LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Saturday, November 6, 2021

विरामचिन्हे


💥 विरामचिन्हे💥

------------------------------

 विरामचिन्ह यांचे महत्व - 

💢 आपण वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात.

💢  हा विराम आपण कधी ' अगदी कमी वेळ घेतो ,  तर कधी थोडा वेळ घेतो तर कधी अधिक वेळ घेतो.

💢 हे दाखवण्यासाठी आपण विरामचिन्हांचा वापर करत असतो.

 लेखनात वारंवार येणारी प्रमुख विरामचिन्हे कोणती व ती केव्हा वापरतात हे आपण पाहूया.

---------------------------------------------------------

 पूर्णविराम - [ . ]

 विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरतात.

 उदा - तो गावी गेला.

-----------------------------------------------------------

 अर्धविराम - [ ; ]

 दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्यय आणि जोडलेली असताना हे विरामचिन्ह वापरतात.

 उदा -  ढगात विजा खूप चमकत होत्या ;  पण पाऊस पडला नाही.

------------------------------------

 स्वल्पविराम - [ , ]

 एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.

 संबोधन दर्शवताना वापरतात.

 हे ,  की ,  असे यांसारख्या शब्दानी दोन वाक्य जोडताना स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरतात.

 उदा -   हुशार ,  अभ्यासू ,  खेळकर व आनंदी मुले सर्वांनाच आवडतात.

 प्रिया ,  इकडे ये.

 त्याला वाटले ,  की आपण तिथे जायला हवे.

------------------------------------

 अपूर्ण विराम [ : ]

 वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम हे विरामचिन्ह वापरतात.

उदा -  खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : 

                           1 ,5,19,78

------------------------------------

 प्रश्नचिन्ह - [ ? ] 

 प्रश्नार्थक वाक्य च्या शेवटी

 एखाद्या माहितीच्या अधिकृत ते बद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते.

 उदा - तू केव्हा आलीस ?

           आमचे विद्वान मित्र ( ?)  म्हणाले.......

------------------------------------

 उद्गारचिन्ह -  [ ! ]

 उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात.

 उदा- अरेरे !  तो नापास झाला.

           अबब !  केवढा मोठा साप.

------------------------------------

 अवतरण चिन्ह [  दुहेरी ] - [ "     " ]

 बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात.

 उदा -  तो म्हणाला , "  मी नक्की येईन . "

------------------------------------

 अवतरण चिन्ह [  दुहेरी ] - [ '    ' ]

 एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता ,  तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

उदा -   ' व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा '  असं त्यांनी सांगितलं.

-------------------------------------

 संयोग चिन्ह  [   -  ]

 दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात.

 ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास  संयोग चिन्ह वापरतात.

 उदा- विद्यार्थी -भांडार

------------------------------------

 अपसरण चिन्ह (  स्पष्टीकरण चिन्ह)   [ - ]

 बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरतात.

 स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास.

 उदा-  मी तिथे गेलो ,  पण - 

------------------------------------

 विकल्प चिन्ह  -  [ / ] 

 एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास विकल्प चिन्ह वापरले जाते.

  उदा-विद्यार्थ्यांना आई/ वडील/ शिक्षक नेहमी मार्गदर्शन करतात.

------------------------------------

4 comments: