LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Wednesday, November 3, 2021

शब्दांच्या जाती

 मराठी व्याकरण -  शब्दविचार

-----------------------------------------------

--: शब्दांच्या जाती :--

 शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. वाक्यात जे शब्द येतात त्यांची कार्य विविध प्रकारची असतात. त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्याचा आपण अभ्यास करू.

1 ]  नाम - वाक्यात येणार्‍या शब्दांपैकी चे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात. त्यांना नामे असे म्हणतात.

[ प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना तसेच सजीव व निर्जीव वस्तू व त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या वस्तूंना नाम असे म्हणतात. ]

 उदा.  व्यक्तींची नावे

 प्राण्यांची नावे

 पदार्थांची नावे

 निसर्ग  नावे

 काल्पनिक नावे

 कल !  मनाच्या स्थितीची नावे

 सामान्य नावे

 भाववाचक नामे

-----------------------------------------------------

2 ] सर्वनाम -  जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात.

[  एकाच नामाचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात ]

 उदा.  मी- आम्ही  ,   तू- तुम्ही ,  तो ,  ती ,  त्या ,  हा ,  ही ,  हे ,  ह्या ,  जो ,  जी ,  जे ,  ज्या ,  कोण ,  काय ,  कोणास ,  कोणाला  ,  कोणी ,  आपण ,  स्वतः ,  मला ,  त्याला ,  तिला ,  आम्हाला ,  तिने  ही महत्वाची सर्वनामे आहेत.

---------------------------------------------------------

3 ]  विशेषण -  नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.

 विशेषणाचे प्रकार -----

A]  गुण विशेषण-  सुंदर ,  कडू ,  धूर्त ,  हुशार....

B ]  संख्या विशेषण- 

       [1]   गणनावाचक-  दोघे ,  तीन ,  पाव ,  सर्व....

       [2]  क्रमवाचक- पहिला ,  नववी ,  पन्नासावा....

       [3]  आवृत्तीवाचक -  चौपट ,  दुहेरी ,  द्विगुणित...

       [4]  पृथकत्ववाचक - एकेक , पाचपाच ....

       [5]  निश्चित विशेषणे -  सर्व ,  काही ,  इतर ,  इत्यादी

C ]  सार्वनामिक विशेषण - माझे ,  हे ,  कोणते ,  असले ,  केवढा ,  कसली

---------------------------------------------------------

4 ]  क्रियापद-   जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात.

[ वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. ]

 महत्वाचे-  बहुतेक वेळा क्रियापद असे वाक्याच्या शेवटी येते . मात्र कधी कधी ते वाक्याच्या मध्ये ही येऊ शकते.

उदा -  करतो ,  खेळतो ,  आलो ,  काढते  इ.

-------------------------------------------------------

 5 ] क्रियाविशेषण  अव्यय - जे शब्द क्रियापदाबद्दल  अधिक माहिती सांगतात त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा -  आज , तिथे  , काल , फार 

---------------------------------------------------------

6 ] शब्दयोगी अव्यय -  जे शब्द नामांना किवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात .

उदा - झाडाखाली  , त्याच्यासठी , तिच्यासाठी इ.

-------------------------------------------------------

7 ] उभयान्वयी अव्यय -  जे शब्द दोन  शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात. त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.

उदा - ते , आणि , परंतु  ,  म्हणून 

.................................................................................................

8 ]  केवलप्रयोगी अव्यय -  हे शब्द आपल्या मनातील वृत्ती  किंवा भावना  व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात . 

 उदा.-  शाब्बास ,  अरे वा ,  अबब ....

---------------------------------------------------------

1 comment: