपात आपणास बदल करावा लागतो.
उदा- शेजारच्या, राजू , कुत्रा भाकरी असे शब्द एकापुढे एक ठेवत गेल्याने काहीच बोध होत नाही. अशा प्रकारच्या शब्द समूहाला वाक्य म्हणता येत नाही.
हे वाक्य पूर्ण होण्यासाठी शेजारच्या राजूने कुत्र्यास भाकरी दिली. अशा स्वरूपात शब्दरचना करावी लागते.
💦 वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल विकार होतो , त्याला व्याकरणा मध्ये विभक्ती असे म्हणतात .
------------------------------------
💦नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
-------------------------------------
विभक्तीचे प्रकार
नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात.
1 ] प्रथमा
2 ] द्वितीया
3 ] तृतीया
4 ] चतुर्थी
5 ] पंचमी
6 ] षष्ठी
7 ] सप्तमी
8 ] संबोधन
------------------------------------
' फुल ' नामाची होणारी रूपे व विभक्तीचे प्रत्यय
विभक्ती |
एक वचन |
अनेक वचन |
||
प्रत्यय |
शब्दांची रूपे |
प्रत्यय |
शब्दांची रूपे |
|
प्रथमा |
- |
फुल |
- |
फुले |
द्वितीया |
स ,ला ( ते) |
फुलास , फुलाला |
स, ला, ना, ( ते ) |
फुलांस , फुलांना |
तृतीया |
ने , ए
, शी |
फुलाने ,
फुलाशी |
नी , शी . (ई) ,(ही ) |
फुलांनी , फुलांशी |
चतुर्थी |
स ,ला ( ते) |
फुलास , फुलाला |
स, ला, ना,( ते
) |
फुलांस , फुलांना |
पंचमी |
ऊन , हून |
फुलाहून |
ऊन , हून |
फुलांहून |
षष्ठी |
चा , ची
, चे |
फुलाचा ,
फुलाची , फुलाच्या |
चे , च्या
, ची |
फुलांचे फुलांच्या फुलांची |
सप्तमी |
त , ई , आ |
फुलात |
त , ई , आ |
फुलांत |
संबोधन |
- |
फुला |
नो |
फुलांनो |
$ नामांची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रत्ययावरून ओळखतात.
No comments:
Post a Comment